मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५५ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ५५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ५५ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर स च मायां समाश्रित्य दैतेयीं मयदर्शिताम् ।मुमुचेऽस्त्रमयं वर्शं कार्ष्णौ वैहायसोऽसुरः ॥२१॥गगनीं जाऊनि मेघाआड । मयदर्शित जे माया गूडः । तीतें आश्रयूनि प्रौढ । करी कैवाड कापट्यें ॥५२॥आपणा लपवूनि बलाहकीं । कंदर्पावरी अस्त्रें टाकी । अस्त्रवृष्टीच्या पावकीं । तिहीं लोकीं हाहाकार ॥५३॥बाणवृष्टि महाप्रबळ । तेणें खोंचला रुक्मिणीबाळ । मानी मांडला प्रलयकाळ । मग गोपाळ स्मरे हृदयीं ॥५४॥बाध्य्मानोऽस्त्रवर्षेण रौक्मिणेयो महारथः । सत्त्वात्मिकां महाविद्यां सर्वमायोपमर्दिनीम् ॥२२॥ततो गौह्यकगान्धर्वपैशाचोरगराक्षसीः ।प्रायुंक्त शतशो दैत्यः कार्ष्णिर्व्यधमयत्स ताः ॥२३॥रुक्मिणीतनय महारथी । तोही जाला विकळवृत्ति । दैत्य मायेची अद्भुत शक्ति । जाणोनि श्रीपति आठविला ॥१५५॥हृदयीं स्मरतां अधोक्षज । सावध जाला मकरध्वज । तंव मायावतीनें कथिलें गुज । गुप्त येऊनि कर्णपुटीं ॥५६॥दैत्यमाया हे तामसी । सत्वात्मिका नाशक इयेसी । ते वैष्णवीये महाविद्येसी । स्मरे मानसीं बीजमंत्रें ॥५७॥मग उठोनि बैसला मदन । हस्तें नेत्र परिमार्जून । सात्विकी महाविद्या जपोन । केली उत्पन्न विष्णुमाया ॥५८॥तयेपासूनि अनेक विद्या । स्मरणमात्रें प्रकटती सद्या । दैत्यमायाकृतकुविद्या । भंगती अविद्या जेंवि बोधें ॥५९॥सात्विकी माया विश्वमोहिनी । जे वैष्णवी त्रिजगज्जननी । सर्वमायाउपमर्दिनी । प्रकटी कार्ष्णि ते काळीं ॥१६०॥शंबरासुरें गौह्यकी माया । प्रकट केली कौरवराया । रत्नाभरणीं मंडित काया । गुह्यकचळथा उठावलिया ॥६१॥औदीच्यपिंगळबिळप्रमुख । गदापरिघादि शस्त्रें अनेक । अभेद्य वर्में रत्नकंचुक । रत्नखचिता रथसिबिका ॥६२॥विकराळ देती किंकाळिया । बर्बरवोष्ठ भयंकर काया । पाचारूनि रुक्मिणीतनया । शस्त्रघाया मिसळती ॥६३॥कोट्यनुकोटि दिसती पुढें । जैसे निबिडनिर्जळ घनमेहुडे । येरें कुंभकर्णास्त्र जपोनि तोंडें । पंचकाण्डें प्रयोजिलें ॥६४॥वैष्णवीमायेचा बडिवार । उठिले कुंभकर्ण अपार । गगनचुंबित दीर्घतर । भंगिती भार गुह्यकांचे ॥१६५॥शूळीं खोंचूनि फोडिती उदरें । कित्तेक रगडिती लत्ताप्रहारें । कित्तेक ग्रासिती पसरूनि वक्त्रें । चळथा निकरें शत्रूंचा ॥६६॥मारित उठिले कुंभकर्ण । देखोनि पिंगळशंकुकर्ण - । प्रमुख गुह्यकांचे गण । त्यजिती रण प्राणभयें ॥६७॥देखोनि आश्चर्य मानी असुर । म्हणे हा अधर परशुधर । कीं भूधर कीं रामचंद्र । किंवा भास्कर प्रळयाग्नि ॥६८॥ऐसा शंबर विस्मयापन्न । मग गान्धर्वास्र प्रयोजून । मन्मथावरी टाकिला बाण । करूनि गर्जन घनघोषें ॥६९॥गान्धर्वविद्येचें लाघव । गगन पृथ्वी व्यापिली सर्व । गानगणिकागमकगौरव । मुरजादिरव सहवीणा ॥१७०॥आरोहावरोह ग्रामत्रय । षड्जप्रमुख स्वराम्नाय । भैरवादि रागनिचय । षाढव औढव पूर्ण त्रिधा ॥७१॥सापत्य राग रागाङ्गना । मूर्तिमंत भासती नयना । विलास विश्राम भाव मूर्च्छना । कंपितें गिरिड्या चूर्णिका ॥७२॥नाद नारीनाट्यवर्तनें । काममोहकें कौशल्यचिह्नें । देखतां नयन लाविले मदनें । विकळ मूर्च्छने वश जाला ॥७३॥शंबर कापूं पाहे शिर । तंव वैष्णवी शक्ति दुर्धर । हृदयीं प्रकटूनिया सत्वर । बोधिला मार समरंईं ॥७४॥सात्विकी वैष्णवी विद्या पबळ । अस्त्रीं योजिला विरागानळ । गान्धर्व विध्वंसिलें तत्काळ । मायाजाळ हारपलें ॥१७५॥मग पैशाची साबरविद्या । जीमाजी असंभाव्यकुविद्या । तें पिशाचास्त्र सोडिलें सद्या । जें भ्रमाक मद्यासमसाम्यें ॥७६॥पिशाचास्त्राभिमंत्रित बाण । सुटतां लोटलें पिशाचसैन्य । वेताळ कंकाळ भूतपगण । प्रबळ आंगवण दाविती ॥७७॥मैळी मुकी मायराणी । आपुलालिया परिवारगणीं । उठावल्या समराङ्गणीं । नग्न यक्षिणी धांवती ॥७८॥यक्ष धांवती बीभत्सवेषें । विकराळ वदनें मोकळीं भिसें । खाऊं गिळूं इत्यादि घोषें । क्रूर आवेशें संघटती ॥७९॥समरीं चंड मारिती हाका । झाडें धोंडी टाकिती उल्का । नेत्रीं वक्त्रीं पावकशिखा । त्रिपुरान्तकासम गमती ॥१८०॥शाकिनी डाकिनी रुद्रचंडी । मारको मेसको वनचामुण्डी । झोटिंग मेराळ पूतना प्रौढी । महिष मातंगी षष्टिका ॥८१॥कूष्माण्ड कोटर ब्रह्मराक्षस । पिंग पिंगाक्ष छिन्ननास । कुंड कृपीट कुटीर क्रुश । गंड गंडाक्ष भैरुंड ॥८२॥ऐसिया पिशाचजाति क्रूर । विकट विकराळ भयंकर । भूतचेष्टा महाघोर । धांवती समोर स्मरहनना ॥८३॥हें देखोनि मकरध्वज । शुचिष्मंत नृसिंहवीज । जपतां भंगलें पिशाचतेज । पळती निस्तेज दशदिशा ॥८४॥सर्वत्र पसरलें सिंहवदन । तिखट नखें दंष्ट्रा तीक्ष्ण । खदिराङ्गारासमान नयन । पिशाचसैन्य त्रासिती ॥१८५॥पिशाचसैन्य भंगल्यावरी । शंबर दचकला अंतरीं । म्हणे केव्हढी प्रतापथोरी । स्वयें वीरश्री या प्रकट ॥८६॥जपोनि पन्नगास्त्र पुढती । प्रकट केली तामस शक्ति । तिनें व्यापिली गगन क्षिति । चळथा लोटती भुजगांच्या ॥८७॥पंच सप्त दश हस्तक । शतसहस्र लक्षात्मक । कोटिखर्वादि अनेक । जातिविशेष सर्पाचे ॥८८॥मर्मीं झोंबती सत्वर । करिती विषोल्बणफूत्कार । फणा उभारिती थोर । महाविखार सक्रोधें ॥८९॥नागपाशें कर पद ग्रीवा । बांधोनि पाडावयाच्या हांवां । झेंपावती कुरुपार्थिवा । दाविती यावा चापल्यें ॥१९०॥डोंबें गव्हाळे शंखपाळ । आर अजगर धामणी थोर । कालसर्प करोट घोर । तक्षक रुखी रक्तश्रृंगी ॥९१॥ऐसिये सर्पांचे महामारी । माजि निर्भय स्मर अंतरीं । अस्त्रीं ओजिला पन्नगारि । माया आसुरी निर्दळणा ॥९२॥गगनीं गरुड कोट्यनुकोटि । तिखटां चंचु नखाग्रीं तिखटीं । टोचितां सर्प बारा वाटीं । पळती हिंपुटीं प्राणभयें ॥९३॥उभयपक्षांचिया फडत्कारीं । धुधुकारतां कर्कश स्वरीं । जाली सर्पांची वोहरी । माया आसुरी हारपली ॥९४॥शंबरासुरें ते अवसरी । राक्षसी माया जपोनि मंत्रीं । अस्त्र सोडितां सर्व धरित्री । दीसती सशस्त्री राक्षस ॥१९५॥सिंह व्याघ्र कुंजरमुख । सूकर वानर खर जंबुक । गृध्र श्येन उलूक काक । इत्यादि अनेक वदनांचे ॥९६॥वृक आस्वल तरस तगर । गंड भैरुंड वदनीं थोर । शुनक भल्लूक घोटक उष्ट्र । महिषासुर महामत्त ॥९७॥खङ्गरोमी शराग्ररोमी । टंककंटकच्छुरिकारोमी । रोमकवची क्रूर कर्मी । राक्षस भूमीं न समाती ॥९८॥गगनचुंबित जे विकराळ । नयनीं वदनीं निघती ज्वाळ । विद्युत्प्राय गर्जनाशीळ । झेलिती अचळ द्रुम धोंडी ॥९९॥कोट्यनुकोटि राक्षस क्रूर । लोटतां कंदर्पासमोर । येरें वैष्णवी स्मरोनि वीर । हनूमान कपींद्र प्रकटिले ॥२००॥पुच्छें वळिलीं मुकुटावरी । गगन कोंदलें भुभुकारीं । कपीन्द्र मातले महामारीं । राक्षस समरीं भंगले ॥१॥ऊर्ध्व उसळोनि गगनापोटीं । पुच्छपाश राक्षसांकंठीं । घालूनि गगनीं देऊनि घरटी । प्रेतें भूतटीं आफळिती ॥२॥कपीन्द्रप्रतापमार्तण्ड थोर । प्रकटतां भंगला निशाचरभार । ऐसिया शतधा माया घोर । शंबरासुरें प्रयोजिलिया ॥३॥तितुकिया सात्विकीमायायोगें । समरीं भंगिलिया अनंगें । काळाग्निबाणें भेदूनि आंगें । शंबर सवेगें पाडिला ॥४॥गगनींहूनि धरापृष्टिं । पडतां प्रद्युम्नें देखोनि दृष्टी । सुतीक्ष्ण कृपाण कवळूनि मुष्टि । उठाउठीं संघटला ॥२०५॥निशातमसिमादाय सकिरीटं सकुंडलम् । शंबरस्य शिरः कायात्ताम्रश्माश्वोजसाहरत् ॥२४॥किरीटकुंडलें देदीप्यमान । ताम्रश्मश्रुमंडितवदन । कायेपासूनि विखंडून । प्रतापें प्रद्युम्न गर्जिन्नला ॥६॥कायेपासूनि शंबरशिर । प्रतापें छेदिता जाला मार । शंबरसदनीं हाहाकार । गगनीं निर्जर जय गाती ॥७॥आकीर्यमाणो दिविजैः स्तुविद्भिः कुसुमोत्करैः ।भार्ययांऽबरचारिण्या पुरं नीतो विहायसा ॥२५॥दुंदुभिघोषें निर्जरगणीं । जयजयकार केला गगनीं । प्रद्युम्नावरी वर्षती सुमनीं । नाना स्तवनीं यश गाती ॥८॥मग पूर्वजन्मींची अंगना रति । मायाप्रवीण मायावती । गगनमार्गें जयेसि गति । ते घेऊनि स्वपति निघाली ॥९॥अपूर्व ललामरत्नाभरणीं । दिनमणीसमान अनर्घमणि । सकान्त मिरवे मन्मथरमणी । अंबरचारिणी जगदंबा ॥२१०॥तिनें मन्मथा गगनपंथें । नेऊनि द्वारकेमाजि निरुतें । उतरिलें अंतःपुरा आतौतें । तें नृपनाथें परिसावें ॥११॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP