मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - श्लोक ५१ ते ५७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५७ Translation - भाषांतर सुमहार्हमणिव्रातकिरीटकटकांगदैः । कटिसूत्रब्रह्मसूत्रहारनूपुरकुंडलैः ॥५१॥अनंतकोटि दिव्य तरणि । लोपती ज्याच्या प्रभाकिरणीं । ऐसे महार्ह मुकुटीं मणि । आणि किंकिणी बाह्यवंटा ॥१॥कुंडलमंडित गंडदेश । तत्प्रभाढ्य कुटिल केश । नांवें कुन्तळ म्हणती ज्यांस । शोभाविशेष तद्योगें ॥२॥त्रिजगच्चित्राकृति खेवणी । कांची मिरवे मध्यस्थानीं । धाता निर्मी जयावरूनी । प्रळयावसानीं यथापूर्व ॥३॥ब्रह्मसूत्र सूचनाकार । ज्याचेनि सचेतन चराचर । तें शोभवी ब्रह्मसूत्र । सर्वेश्वर सर्वात्मा ॥४॥कंठीं अनर्घ्य रत्नहार । सुमनमाळा मनोहर । चरणीं बिरुदांचा तोडर । अंदु नूपुर रुणझुणती ॥४०५॥आतां आयुधांची सामग्री । तेही ऐका बरवे परी । चहूं हस्तकीं मिरवी चारी । स्वयें श्रीहरि जगदात्मा ॥६॥भ्राजमानं पद्मकरं शंखचक्रगदाधरम् । श्रीवत्सवक्षसं भ्राजत्कौस्तुभं वनमालिनम् ॥५२॥दक्षिण ऊर्ध्वकरीं पद्म । वामभागीं शंखोत्तम । चक्र गदा तदनुक्रम । अधोहस्तीं शोभतीं ॥७॥वक्षःस्थळीं देदीप्यमान । दक्षिणभागीं श्रीवत्सचिह्न । मध्यें मिरवे कौस्तुभरत्न । आपाद पूर्ण वनमाळा ॥८॥स्तवनीं तत्पर पार्षदगण । तेही ऐका सावधान । यथामति गुणकीर्तन । नम्र होऊनि करिताती ॥९॥सुनंदनंदप्रमुखैः पार्शदैः सनकादिभिः । सुरेशैर्बह्मरुद्राद्यैर्नवभिश्च द्विजोत्तमैः ॥५३॥प्रह्रादनारदवसुप्रमुखैर्भागवतोत्तमैः । स्तूयमानं पृथग्भावैर्वचोभिरमलात्मभिः ॥५४॥जय विजय सुनंद । कुमुदकुमुदाक्ष मुख्य पार्षद । अष्टौ हरीचे द्वास्थ विशद । पुण्यशील सुशील ॥४१०॥सनकसनंदनसनातन - । सनत्कुमारप्रमुख जाण । ऊर्ध्वरेते हे चौघे जण । कुमारगण यां नांव ॥११॥रुद्रेंद्रादि कमलासन । तदनुयायी मरुद्गण । वेदवेत्ते नव ब्राह्मण । मरीचिप्रमुख जाणावे ॥१२॥प्रह्रादप्रमुख भागवत । पावकप्रमुख समस्त । विष्णुपुरोगम अदितिसुत । पृथग्भावें स्तविताती ॥१३॥पार्षद स्वामिसेवकभावें । स्तविती विभूचीं अनंत विभवें । ऊर्ध्वरेते तपोगौरवें । ब्रह्मनिर्वाण विवरिती ॥१४॥पूर्णचैतन्य परमेश्वर । भावें स्तविती ब्रह्मादिहर । मरिच्यादि जे द्विजवर । म्हनती परतर प्रजापति ॥४१५॥प्रह्राद नारद सप्रेमभरित । भगवत्प्रियतम भागवत । स्तविती सर्वात्मा सर्वगत । भजनाभिमत सद्भावें ॥१६॥यज्ञभोक्ता भाविती वसु । आदित्य भाविती हा चंडांशु । अमलात्मे जे श्रेष्ठ पुरुषु । परदैवत भाविती ॥१७॥ऐसा बहुधा पृथग्भावीं । स्तूयमान सर्वत्र सर्वी । अमलसूक्तीं गणगंधर्वीं । देवीं मानवीं स्तविजेत ॥१८॥तैसाचि परम अमळभक्ति । भावें सेविती सर्वशक्ति । अल्प सांगों त्या संकेतीं । सावध श्रोतीं परिसिजे ॥१९॥श्रिया पुष्ट्या गिरा कांत्या कीर्त्या तुष्ट्येलयोर्जया । विद्ययाऽविद्यया शक्त्या मायया च निषेवितम् ॥५५॥सौभाग्यश्री जे ऐश्वर्यजननी । विश्वात्मका विश्वकुटुंबिनी । विश्वगोप्त्री तत्पर चरणीं । सेवेलागूनि देखिली ॥४२०॥तदनु ऐश्वर्यबृंहणा । जे कां पटुतर पुष्टिकरणा । लक्षूनि प्रभूच्या अवलोकना । पोषी त्रिभुवना ते पुष्टि ॥२१॥कल्याणरूपिणी सुमंगळ गिरा । वैखरी मध्यमा पश्यंती परा । प्रसवे श्रुत्यात्मकविचारा । यथाधिकारा द्योतक जे ॥२२॥तैसीच कांति लावण्यखाणी । सर्वीं सर्वत्र शोभा आणी । जीच्या प्रकाशें चातुर्यश्रेणी । सौंदर्य भूषणीं मिरवती ॥२३॥तदनुलक्षें सुसंतुष्टि । तुष्टे प्रभूचिये कृपादृष्टी । जीच्या लोभें सुरेंद्रकोटी । भवाब्धिपोटीं निमज्जती ॥२४॥आत्मतुष्टीवीण जें विभव । भवाब्धि हें त्याचेंचि नांव । तुष्टिलोभें वाढतां हाव । प्रभव पराभव पावती ॥४२५॥ते संतुष्टि प्रभूचिया ठायीं । तिष्ठे साकल्यें अक्षयी । जेंवि आकाशाचिये भुई । चांचल्य कहीं स्पर्शेना ॥२६॥इला म्हणिजे धरादेवी । अखिल ब्रह्मांडें वागवी । जीच्या ठायीं आधेयभावीं । वर्ते पदवी त्रिगुणाची ॥२७॥क्षांति दाति क्षमा नामें । जीच्या रूपाचीं माहात्म्यें । जयाच्या योगें महत्त्वगरिमे । पावती नियमें तपोधन ॥२८॥ऊर्जा म्हणिजे अभ्युदयकारिणी । ऊर्जितैश्वर्यप्रवर्धिनी । बिजेपासूनियां प्रतिदिनीं । सुधाकिरणीं जेंवि सुधा ॥२९॥विद्या म्हणिजे ज्ञानशक्ति । जीच्या उदयें भवविरक्ति । प्रकट होय आत्मरति । चित्संवित्ति जी नाम ॥४३०॥अविद्या भवभ्रमाची जननी । विषयसुखाची उभारणी । मृषा दृश्याचें पाजी पाणी । जीवांलागोनि प्रलोभें ॥३१॥सपल्लवें गंडूनि जीव । इहामुष्मिका आणी बरव । प्रवृत्तिप्रवाहाची धांव । जे सावेव विक्षिप्ता ॥३२॥विद्या केवळ मुक्तिदानी । अविद्या संसारप्रवर्धिनी । दोहींची जे मुख्य जननी । ते मायाभिधानीं बोलिजे ॥३३॥इत्यादि शक्ति ज्या अशेष । सादर तिष्ठती सेवेस । अक्रूर पाहोनि तो हृषीकेश । पावला तोष तें ऐका ॥३४॥विलोक्य सुभृशं प्रीतो भक्त्या परमया युतः । हृप्यत्तनूरुहो भावपरिक्लिन्नात्मलोचनः ॥५६॥ऐसा संकर्षणोत्संगीं । सगुण सलंकृतं शार्ङ्गी । अक्रूरें अवलोकुनी दिव्यदृगीं । झाला सर्वांगीं द्रवीभूत ॥४३५॥आमुचा वृष्णिकुलावतंस । तो हा श्रीकृष्ण पूर्णपरेश । सुरगण ब्रह्मादिप्रमुख दास । होऊनि ज्यास सेविती ॥३६॥अखिलशक्त्यात्मक जे माया । सर्वशक्तीसीं वोळगे पायां । हें परमैश्वर्य देखोनियां । उमसावया असमर्थ ॥३७॥हर्ष उचंबळला देहीं । स्तिमित झाल्या वृत्ति सर्वही । रोमांच उठिले लवलाहीं । नेत्र ठायीं पुंजाळले ॥३८॥स्वेदें बोलावलें गात्र । आनंदाश्रु ढाळिती नेत्र । सद्गद कंठ भंगला स्वर । झाला पात्र सत्त्वाष्टका ॥३९॥पादांगुष्ठादिमौळवरी । कंप दाटला सर्व शरीरीं । ऐसी सात्त्विकाष्टकसामग्री । तेव्हां अक्रूरीं प्रकटली ॥४४०॥स्तिमित वृत्ति झाल्या सर्व । त्यां नांव परिक्लिन्नभाव । हे सत्त्वावस्थासुखगौरव । महानुभाव जाणती ॥४१॥ऐसी दशा जे स्तिमितकरा । झाली ते ठायीं अक्रूरा । तीतें सांवरूनि पुढारां । कैसा स्तोत्रा प्रर्वतला ॥४२॥गिरा गद्गदयाऽस्तौषीत्सत्त्वमालंब्य सात्वतः । प्रणम्य मूर्ध्नाऽवहितः कृतांजलिपुटः शनैः ॥५७॥सप्रेमळ जे भगवद्भक्त । त्यांतें म्हणावे सात्वत । त्यांशींच ऐसी दशा प्राप्त । येर प्राकृत नेणती ॥४३॥यालागीं तो सात्वतप्रवर । नवां माजील षष्ठ अक्रूर । अवस्था जिरवूनि झाला सधर । प्राणप्रचार प्रवर्तला ॥४४॥मग हळूचि उघडूनि दृष्टि । सुखोत्कर्षा जिरवोनि पोटीं । सद्गदगिरा सकंपयष्टि । स्तोत्रपाठीं वेंठला ॥४४५॥करूनि बद्धांजलिपुट । नम्रमूर्धारहित मुकुट । नमस्कारूनि वैकुंठपीठ । स्तोत्रपाठ आदरिला ॥४६॥तया स्तवनाचिया श्रवणा । सावध करूनि कुरुभूषणा । शुक आदरी निरूपणा । त्या व्याख्याना अवधारा ॥४७॥ते चाळिसाव्यामाजीं कथा । श्रवणें निरसे दुस्तर व्यथा । बैसवी सच्चित्सुखाचे माथां । ते परमार्था सौभाग्य ॥४८॥तें हें श्रीमद्भागवत । परमहंस रमती येथ । भाषाव्याख्यान दयार्णवोक्त । टीका विख्यात हरिवरदा ॥४९॥एकाजनार्दनवरेंशीं । विरोधकृतीं फाल्गुनमासीं । कृष्णषष्ठी उत्सवदिवसीं । समाप्ति कथेसि प्रतिष्ठानीं ॥४५०॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां रामकृष्णाक्रूरमथुराभिगमनगोपीविरहाक्रूरयमुनास्नानविश्वरूपदर्शनयोगो नामोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥३९॥श्लोक ॥५७॥ टीका ओव्या ॥४५०॥ एवं संख्या ॥५०७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ( एकोणचाळिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १८२६५ ) एकोणचाळिसावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP