अध्याय ५७ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
परमपावना पुसणपुरुषा । श्रीगोविंदा जगदधीशा । परिसावया कृतादेशा । श्रोतृमानसा वसवावें ॥१॥
सत्यभमा परणिल्यावरी । सत्तावन्नाव्यामाझारी । काय करिता जाला हरि । हे नृपा अवसरी पुसावया ॥२॥
तें जाणोनि नृपान्तर । वसिष्ठाचा प्रणप्तार । निरूपील तो इत्यर्थसार । श्रोते चतुर अपिसोत ॥३॥
सत्यभामेचें पाणिग्रहण । जालें देखोनि शतधन्वान । सत्राजिताचा घेईल पाण । मग त्या कृष्ण मारील ॥४॥
तेथ न लभतां स्यमंतकमणि । विकल्प मानील मुसलपाणि । अक्रूरें अर्पितां सभास्थानीं । बुझावणी तें होईल ॥५॥
ये अध्यायीं इतुके कथा । परिसावयाची नृपातें आस्था । जाणोनि बादरायणि वक्ता । निरूपी तत्त्वता तें ऐका ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP