मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर सौवर्णश्रृंगाटकहर्म्यनिष्कुटैः श्रेणीसभाभिर्भवनैरुपस्कृताम् ।वैदूर्यवज्रामलनीलविद्रुमैर्मुक्ताहरिद्भिर्वलभीषु वेदिषु ॥२१॥सुवर्णचतुष्पथ चैत्यद्रुम । धनिकवेव्हारे सभाग्यपरम । त्यांच्या सदनश्रेणी रम्य । हेमहर्म्यमंडिता ॥१३०॥सदनोसदनीं उचित आराम । फळपुष्पाढ्य शोभती द्रुम । विराव करिती विहंगम । हे शोभा उत्तम पुरगर्भीं ॥३१॥सहस्रेंसहस्र एकैक जाती । वार्धुषांच्या दुकानपंक्ति । सभाशब्दें त्या बोलिजती । जडित शोभती हाटवटिया ॥३२॥रत्नमणींचे बंबाळ । रात्रौ तेजःपुंज बहळ । वर्जिततैलवसनानळ । दिवट्या केवळ त्या गमती ॥३३॥वणिक् वराटवसनक्रयी । हेमतारताम्रक्रयी । विविधधातुमुद्राक्रयी । पणनिष्कादि घडमोडी ॥३४॥पत्रारूढधनप्रेक्षक । शुल्बकांस्यादिभाजनक्रयिक । स्वर्णस्तेयपांचाळप्रमुख । अनेक शिल्पिकसदनश्रेणी ॥१३५॥धान्यविक्रयी अपार । शाकाफलौघपुष्पनिकर । नागवल्लीपर्णकार । तांबूलकार ज्या नाम ॥३६॥महामौल्य शरचापकार । खङ्गादि अनेक शस्त्रकार । गजाश्वादि पल्याणकर । स्यंदनकर शिबिकादि ॥३७॥तंतुवायक माल्यकार । परिमळद्रव्यक्रयी अपार । नानारंगीं रंगकार । बहु विकर हेमादि ॥३८॥अनेक रत्नक्रयविक्रयी । घृतैलादिरसक्रयी । पयाज्यशर्कराविकारक्रयी । आणि समवायी औपकरणी ॥३९॥कारुक भिषक कैवर्तक । और्णतार्णपटक्रयिक । इंधनतृणक्रयी चर्मक । आणि अल्पक कार्त्रिमी ॥१४०॥ऐसिया वार्धुषसभाश्रेणी । हेमहर्म्या कलशाभरणी । निवेशनीं ससोपानीं । ध्वजातोरणीं विराजती ॥४१॥तदनुकूल त्यांचीं भवनें । चतुःशालात्मकविस्तीर्णें । जडित रत्नें विचित्र किरणें । शुद्धकांचन लखलखिती ॥४२॥पंचसप्तनवैकादश । त्रयोदश पंचदश सप्तदश । एवमादि ताळें तेतिस । उच्चता विशेष नभोगर्भीं ॥४३॥कलशावरते वैडूर्यमणि । जेथ दुनवटिजे रविकरणीं । भासती जनपदांच्या नयनीं । अनेक तरणि प्रकाशले ॥४४॥माजी मंदिरांची रचना । स्फटिकवेदिकातळवटीं जाणा । मरकत सूदलें स्तंभासना । कोरीव सुमना समसाम्य ॥१४५॥इंद्रनीळाचे वरती स्तंभ । उथाळीं हिर्याचीं स्वयंभ । पीठप्रभा विद्युन्निभ । पुष्कराजांच्या फांकती ॥४६॥खगेंद्ररत्नाचे तुळवट । गोमेदाचे कासवट । माणिकाचे पिधानपाट । कनकें निघोंट घोंटिले ॥४७॥वलभीशब्दें ज्या मोहटिया । प्रवाळमुक्ताफळीं सजिलिया । तेथ वेदिका निर्मिलिया । तेथ पक्षियां सुखवसती ॥४८॥उत्तरभागीं यमुनावनें । संतुष्ट शोभती द्विजवरभुवनें । पूर्वप्रदेशीं क्षत्रियसदनें । नृपोपकरणें मिरविती ॥४९॥पश्चिमभागीं वैश्यवाट । वीथी चतुष्पथ निघोंट । राजमार्ग घडघडाट । ज्यांतें शृंगाट बोलिजे ॥१५०॥शूद्रप्रमुख अवर जाती । दक्षिणभागीं त्यांची वसती । अनुलोमविलोम जे संतति । ते नांदती तदाश्रयें ॥५१॥देवसदनासमीप देखा । पूजकमाल्यकगायकप्रमुखां । वसती अष्टविध सेवकां । अष्टभूमिप्रदेशीं ॥५२॥दिवाकीर्ति कौळिक रजक । घडसी नटक मद्योत्पादक । किरात धीवर वागुरिक । याम्यें पृथक तल्पल्ली ॥५३॥याहूनि दुरी दूरतर । म्लेच्छ चांडाळ डोंब डोहर । श्वपच पुल्कस हिंसक पामर । मळापहार परपल्लिका ॥५४॥ दो श्लोकीं हे नगररचना । निरोपूनियां योगिराणा । यावरी निरोपी सौभाग्यचिह्ना । नगराभरणा दो श्लोकीं ॥१५५॥जेष्टेषु जालामुखरंध्रकुट्टीमेष्वाविष्टपारावतबर्हिनादिताम् ।संसिक्तरथ्यापनमार्गचत्वरां प्रकीर्णमाल्यांकुरलाजतंडुलाम् ॥२२॥गृहाग्रभागीं ज्या वलभिया । मदालसांवरी आच्छादिलिया । स्वर्णवेदी तेथ केलिया । मुक्ताप्रवाळीं मणिबद्धा ॥५६॥चित्रांबरासारिखीं छिद्रें । पद्में स्वस्तिकें सर्वतोभद्रें । तियें गवाक्षें जालरंध्रें । सूक्ष्में सुन्दरें रत्नमयें ॥५७॥आंतून पाहतां बाहरी दिसे । बाह्य जनातें आंत न दिसे । जालरंध्रें त्या म्हणिजेत असें । शोभा विशेष सदनाची ॥५८॥तेथ पक्षी बसावया । रत्नकुट्टिमें निर्मिलीं राया । शुक सारिका रम्य चिडिया । शब्द करिती ते ठायीं ॥५९॥मयूर पारावत चातक । हंस सारस चक्रवाक । चकोर खंजरीट लावक । पिक पंचमस्वर गाती ॥१६०॥तेणें नादित मथुरापुरी । पाहता झाला कैटभारि । सालंकृता कवणे परी । तें अवधारीं कुरुभूपा ॥६१॥वीथीशब्दें राजपथ । हाठवीथीसी पण्यसंकेत । चौकचौबारे चतुष्पथ । प्रांगणपंक्ती गृहश्रेणी ॥६२॥देवालयादि रंगभूमि । नगरीमाजी सर्वसद्मीं । केशरचंदनमिश्रितकर्दमीं । संमार्जनें सर्वत्र ॥६३॥सुगंधद्रव्योदकें प्रोक्षिलीं । मुक्ताफळांच्या रंगवल्ली । दिव्यसुमनें वरी विखुरलीं । तंडुललाज सुमंगळ ॥६४॥गृहश्रेण्यादि प्रांगणवीथी । सालंकृता ऐसिया रीती । त्यावरी द्वारार्चनाची निगुती । ते शुकोक्ति श्रोतीं परिसावी ॥१६५॥आपूर्णकुंभैर्दधिचंदनोक्षितैः प्रसोनदीपावलिभिः सपल्लवैः । सवृंदरंभाक्रमुकैः सकेतुभिः स्वलंकृतद्वारगृहां सपट्टिकैः ॥२३॥उंबरवटाकोटिप्रदेशीं । करूनि भूवरी तंडुलराशि । शुद्धोदकें पूर्ण कलशीं । भरूनि त्यांवरी स्थापिती ॥६६॥पटकुलपट्टिका कलशां गळां । वरी शोभती सुमनमाळा । तळीं पुश्पावळी वर्तुळा । च्म्दन प्रोक्षिला दधियुक्त ॥६७॥आम्रपल्लव कलशां वदनीं । त्यांवरी हेमपात्रें स्थापूनी । दीपावळी अभ्यर्चूनी । देदीप्यमाना प्रज्वळिता ॥६८॥कलशांनिकटी रंभास्तंभा । फळगुच्छेंसीं वरिष्ठ शोभा । कदळें क्रमुक तोरणप्रभा । आम्रपत्रें खाद्यादि ॥६९॥क्रमुकस्तंभ उच्चतर । त्यांवरी पताका चित्रविचित्र । गगनीं तरळती भासुर । अमरनगरा लाजविती ॥१७०॥ऐसीं समस्तां सदनद्वारीं । शोभा समसाम्य साजिरी । मंगळरूपा वृद्धाचारीं । शुकवैखरी ते वदली ॥७१॥नगरगर्भीं पूर्वापार । ऐसी शोभा निरंतर । आला जाणोनि कमलावर । पुरी अपार हरिखेली ॥७२॥पूर्वदेहींच पतिव्रता । प्रफुल्लितांगी आलिया भर्ता । तैसी मथुरा आनंदभरिता । अवलोकितां निजनाथें ॥७३॥किंवा जैसी पूर्विलाहुनी । शोभा दुनवटे वसंतें वनीं । किंवा उदया येतां तरणि । जेंवि पद्मिनी प्रोल्लसिता ॥७४॥ऐसी लावण्यलक्ष्मी पाहीं । प्रफुल्लित पुरीच्या ठायीं । पाहता झाला शेषशायी । ते हे नवायी मुनि वदला ॥१७५॥समासें केलें पुरीवर्णन । येथून संपलें हें प्रकरण । यावरी कृष्णसंकर्षण - । प्रवेशकथन अवधारा ॥७६॥तां संप्रविष्टौ वसुदेवनंदनौ वृतौ वयस्यैर्नरदेववर्त्मना । द्रष्टुं समीयुस्त्वरिताः पुरस्त्रियो हर्म्याणि चैवारुरुहुर्नृपोत्सुकाः ॥२४॥उत्तरजठरार्णवसंभूता । हरिगुणश्रवणभूषणमुक्ता । ऐकें परीक्षिति जीवन्मुक्ता । सभाग्य श्रोता मीनलासी ॥७७॥राया ऐसिये मथुरेप्रति । वयस्यवेष्टित रामश्रीपति । राजमार्गें प्रवेश करिती । तें ऐकोनि युवती मथुरेच्या ॥७८॥त्यांतें देखावया कारणें । परम उत्सुका अंतःकरणें । सवेग आल्या उत्सुकचिह्नें । सकारणें अवधारा ॥७९॥औत्सुक्यासी कारण काय । जे नारदवचनें कंसराय । रामकृष्ण वसुदेवतनय । जाणोनि उपाय तद्धननीं ॥१८०॥अक्रूरासी अळोचून । येथ आणिले व्रजा धाडून । आतां वधील हे गुणगुण । पुरींचें जन गुजगुजती ॥८१॥हें ऐकूनि नगरनारी । प्रवेशतां राममुरारी । लावण्य पाहों डोळेभरी । ऐशा अंतरीं उत्सुका ॥८२॥कानीं पडतांचि हर्यागमन । वस्तुसामर्थ्यें वेधे मन । होवोनि ठेलें पैं उन्मन । प्रवृत्तिभान पारुषलें ॥८३॥आले ऐकूनि राममुरारी । एकी चढलिया माडियांवरी । एकी वळघल्या गोपुरीं । प्रासादशिखरीं पैं एकी ॥८४॥एकी भिंतीवरी ओळघल्या । एकी अटालियांवरी चढल्या । जालरंध्रीं पहात ठेल्या । एकी धांवल्या नृपमार्गें ॥१८५॥राजमार्गाच्या प्रांगणीं । उच्चस्थानीं गृहांगणीं । स्त्रीपुरुषादि मुंडपघसणी । ज्ञाती कोणी न स्मरती ॥८६॥औत्सुक्यविस्मृतिलक्षणें । श्लोकयुग्में बादरायणें । वाखाणीलीं तीं परिसूनि मनें । निर्भर होणें सज्जनीं ॥८७॥काश्चिद्विपर्यग्धृतवस्त्रभूषणा विस्मृत्य चैकं युगलेष्वथापराः ।कृतैकपत्रश्रवणैकनूपुरा नांक्त्वा द्वितीयं त्वपराश्च लोचनम् ॥२५॥एकी नेसल्या विपरीत वसनें । केलीं उत्तरीयें परिधानें । नेसणीं करूनियां प्रावरणें । निःशंकमनें धाविन्नल्या ॥८८॥पदर पांघुरते नेसल्या । नेसते पदर पांघुरल्या । प्रौढा परवंटे नेसोनि आल्या । निरिया खोंविल्या पाठीसीं ॥८९॥एकी नेसल्या कंचुकिया । शिरीं घेती साडिया घडिया । आंगें धांवती उघडिया । झाल्या वेडिया हरिवेधें ॥१९०॥विपरीत भूषणें लेइल्या एकी । कर्णभूषणें घातलीं नाकीं । नासिकाभरणें एकी मस्तकीं । लेत्या झाल्या लगबगां ॥९१॥एकी मेखळा घालिती गळां । कटी वेष्टूनि कंठमाळा । गळा सांडूनि मोकळा । दंडीं बांधिल्या गळसर्या ॥९२॥वाळे वांकी एके पायी । दुसरे चरणीं लेइल्या नाहीं । तैशाच धांवती लवलाहीं । न थरे देहीं देहस्मृति ॥९३॥जडित चुडा एके हस्तीं । दुसरा बुचा कर न स्मरती । बाहुभूषणें एके हातीं । दुजे बांधिती पैं निढळीं ॥९४॥पंखे बाळ्या एके कर्णीं । लेइल्या तांटडी करूनी । दुजा मोकळा न स्मरोनी । गजगामिनी धांवती ॥१९५॥एके श्रवणीं तानवडा । दुसरा विसरल्या श्रवणमुडा । सर्या चितांक बाणले दंडा । कंठीं गोंडा वेणीचा ॥९६॥काजळ सूदलें एका नयना । दुजा तैसाच विसरोनि सुणा । सवेग धांवती मृगलोचना । जना आपणा नोळखती ॥९७॥व्याही जांवई मेहुणे । श्वशुर देवर भर्ता पिशुनें । नेणती विस्मृत वस्त्राभरणें । निःशंकमनें धांवती ॥९८॥वसनाभरणें अस्ताव्यस्तें । तियें निरूपिलीं संकेतें । आतां करितां राहिलीं कृत्यें । तीं तूं समस्तें अवधारी ॥९९॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP