मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|लघुभागवत| रुक्मिणीहरणगीत लघुभागवत मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा उपसंहार रुक्मिणीहरणगीत सावित्रीगीत सीतागीत लघुभागवत - रुक्मिणीहरणगीत लघुभागवत हे एक उपपुराण आहे. Tags : laghubhagavatmarathipuranपुराणमराठीरुक्मिणीलघुभागवत रुक्मिणीहरणगीत Translation - भाषांतर अथ रुक्मिणीहरणगीतप्रारंभ: ।(कविश्रेष्ठ मोरोपंतकृत.)(चाल-‘आपुलिया बळें०’ किंवा ‘पहिली माझी ओंवी०’)कुरुक्षेत्रीं येतां सूर्यग्रहपर्व । स्राना आले सर्व यदू कुरु ॥१॥द्रुपदाची कन्या सद्रुणांची खाणी । पांडवांची राणी होती जेथें ॥२॥श्रीकृष्णाच्या भार्या साष्टशत सोळा । सहस्रही गोळा झाल्या तेथें ॥३॥द्रौपदी सर्वाचा करी बहुमान । त्यांचें देहभान उरों नेदी ॥४॥रुक्मिणीस म्हणे "सांग निज लग्र । कथा मन मग्र सुखीं होऊ" ॥५॥रुक्मिणी म्हणे " हो असो स्तव; यथा । मती लग्रकथा सांगेन मी ॥६॥विदर्भदेशांत कुंडीननगरीं । भीष्मकाचे घरीं जन्म माझें ॥७॥माझ्या जननीचें नाम शुध्दमती । जीचा भाव पती महेश्वर ॥८॥बंधू माझे पांच वडील अवघे । आहेत चवघे ताताधीन ॥९॥देव-ब्राह्मणांचा भक्त माझा बाप । ज्याला स्वप्रीं पाप ठावें नाहीं ॥१०॥रुक्मिणी हें माझें, माहेरीचें नाम । जातीपुष्पदाम भावांचें मी ॥११॥रुक्मी ज्येष्ठबंधू मोठा अहंकारी । घरींदारीं भारी तेज त्याचें ॥१२॥स्वामींचा म्यां साधुमुखें बडीवार । आयकीला फार बाळपणीं ॥१३॥कारण आनंद सिंधुमज्जनाचें । येणें सज्जनाचें मज होय ॥१४॥श्रीकृष्णगुणांची लागलीच गोडी । पळही न सोडी मन माझें ॥१५॥तात म्हणे द्यावी संसारवैद्याला । देईन चैद्याला दादा म्हणे ॥१६॥दादापुढें कांहीं न चाले बापाचें । तें फळ पापाचें माझियाची ॥१७॥आणवीला चैद्य धरीयेलें लग्र । झालें चिंतामग्र मन माझें ॥१८॥चिंता नाहीं कळों दिली म्यां जनांत । योजिले मनांत सात श्लोक ॥१९॥लिहिली पत्रिका आपुल्याच हातें । संकट महा तें काय सांगूं ॥२०॥सुदेव ब्राह्मण विनवीला आर्य । पाठवीला कार्य साधावया ॥२१॥पत्रिका घेऊनी गेला व्दारकेला । तेणें फार केला श्रमी देह ॥२२॥ब्राह्मणाची भीड स्वामींस पडली । तरीच घडली मज सेवा ॥२३॥विप्रहस्तीं देती हात पुण्यश्लोक । सात पुण्य-श्लोक वाचीतांची ॥२४॥पूर्ण अनुग्रह स्मितें जाणवीला।रथ आणवीला त्याची वेळे ॥२५॥स्वरथीं प्रथम चढवूनी विप्र । माझे स्वामी क्षिप्र आरुढले ॥२६॥आले गांवें एका रात्रींत शंभर । स्वामी विश्वंभर दयासिंधू ॥२७॥व्दिज गेल्यावरी शिशुपाळ आला । चिंताज्वर झाला मला भारी ॥२८॥माय दे लावूनी देहाला हळद । हे हालहलद न तो पाप ॥२९॥करुनी भलतें एक मिष वाटे । पाहें; विष वाटे अन्न पान ॥३०॥पुसतां सांगे मी अश्रुहेतु तेल । उत्तरीं गुंतेल नव्हे कधीं ॥३१॥‘लग्र पूर्वदिनीं वृष्णीबळपूर्ण । होऊनियां तूर्ण हराअया ॥३२॥ऐसें जें लिहोनी पाठवीलें होतें । आठवीलें हो ! तें शतदां म्या ॥३३॥न आले त्या दिशीं मध्यरात्रीं मात्र । चिंताज्वरें गात्र तापवीलें ॥३४॥त्या रात्रीं लागला नाहीं माझा डोळा । प्राण कंठीं गोळा झाले होतें ॥३५॥भक्तचिंतामणी गौरीहर परी । रुसल्यें त्यांवरी शतदां मी ॥३६॥मी म्हणें कपाळीं हा नवरा जीवा । हा ! नवराजीवाऽमलनेत्रा ! ॥३७॥कृष्णास दे कीं हे तनू पावकास । अंबे ! पाव कास घालूनीयां ॥३८॥वाहीन मी नित्य श्रीशंकरा बेल । विशंक राबेल मन पायीं ॥३९॥देईन मी नित्य नव सदा दानें । नवस दादानें किती केले ॥४०॥काय करावें त्या सज्जनें वाडवें । मद्दैव आडवें झालें वाटे ॥४१॥जाणों पत्रिकेंत लिहितां चूकल्यें । तरीच मूकल्यें महासुखा ॥४२॥धाडीला चोरोनी स्वभावा लाखोटा । स्वभावाला खोटा कोण म्हणे ? ॥४३॥न पावावें हे तों त्यांची नव्हे रीती । न ते अव्हेरीति विनवीतां ४४॥ऐसी नानापरी चिंतेंत पडल्यें । दु:खें मी रडल्यें सारी रात्र ॥४५॥जो ऐसें मन्मन चिंतेंत राहाटे । स्फुरला पाहांटे डावा बाहू ॥४६॥स्फुरे नेत्र नाशी सर्व ताप डावें। सर्वथा पडावें सुखीं येणें ॥४७॥हर्षलें कांहीं तों सुदेव देखीला । तो विप्र लेखीला महादेव ॥४८॥तो म्हणे आणीला आला वासुदेव । हा लावा सुदेव वाटे शीघ्र ॥४९॥म्यां त्याच्या चरणीं ठेविलें मस्तक । तेणेंही हस्तक माझ्या माथां ॥५०॥त्या प्राणदात्याला काय म्यां अर्पावें । अमृता तर्पावें कोणें रसें ॥५१॥जें जें दिलें तें तें सद्रुरुला अल्प । वंदनची कल्पतरुपूजा ॥५२॥ज्यांला भक्तत्राण दुष्टदंड पाठ । आले पाठोपाठ भावोजीही ॥५३॥भारी बळभद्रभावोजींचें सैन्य ।येतां आलें दैन्य चैद्यांदिकां ॥५४॥सीमांतपूजन केलें जनकानें । जैसें जनकानें मिथिलेंत ॥५५॥उतरले प्रभू कुंडीनाबाहेर । हर्षलें माहेर दादावीणें ॥५६॥अंबिकेला न्यावी नवरी बाहेरी । हा माझ्या माहेरीं कुळधर्म ॥५७॥मज रक्षावया कटकाचा कोट । केला वाटे लोट सिंधूचा तो ॥५८॥या कन्यारत्नाला केली सेना पेटी । अंबिकेच्या भेटी नेते झाले ॥५९॥जगदंबेची म्यां पूजा केली भावें । कार्य सिध्द व्हावें न कां मग ॥६०॥उजवा अशोक प्रसाद मागतां । चरणा लागतां दिला मज ॥६१॥प्रसाद घेऊनी करुनी नमन । तेथूनी गमन जैसें केलें ॥६२॥जे मज भोंवते होते उभे मेले । अंबेनें ते केले वेडे सर्व ॥६३॥गळालीं मेल्यांच्या हातींची हातेरें । पळांत मातेरें झालें त्यांचें ॥६४॥न गणीले रथगजानीका गदा । ग्रजांनी कागदा मान दीला ॥६५॥प्रकटले स्वामी लाजल्यें मी बाळा । सखी म्हणे माळा आधीं घालीं ॥६६॥ज्याच्या तेजें रवी शशी मालवले । ते घ्याया लवले माला माझी ॥६७॥धरुनीयां करीं स्यंदनीं वाहीलें । हें प्रेम, पाहीलें कोठें कोण्ही ? ॥६८॥बैसवूनी अंकीं उरशीं धरीलें । मज उध्दरीलें चिंतेंतूनी ॥६९॥मला नेतां वी एकही न बोले । वाटले ते कोल्हे, सिंह स्वामी ॥७०॥त्या कटककोटा स्वर्ग मज सुधा । म्हणा चक्रायुधा पक्षिराज ॥७१॥यापरी हरुनी मज दूरवर । आले शूरवर धणी माझे ॥७२॥पावले दुर्जन असा वध हो ! ते । असावध होते घडीभरी ॥७३॥मग मज नेलें असें त्यां कळलें । वदन मळलें अपयशें ॥७४॥ते दुष्ट म्हणती तापोनी कोपानें । हरिली गोपानें कन्या किर्ती ॥७५॥जिंकोनियां यदुनंदनास मज । मंद नासमज हरुं आले ॥७६॥शाल्व जरासंध चैद्य शिशुपाळ । धांवले भूपाळ रणासाठीं ॥७७॥योजूनी स्वामीला गट करावयाचें। कटक रायाचें गांठी घाली ॥७८॥स्वामींनीं पावतां भयें तनु कंपा । केली अनुकंपा मजवरी ॥७९॥बोलिले ‘कोमेलें आंग कांपतीस । सांग कां पतीस पावोनही ? ॥८०॥शत्रूभयें झाला प्रकट कांप हा । स्वकटका पहा भीऊं नको ॥८१॥चैद्यादि तृणाच्या पहा या दवातें । अहा यादवातें कोण साहे ॥८२॥फिरले आमुचे बळदेव दादा । तेजें सिंहनादा करीतात ॥८३॥भेदीतील तेजें पर्वता पहा तें । सर्व पाप हातें हरितील ॥८४॥याच्या जळतील तेजें पळतील । वैरी मळतील अकीर्तीनें ॥८५॥केला नसे कोण्ही रामासम रण । रामास मरणभय नाहीं ॥८६॥यांचें देवांनींही हळ नवसावें । पळ न बसावें पुढें काळें ॥८७॥भ्यालीस कां अहा मुग्धे ! स्वस्थ रहा । चमत्कार पहा संगराचा ॥८८॥या स्वामीच्या बोलें साध्वस उडालें । आनंदीं बुडालें मन माझें ॥८९॥पाहें तों ऊठले बळाचे सागर । मुसळ नांगर घेऊनीयां ॥९०॥त्यां स्वल्प पन्नास वर्ण वाखाणाया । अर्णवा खाणाया समर्थ ते ॥९१॥स्वर्गज होय कां न कोहाळा हळा । नको हाळाहळा गंध ज्याचा ? ॥९२॥घटजीं शोषाया तप नदीपा न । तपन दीपा न लोपवील ॥९३॥झाले और्व परबळपारावारा । बळ पारावारा किती जाणें? ॥९४॥परसेनार्णवीं बळ मंदराग । खळ मंद, राग त्याचा येतो ॥९५॥वाहिलीं क्षोणींते खणीत शोणीतें । वर्णावें कोणीं तें महायुध्द? ॥९६॥वीर अभिमूखप्रहारें जे मेले । अप्सरांनीं नेले वरुनी ते ॥९७॥नाचले त्या रणरंगांत कबंध । कीं पातकबंधमुक्त झाले ॥९८॥विस्तार तूं पूसों नको, टिके सरी । न कोटीकेसरीबळ यांच्या ॥९९॥वैरिवी बहु रणांत गळाले। उरले पळाले मृत्युभयें ॥१००॥जयश्रीचा लाभ सर्वांही यादवां । किती तीं या दवा वैरीतृणें ? ॥१०१॥दादानें देखिले, स्वरक्तें रंगेल । जे रणीं भंगले चैद्यादिक ॥१०२॥म्हणे, ‘पाहा कैशी सोडवीतों कन्या ? । हें कार्य म्यां अन्या सांगो नये ॥१०३॥यादवांच्या रक्तें क्षोणीला न्हाणितों । भगीनी आणितों घडीमाजी ॥१०४॥धरीन चोराला, त्रैलोक्य धुंडीन । नातरी कुंडीन पाहें न मी’ ॥१०५॥जिंकावया केली तयां प्रतिज्ञा ते । जयांप्रती ज्ञाते उपासिती ॥१०६॥अक्षौहिणी सैन्य घेऊनी धांवला । क्षणांत पावला दादाराय ॥१०७॥जयाच्या पायाला भावीक लागती । भावी कलगती त्याशीं बरी ॥१०८॥दादानें रथासीं रथ मेळवीला । क्षण खेळवीला प्रभूंनीं तो ॥१०९॥स्वामींचें जें तेज अजीत रणीं तें । अजी तरणीतें तापवील ॥११०॥न ममे खंडिलीं कोदंडाकवचें । तो दंडक वचें सांगवेना ॥१११॥स्वामींची दुर्जनीं उग्रता बाहेर । मानस कणेंचें ॥११२॥विरथ विशस्त्र दादा केला मग्र । मग खड नग्र वधावया ॥११३॥होतां बंधुतेज मंद, कालवलें । नंदका लवलें मन शिर ॥११४॥ऐकिली न नतघातलील जुनी । घातली लाजूनी पायीं मिठी ॥११५॥सोडोनियां कोपं सकळ वळले । न कळवळले कोणा आर्ती ॥११६॥ठेऊनी नंदक, ध्वजाशीं बांधीलें। खावें जें रांधीलें जैसें स्वयें ॥११७॥भावाची सांगों मी काय शोभा? । नायका यशोभा यदूच्यांची ॥११८॥स्वामींनीं दादाची दादाच्याची दोषें । विटंबिली रोषें तनू जैशी ॥११९॥विटंबीती सेना भावोजीही कोपें । दोघांसह सोपें चरित्र हें ॥१२०॥मुक्त केला दादा भावोजींनीं आंगें । थोरपण सांगें असें कोठें? ॥१२१॥याच्या भक्तिरसें भुलवीला मर्ग । केले तुच्छ स्वर्गसुधाभोग ॥१२२॥ज्यासाठीं ब्रह्मादि सुर सदा दास । सुरस दादास रुचेना तो ॥१२३॥तेथेंची राहिला न गेला कुंडीना । कोणी कां धुंडीना, असा नाहीं ॥१२४॥माझा निववीला भावोजींनीं खेद । यांचा बोल वेद; भेद नाहीं ॥१२५॥श्रीमूर्ती श्रीगंगा या देहा ओहळा । स्वीकारी सोहळा पुरवाया ॥१२६॥द्रौपदीबाई ! हे माजी लग्रकथा । स्वामी मनोरथा पुरवीतो" ॥१२७॥नाशी कामक्रोधलोभ पापव्यथा । स्वयंवरकथा रुक्मिणीची ॥१२८॥लावी धर्मन्यायभक्तिज्ञानपथा । स्वयंवरकथा रुक्मिणीची ॥१२९॥भेटवी देऊनी प्रेम पक्षिरथा । स्वयंवरकथा रुक्मिणीची ॥१३०॥मयूरासी वर्षा सज्जना हे तथा । स्वयंवरकथा रुक्मिणीची ॥१३१॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP