मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर ऊचुः पौरा अहो गोप्यस्तपः किमचरन्महत् । या ह्येतावन्पश्यंति नरलोकमहोत्सवौ ॥३१॥परस्परें नरनारी । बोलती मानूनि आश्चर्य भारी । केवढी गोपींची तपःसामग्री । कोणे विचारीं तर्केना ॥६७॥महत् म्हणिजे परमश्रेष्ठ । कोण तप यांचे उत्कट । जया पुण्यें रामवैकुंठ । पाहती यथेष्ट अनुदिनीं ॥६८॥प्रभाते कानना नेतां गायी । भोगिती लावण्यसुखनवायी । मध्याह्नें गोधनें आणितां साई । येती त्या ठायीं जलव्याजें ॥६९॥सायंकाळीं परततां धेनु । रामकृष्ण वाहती वेणु । त्या नादाचें होतां श्रवण । येती धांवोन सामोर्या ॥२७०॥नयनचकोरें परम तृषितें । प्राशिती वदनचंद्रामृतें । अनुदिनीं धनी फावली त्यांतें । महत्सुकृतें कोण तपें ॥७१॥ज्याच्या दर्शनमात्रें अभिनव । नरलोकांसी महोत्सव । तें गोपीनयनीं फावलें दैव । जे रामकेशव लावण्य ॥७२॥संपलें पुरवधूप्रकरण । पुढें जातां श्रीभगवान । केलें दुर्मदरजकहनन । तें व्याख्यान अवधारा ॥७३॥रजकं कंचिदायांतं रंगकारं गदाग्रजः । दृष्ट्वायाचत वासांसि धौतान्यत्युत्तमानि च ॥३२॥जो गदाचा अग्रज बन्धु । भगवान श्रीकृष्ण गोविंदु । तो रजकातें देखोनि शब्दु । करोनि विनोदु बोलिला ॥७४॥मथुरापुरी महाथोर । रजकही बहुत तदनुसार । त्यां माजी कोणी एक क्षालनचतुर । रंगकार नृपदूत ॥२७५॥क्षालनीं वसनें विगतरंग । तियें यथापूर्व रंगवी सांग । यास्तव रंगकार हें नामलिंग । येर्हवीं चांग रजकचि ॥७६॥त्यातें म्हणे जगदीश्वर । अन्य वसनें प्राकृत नर । लेती त्यांहूनि उत्तमतर । अंबरें सुंदर दे आम्हां ॥७७॥परम विशुद्ध प्रक्षाळिलीं । विविधा रंगीं रंगाथिलीं । आम्हां उभयतां शोभती भलीं । तीं देईं वहिलीं संतोषें ॥७८॥देह्यावयोः समुचितान्यंग वासांसि चार्हतोः । भविष्यति परं श्रेयो दातुस्ते नात्र संशयः ॥३३॥अंगशब्दें संबोधून । रजका म्हणे श्रीभगवान । गौरश्याम तनु जाणोन । उचित वसनें अर्पावीं ॥७९॥आम्हां यथोचित वस्त्रें देसी । तरी परम श्रेय तुज दातयासी । होईल आणि निश्चयेंसीं । संशय मानसीं न धरावा ॥२८०॥स्वातीचेनि विशुद्ध जळें । सिंधुशुक्तिके मुक्ताफळें । तो बिंधु तप्ततैलीं मिळे । तरी प्रज्वळे आश्रयभुक् ॥८१॥किम्वा पयाज्य तनुपोषक । नवज्वरिता तेंचि विख । तेंवि मधुर भगवद्वाक्य । क्षोभवी रजक तें ऐका ॥८२॥स याचितो भगवता परिपूर्णेन सर्वतः । साक्षेपं रुषितः प्राह भृत्यो राज्ञः सुदुर्मदः ॥३४॥नीचा उच्चत्वें सम्मान । तोचि त्यातें क्षोभक पूर्ण । अजाकंठीं गजभूषण । घंटाबंधन गतिरोधी ॥८३॥तैसा षड्गुणैश्वर्यसंपत्ति । सर्वस्त्र पूर्णता ज्यातें पुरती । तेणें वसनें याचितां प्रीती । रजक दुर्मति क्षोभला ॥८४॥म्हणाल षड्गुणैश्वर्यसंपन्न । भूतभविष्यत्रिकालज्ञ । असतां कां नाहीं समजला कृष्ण । अंतःकरण रजकाचें ॥२८५॥तरी तो सर्वज्ञ श्रीभगवंत । जाणोनि तयाचें दुष्ट चित्त । याञ्चाछळें निजकार्यार्थ । प्रकटी समर्थ तो ऐका ॥८६॥शकुना लागीं शत्रु नगरीं । सुमनें वसनें बलात्कारीं । हरूनि करावी मारामारी । महाद्वारीं प्रतापें ॥८७॥परिमळद्रव्यें गोरस गंधें । खाद्य शर्करा फळें विविधें । लुंठन करूनि खवळिजे क्रोधें । तैं शत्रु विरोधें समरा ये ॥८८॥ऐसा नीतिशास्त्रींचा विध । दुश्चित न कीजे शत्रुवध । यालागीं स्वप्रताप प्रसिद्ध । दावी मुकुन्द रजकवधें ॥८९॥कंस दैत्यांश केवळ । जरी तो झाला मथुरापाळ । तरी जाणे श्रीगोपाळ । मथुरा निर्मळ निजनगरी ॥२९०॥कृष्ण सर्वांचा अंटरसाक्षी । रजक जाणोनि कंसपक्षी । याञ्चाछळें वसनापेक्षी । जाला निरपेक्षी परिपूर्ण ॥९१॥संकल्पमात्रें सर्व संपत्ति । ज्यातें सर्वत्रसर्वदा पुरती । तोही रजकाची दुर्मति । जाणोनि प्रार्थी शकुनार्थ ॥९२॥रजकें ऐकोनि हरीचा शब्द । स्निग्धद्रव्यें जातवेद । क्षोभे तैसा खळ दुर्मद । अति सक्रोध प्रज्वळिला ॥९३॥वत्सनाभीसि अहिफेन । राजसेवेच्या स्नेहें करून । बाचटलिया गरळाहून । मारकपण स्वयें मिरवी ॥९४॥तैसा साक्षेपें क्षोभला । कटु दुरुक्ति बोलता झाला । अमृतपानें राहु मेला । तेंवि रजकाला हरियाञ्चा ॥२९५॥ईदृशान्यवे वासांसि नित्यं गिरिवनेचराः । परिधत्त किमुद्वृत्ता राजद्रव्याण्यभीप्स्सथ ॥३५॥उद्वृत्त म्हणिजे उद्वृत्तवृत्त । चोरवाटपाडे उत्पथ । गिरिकाननीं राहतां नित्य । तें न चले येथ नृपनगरीं ॥९६॥नित्य ऐसींच उत्तमवसनें । तुम्ही घेतसां पथभंजनें । येथ राजद्रव्यांचीं हरणें । तेणेंचि गुणें करूं इच्छा ॥९७॥तोंडापुरता घेईजे ग्रास । शक्तिसारिखेचि हव्यास । दीप ग्रासितां पतंगास । जेंवि नाश तेंवि तुम्हां ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP