मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर स्मरन्त्यश्चापराः शौरेरनुरागस्मितेरिताः । हृदिस्पृशश्चित्रपदा गिरः संमुमुहुः स्त्रियः ॥१६॥शूरसेनाचा जो कां नातु । शौरि तो हा कृष्णनाथु । त्याच्या वाणी हृदयाआंतु । विलासभरित आठविती ॥४॥अनुराग म्हणिजे प्रेमप्रीति । तत्पूर्वक ज्या मधुरोक्ति । हास्य करूनियां श्रीपति । वदे एकांतीं कांतारीं ॥१०५॥जिया वाणींचिया श्रवणें । मनें मूर्च्छितें मन्मथबाणें । मनोहारका मनोज्ञा म्हणणें । सुललितपणें रसपुष्टा ॥६॥जया वाणींच्या व्यापारीं । विचित्रचूर्णिकाप्रचुराक्षरीं । नवरसघटिका पदांच्या हारी । स्मरती नारी मोहिता ॥७॥आणिक कृष्णाच्या इंगिता । हृदयीं स्मरती स्नेहानुरक्ता । तें तूं परिसें कौरवनाथा । विरहव्यथा गोपींची ॥८॥गतिं सुललितां चेष्टां स्निग्धहासावलोकनम् । शोकापहानि नर्माणि प्रोद्दामचरितानि च ॥१७॥श्रीकृष्णाचे पदविन्यास । पाहोनि वेधले राजहंस । विसरोनियां मानसवास । केला सहवास हरिचरणीं ॥९॥हंस मृगेन्द्र शक्रयान । यांच्या गति जगतीं मान्य । सुललित कृष्णाचें गतिगमन । विस्मित देखोनि ते होती ॥११०॥पदविन्यासें निवे धरणी । स्पर्शें जंतूतें अमृतधणी । गतिइंगितें लक्षितां मनीं । मन्मथ मानिनी मोहितसे ॥११॥ऐसी लावण्यसुललित गति । तीतें गोपी हृदयीं स्मरती । विरहदुःखें विह्वळ होती । चित्तें कवळिती कृष्णातें ॥१२॥चेष्टा म्हणिजे विलासचर्या । संगीतसूत्रें संमत आर्या । स्मरोनि संतप्त होती नार्या । जेवीं अनार्यां भव तावी ॥१३॥तया चेष्टांचे अंतर्भाव । स्मितावलोकें प्रकटी सर्व । ह्री धी भी श्री शुक गौरव । क्रीडा वैभव सुस्निग्ध ॥१४॥सलज्जहासावलोकनें । मानिनी मूर्च्छिता मन्मथबाणें । तत्कौशल्यें बुद्धिवर्धनें । चातुर्यखुणे स्मरचर्या ॥११५॥लब्धसुखासी होय अभाव । तोचि शोकाचा प्रादुर्भाव । ऐसे अनेक भवोद्भव । भोगितां जीव संत्रस्त ॥१६॥मानसभंगें वियोगभय । अपांगमात्रें द्योतक होय । लावण्यलक्ष्मी मनम्थमाय । उपमा काय रौचर्या ॥१७॥ऐशिया बहुधा शोकांप्रति । अपहारका हरिनर्मोक्ति । रतिरसातें आणी व्यक्ति । मिथा एकांतीं क्रीडतां ॥१८॥रासरसिका नर्तनकाळीं । किंवा क्रीडतां यमुनाजळीं । रमतां पुलिनप्रदेशीं मृदुळीं । तदुचित बोलिलीं जीं नर्में ॥१९॥हरिकरसंस्पर्श निजांगसंधि । स्मरतां कमिनीं विरह बाधी । तेणें मानसीं बाधला आधि । असाध्य व्याधिसमसाम्य ॥१२०॥उद्दाम कृष्णाचें आचरित । गोपी सम्रती हृदयांत । नरसुरविधिहरही असमर्थ । कृष्णचरितआद्चरणीं ॥२१॥स्तिमित ठेले खेचरगण । गणकां न गणे रजनीमान । ऐसें उद्दाम कृष्णाचरण । तें त्या स्मरोन वधू रुदती ॥२२॥श्रीकृष्णाचे सुरतकाळीं । तौर्यत्रिकीं अमरपाळीं । करूनि पुष्पवृष्टि मोकळी । पिटिली टाळी आनंदें ॥२३॥प्रवाहत्यागें सरिता स्तिमिता । स्थावरजंगमविरहावस्था । खेचरभूचरादिकां समस्तां । रतिसुखास्था श्रीकृष्णीं ॥२४॥ऐसें चिंतूनि श्रीकृष्णचरित । गोपी हृत्कमळीं संतप्त । वियोगभयें विरहग्रस्त । जाल्या समस्त ते काळीं ॥१२५॥चिंतयंत्यो मुकुन्दस्य भीता विरहकातराः । समेताः संघशः प्रोचुरश्रुमुख्योऽच्युताशयाः ॥१८॥कृष्णासंगें जे केली क्रीडा । ते चिंतिती विगतव्रीडा । वियोगविरहदुःखें भ्याडा । एकीपुढीं एक वदती ॥२६॥थवे मिळूनि ठायीं ठायीं । परस्परें कथिती पाहीं । कृष्णक्रीडेची सुघडाई । स्मरोनि हृदयीं विलपती ॥२७॥जिहीं अच्युत कवळिला चित्तें । अच्युताशया म्हणिजे त्यातें । नेत्रीं बाष्पांबूचें भरितें । काय पैं तेथें त्या वदती ॥२८॥गोय ऊचु :- अहो विधातस्तव न क्कचिद्दया संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिनः । तांश्चाकृतार्थान्वियुनंक्ष्यपार्थकं विक्रीडितं तेऽर्भकचेष्टितं यथा ॥१९॥संगति योजूनियां कृष्णीं । सवेंचि मांडिली विघडणी । म्हणोनि दुःखें आक्रंदोनी । विधात्यालागोनि बोलती ॥२९॥अहो वचनें सखेद तया । म्हणती अरे विधातया । कांहींच नाहीं तुजला दया । परम निर्दया बालिशा ॥१३०॥तुझें कैसें हें मूर्खपण । कृष्णमैत्री संयोजून । प्रणयभावें स्नेहवर्धन । पुन्हा विघडण आदरिलें ॥३१॥जारप्रेमाचें जें मैत्र । तेथील रहस्य परम विचित्र । दुरावूनि स्वपतिपुत्र । चित्तें स्वतंत्र तन्निष्ठ ॥३२॥माता पिता बंधु बहिणी । सासू श्वशुर भावे वहिनी । गुह्य न वदवे त्यांलागोनी । जारा कर्णीं तें वदिजे ॥३३॥व्याही जांवई सोइरे । चुलते मामे आप्त सारे । त्यांतें दुरावूनि अंतरें । गुह्य उत्तरें जारेंसीं ॥३४॥सामान्य जाराची हे कथा । हा तो केवळ मन्मथजनिता । जारभावें वेधिलें चित्ता । अन्यवार्ता विसरलों ॥१३५॥कृष्णीं वेधूनि गेलीं चित्तें । प्रिय न वाटे कृष्णापरतें । कृष्णावेगळें स्वहितकर्त्ते । नसे त्रिजगातें धुंडितां ॥३६॥श्रीकृष्णाचें तोषें मन । तैसें करणें हिताचरण । आमुचें स्वहित जाणोनि कृष्ण । स्वयें आपण संपादी ॥३७॥कृष्ण जाणों मनींचा भाव । कृष्ण आमुच्या जिवाचा जीव । त्याच्या स्नेहाचें लाघव । कोणा अपूर्व वदवेल ॥३८॥कृष्णावेगळें आमुचें जिणें । शुष्कतृणरजाहूनिही उणें । श्रीकृष्णाच्या अंगीकरणें । ब्रह्मांड गणने न गणूं पैं ॥३९॥कृष्णावीण ग्रास न गिळे । कृष्णावीण तृषा न वोळे । कृष्णावीण शरीर न चळे । नेत्र आंधळे हरिविरहें ॥१४०॥घ्राण परिमळा कृष्णाविण । नेणे त्वगिंद्रिय संस्पर्शन । कृष्णावांचूनि नेणती श्रवण । शब्दीं विवरण अर्थाचें ॥४१॥शून्य कृष्णावीण संसार । वाटे सर्वत्रही हुर्हुर । अनोळख इंद्रियां उपचार । कृष्णीं अंतर पडतांची ॥४२॥ऐशा आम्ही कृष्णपरा । स्नेहें मैत्रें प्रेमसुभरा । आतां विघडितां निष्ठुरा । द्राव अंतरा केंवि न ये ॥४३॥असो आमुची ऐसी कथा । प्राणिमात्रा देहवंता । मैत्र योजूनि पुन्हा विघडितां । करुणा चित्ता न ये तुझिया ॥४४॥भणगा वाढूनि दिव्यान्नभाणें । पुन्हा जैसें हिरोनि नेणें । तैसें अतृप्ता विघडणी करणें । हें दूषण तव आंगीं ॥१४५॥बाळ मांडोनि खेळ मोडी । किंवा मैत्री लावोनि विघडी । तैसी तुझी वोखटी खोडी । बोलों उघडी तैं ऐक ॥४६॥यस्त्वं प्रदर्श्यासितुकुंतलावृतं भुकुन्दवक्त्रं सुकपोलमुन्नसम् ।शोकापनोदस्मितलेशसुंदरं करोषि पारोक्ष्यमसाधु ते कृतम् ॥२०॥विधात्या हें तुझें गर्हित कर्म । श्रीकृष्णाचें वदनपद्म । आमुच्या नेत्रांसि करूनि सुगम । पुन्हा दुर्गम करिसी पैं ॥४७॥कैसें कृष्णाचें वदनकमळ । ऐसा तेथींचा विशेष मेळ । जयावरी विखुरले कृष्णकुन्तल । प्रभा घननीळ लावण्य ॥४८॥गंडमंडित कुन्तलकांति । तरळ कुन्तल झळकताती । आकर्ण नयन मीनाकृति । उन्नत नासिका मिरवतसे ॥४९॥लेशमात्र मंदस्मित । चंचल अपांग विलासयुक्त । भ्रूविक्षेपें प्रमदाचित्त । चोरूनि नेत चारुत्वें ॥१५०॥कोटिक्षणदापतींचें लोण । उतरूनि पाहिजे सुंदरवदन । अनंतजन्मींचा शोकशीण । जाय हारपोनि तत्काळ ॥५१॥तें हें दावूनि आम्हांप्रति । वियोगें लपविसी कां मागुती । ऐसी तुझी असाधुमति । निर्दय चित्तीं तूं एक ॥५२॥पुन्हा म्हणती विधातियासी । तूं दत्तापहारी परम दोषी । दत्तापहरण कैसें म्हणसी । तरी तेविषीं अवधारीं ॥५३॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP