मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - सुखोपविष्टः पर्यंके रामकृष्णोरुमानितः । लेभे मनोरथान्सर्वान्पथि यान्स चकार ह ॥१॥शुक म्हणे गा परीक्षिति । रामकृष्णें अक्रूराप्रति । जेंवि विधि हर विष्णु पूजिती । तैसिया भक्तीं पूजिलें ॥२६॥वृद्ध आप्त गुरुसमान । अनन्य भावें सम्मानून । मंचकीं बैसविला वंदून । सुखसंपन्न तद्योगें ॥२७॥सुखें उपविष्ट पर्यंकीं । भावी हृत्कमळीं श्वाफल्कि । पथीं कल्पना केली जितुकी । कृष्णें तितुकी पुरविली ॥२८॥जे जे इच्छिले मनोरथ । ते ते लाभलों मी समस्त । प्रत्यक्ष भेटलिया भगवंत । अलभ्य त्रिजगांत मग काय ॥२९॥किमलभ्यं भगवति प्रसन्ने श्रीनिकेतने । तथापि तत्परा राजन्नहि वांछति किंचन ॥२॥ऐसा अक्रूर कुरुनरेशा । कृष्णें मानिता परमोह्लासा । पावोनि विसरला भवपथक्लेशा । अन्य दुराशां समवेत ॥३०॥राया नवल काय यदर्थीं । प्रसन्न जाहालिया कमलापति । काय अलभ्य भक्तांप्रति । ये त्रिजगतीमाजिवडें ॥३१॥ज्याचे चरणीं श्रीचें धाम । जो कां अवाप्तपूर्णकाम । तो तुष्टल्या पुरुशोत्तम । काय दुर्गम अप्राप्त ॥३२॥तथापि राया भगवत्पर । निष्काम भक्त निर्विकार । न धरिती कांहीं वांछा मात्र । कीं जालें पात्र प्रेमाचें ॥३३॥निष्काम भक्तांचिये द्वारीं । स्वयें परमात्मा आज्ञाधारी । न वांछितां सर्व सामग्री । अर्पूनि करी परिचर्या ॥३४॥बाळ न मागतां आंगी टोपी । अळंकारेंशीं माता वोपी । अनन्यभावास्तव ते जोपी । तेंवि संगोपी श्रीपति ॥३५॥एवं जे जे निष्काम भक्त । तांसी संगोप्ता भगवंत । काय तयांसी अप्राप्त । ते संतृप्त हरिप्रेमें ॥३६॥शुकें ऐसा भगवन्महिमा । आणि भक्तांचा निष्काम प्रेमा । निरोपूनियां नृपसत्तमा । कथानुक्रमा सांगतसे ॥३७॥सायंतनाशनं कृत्वा भगवान्देवकीसुतः । सुहृत्सु वृत्तं कंसस्य पप्रच्छान्यच्चिकीर्षितम् ॥३॥तोषवूनियां अक्रूराशीं । नंद बाळराम हृषीकेशी । करिते झाले भोजनाशी । सायंतनीय विध्युक्त ॥३८॥ऐशीं करूनियां भोजनें । तांबूल घेऊनि धरिलीं वसनें । मग अक्रूरासन्निध रामकृष्णें । स्नेहविधानें जाऊनी ॥३९॥भूतभविष्यवर्तमान । षड्गुणैश्वर्यसंपन्न । सर्ववेत्ता श्रीभगवान । देवकीनंदन जगदात्मा ॥४०॥तो कंसाचा अभिप्राव । आणि ज्ञातीसी सुहृद्भाव । इत्यादि वृत्तांत अक्रूरा सर्व । पुसता झाला एकांतीं ॥४१॥आणि अक्रूराचें अभ्यंतर । अवंचक्रभावाचा प्रकार । प्रकटावया कंसविचार । पुसे सविस्तर कर्त्तव्य ॥४२॥त्याचि कृष्णाच्या प्रश्नोक्ति । चौं श्लोकीं निरोपिजेती । राया ऐकें सादरवृत्तीं । म्हणे सुमति शुक वक्ता ॥४३॥श्रीकृष्ण उवाच - तात सौम्याऽगतः कच्चित्स्वागतं भद्रमस्तु वः । अपि स्वज्ञातिबंधूनामनमीवमनामयम् ॥४॥कृष्ण अक्रूरा करी प्रश्न । तात म्हणोनि संबोधून । क्षेमरूप कीं आगमन । भद्र कल्याण असे कीं ॥४४॥कुशल असे कीं परिवार । कुशल स्वागत पथसंचार । कुशल प्रज्ञा प्रताप शरीर । कुशल मत्पर स्नेह कीं ॥४५॥आणि स्वज्ञाति स्वबंधूंसी । अनमीव असे कीं सर्वांसी । अनामय ही समस्तांसी । असे म्हणोनि पुसिलें ॥४६॥स्वज्ञाति म्हणिजे सुहृद सापिंड । बंधूसंबंधी असा पिंड । ज्ञातिसमुच्चय उदंड । सात्वत वृष्णि कुकुरादि ॥४७॥अमीव पातकांचें नांव । तद्विपरीत तें अनमीव । एवं यदुकुळ निष्पाप सर्व । पुसे माधव कृपेनें ॥४८॥निष्पाप म्हणिजे पुण्यवंत । पुण्यफलोदय आनंदभरित । एवं यदुकुळ क्लेशातीत । पुसे अच्युत या भावें ॥४९॥आरोग्य म्हणिजे अनामय । पुसे यदूचा अन्वय । ऐसा येथींचा अभिप्राय । जें मुख्य आमय हृद्रोग ॥५०॥असतां कंसाचे संगतीं । दुर्लभ यदुवंशा विश्रांति । या लागीं आमुच्या सर्वज्ञाति । भोगिती विपत्ति सर्वदा ॥५१॥विपत्ती वरपडला जो प्राणी । तैं त्या सहजचि स्वधर्महानि । घडती पातकांच्या श्रेणी । पुसिलें म्हणोनि अनमीव ॥५२॥हृदयीं जागतां मरणभय । मग त्यां कैंचें अनामय । याचि उघडा अभिप्राय । पुसे यदुराय तें ऐका ॥५३॥किं नु नः कुशलं पृच्छे एधमाने कुलामये । कंसे मातुलनाम्न्यंग स्वानां नस्तत्प्रजासु च ॥५॥अक्रूरा कोमळ आमंत्रण । अंग शब्दें करी कृष्ण । म्हणे सखया तुजलागून । काय म्हणोन पुसतों मी ॥५४॥हें तंव सर्वांसि दिसे प्रकट । कंस सप्रताप वरिष्ठ । सर्वज्ञातींसी रोग स्पष्ट । वाढला असतां सुख कैंचें ॥५५॥आमचा नाममात्र मातुळ । एर्हवीं हा घातक काळ । त्याच्या प्रजा आमुचें कुळ । त्या कें कुशल तो असतां ॥५६॥हें म्यां काय तुम्हांसि पुसणें । अहो ऐसें खेदें म्हणे । देवकीवसुदेवां कारणें । कंसें जाचणें किमर्थ ॥५७॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP