मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - श्लोक ४६ ते ५२ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५२ Translation - भाषांतर भगन्तौ किल विश्वस्य जगतः कारणं परम् । अवतीर्णाविहांशेन क्षेमाय च भवाय च ॥४६॥उत्कृष्ट जगाचें कारण । स्वयें जे कां अकारण । ते हे तुम्ही दोघे जण । रामकृष्ण अवतरलां ॥६१॥अचिंत्यैश्वरशक्तीकरून । करावया अखिल कल्याण । जगत्प्रवृत्तिप्रवर्धन । संस्थापन धर्माचें ॥६२॥इत्यादि कार्यांकारणें । तुमचें येथ अवतार धरणें । लोकदृष्टी शंका मनें । न लगे करणें यदर्थीं ॥६३॥तेच शंका म्हणाल कैसी । क्षोभें मारिलें रजकासी । कृपा केली वायकासी । हे भासे मूर्खांसि विषमता ॥६४॥ते तुमच्या ठायीं नसे । म्हणोनि सुदामा विनवीतसे । तें व्याख्यान कुरुनरेशें । स्वस्थमानसें परिसावें ॥३६५॥न हि वां विषमा दृष्टिः सुहृदोर्जगदात्मनोः । समयोः सर्वभूतेषु भजन्तं भजतोरपि ॥४७॥विषम दृष्टि तुमच्या ठायीं । नाहीं ऐसें म्हणणें कायी । तुमए सत्तेची नवायी । समुच्चयीं भूतांच्या ॥६६॥विषम होतांचि नये तुम्हां । तुम्ही सर्वांचा एकात्मा । सर्वगतत्वें सुहृत्प्रेमा । अधमोत्तमा माजिवडा ॥६७॥जो जो भजे जे जे भावें । तेणें तैसेंचि फळ पावावें । रजकक्षोभें प्रक्षोभावें । साधु सद्भावें वायका ॥६८॥भाग्यें माझिया सदनाप्रति । तुम्ही आलेति कृपामूर्ति । भृत्यांमाजी मी नीचवृत्ति । सेवेसि विनति परिसावी ॥६९॥तांवाज्ञापयतं भृत्यं किमहं करवाणि वाम् । पुंसोऽत्यनुग्रहो ह्येष भवद्भिर्यन्नियुज्यते ॥४८॥दास्य काय म्यां करावें । ऐसें भृत्यातें आज्ञापावें । तुमच्या दास्यें श्लाघ्य आघवें । जिणें होय पुरुषाचें ॥३७०॥तुम्ही कार्यार्थ जैं नियोजा । तैं तो अनुग्रहो बरवे वोजा । पुरुषासि झाला सहजीं सहजा । निजसायुज्या तैं लाभे ॥७१॥श्रीशुक उवाच - इत्यभिप्रेत्य राजेन्द्र सुदामा प्रीतमानसः । शस्तैः सुगन्धैः कुसुमैर्मालां विरचितां ददौ ॥४९॥कौरवकैरवप्रबोधका । शुक म्हणे गा प्रतापअर्का । ऐकें परीक्षितिसंज्ञका । निष्कलंका राजर्षे ॥७२॥निष्काम अनन्य मी किंकर । तुम्ही निश्चयेंसि जगदीश्वर । तुमची आज्ञा तो अनुग्रह थोर । अभिप्राय समग्र सुचविला ॥७३॥ऐसी विज्ञापना करून । साष्टांग वंदिले रामकृष्ण । सर्वां देऊनि आलिंगन । कर जोडून ठाकला ॥७४॥सप्रेममानसें सुदामा । निवडोनि दिव्य सुमनोत्तमा । माळा निर्मूनि पूर्णकामा । देऊनि परमात्मा तोषविला ॥३७५॥प्रशस्तें म्हणिजे संकोचरहितें । ऐसीं निवडोनि विशुद्ध चित्तें । कोमळ सप्रेम सुगंधभरितें । सुमनें ग्रथितें हरिमाळे ॥७६॥ताभिः स्वलंकृतौ प्रीतौ कृष्णरामौ सहानुगौ । प्रणताय प्रपन्नाय ददतुर्वरदौ वरान् ॥५०॥ऐसिया माळा समर्पून । सानुग पूजिले रामकृष्ण । सालंकृत शोभायमान । तोषें वरदान घे म्हणती ॥७७॥अनन्यभावें शरणागत । परमविनीत पादप्रणत । त्याचें जाणोनि मनोगत । वर ओपीत ते काळीं ॥७८॥सोऽपि वव्रेऽचलां भक्तिं तस्मिन्नेवाखिलात्मनि । तद्भक्तेषु च सौहार्दं भूतेषु च दयां पराम् ॥५१॥तोही निष्काम पूर्णभक्त । न मगे ऐश्वर्य नाशिवंत । अखिलात्मक श्रीभगवंत । अचला याचित तद्भक्ति ॥७९॥जें कां अखिल चराचर । अभेद अवघाचि श्रीधर । जाणोनि भजन अव्यभिचार । मागे साचार सद्भावें ॥३८०॥सर्वभूतीं निर्वैरता । तेही याचिली न याचितां । सर्वभूतीं एकात्मता । आली हाता अनायासें ॥८१॥सर्वात्मक जैं श्रीभगवंत । तैं निंदेची हरली मात । अनिंदकता चढली हात । अकस्मात या योगें ॥८२॥तयें मागेंचि भूतदया । न प्रार्थितां आली हृदया । ठाव नसेचि क्षोभावया । म्हणोनियां अक्षोभता ॥८३॥जेथ क्षोभकता निमाली । तेथें शान्ति सहजेंचि आली । ऐसी पूर्णश्री याचिली । अभेदभजनें श्रीदामें ॥८४॥भगवद्भक्तांचें सौजन्य । भूतमात्रीं दयाळुपण । हेंही प्रार्थिलें म्हणोन । न लगे भिन्न सांगावें ॥३८५॥जाणोनि याचें मनोगत । सर्वज्ञ सर्वग श्रीभगवंत । अनन्यभावाचें अंकित । गौरवीत वरदानें ॥८६॥इति तस्मै वरं दत्वा श्रियं चान्वयवर्धिनीम् । बलमायुर्यशः कांतिं निर्जगाम सहाग्रजः ॥५२॥ऐसे वर जे याचिले तेणें । तेही देऊनि जनार्दनें । न मागतां करुणापूर्णें । कृपावरदानें गौरविला ॥८७॥पुत्रपौत्रांची संतति । चंद्रसूर्य गमनीं भ्रमती । तंववरी ऐश्वर्यसंपत्ति । भगवद्भक्तिविराजित ॥८८॥तव तनूपासोनि जे संतति । ममानुग्रहें तयांप्रति । बळप्रताप दिव्यकांति । विजय कीर्ति पूर्ण असो ॥८९॥श्रियादिन मागे सुदामा । परि तो कळवळा मेघश्यामा । निष्काम भजतां पादपद्मां । ओपी जगदात्मा सर्वस्वें ॥३९०॥विसरोनि आपुली ऐश्वर्यथोरी । अनन्याची सेवा करी । गर्भासमान वाहे उदरीं । कां कडियेवरी मातृवत् ॥९१॥ऐसा स्वभक्तकरुणाकर । न मनी दासाचा जोजार । सुदाम्यास तो देऊनि वर । साग्रज सानुचर निघाला ॥९२॥रजक प्रार्थिला बरवे रीती । परंतु तयाची दुर्मति । मरण पावला कृष्णहस्तीं । तेणें सद्गति तो लाहे ॥९३॥शिंपी शरण अनन्यभावें । म्हणोनि वर त्या दिधले देवें । मालाकाराचिया दैवें । भक्तिगौरवें गौरवी ॥९४॥यावरी पुढें वक्ष्यमाण । कुब्जा करील गंधार्पण । तिसी देऊनि तनुलावण्य । धनुर्भजन - हरि करील ॥३९५॥आणि धनुरक्षकांचा वध । कंस अरिष्टें देखेल विविध । रंगोत्सवादि कथा विशद । शुक कोविद कथील ॥९६॥तया श्रवणाचे अधिकारी । तेहीं अवधानसामग्री । करोनि परीक्षितीबरोबरी । पंक्तिकार होइजे ॥९७॥अखिलब्रह्मांडचक्रवर्ती । श्रीएकनाथ पुराणकीर्ति । चिदानंदाची संपत्ति । स्वानंदभरित सर्वत्र ॥९८॥गोविंदनामाचा गौरव । चराचरीं सप्रेम द्राव । तेणें भरला दयार्णव । ते टीका अपूर्व हरिवरदा ॥९९॥श्रीमद्भागवतोत्तम । महापुराण भगवत्कर्म । अठरा सहस्र संख्या परम । पारमहंसी संहिता ॥४००॥त्यामाजील दशम स्कंध । शुकप्रीक्षितिसंवाद । मथुराप्रवेश रजकवध । अध्याय प्रसिद्ध एकेचाळिसावा ॥४०१॥श्रीमद्भागवत दशम स्कंध । टीका हरिवरद वगाध । दयार्णवकृत परमविशुद्ध । अध्याय प्रसिद्ध एकेचाळिस ॥४०२॥इतिश्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमह्म्स्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संत्वादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां रजवकधवायकमाल्यकारवरो नामैकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४१॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५२॥ टीका ओव्या ॥४०२॥ एवं संख्या ॥४५४॥ ( चाळिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १८९७७ ) एकेचाळिसावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP