मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३९ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ३९ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर निमज्य तस्मिन्सलिले जपन्ब्रह्म सनातनम् । तावेव ददृशेऽक्रूरो रामकृष्णो समन्वितौ ॥४१॥निमज्य उन्मज्य वारत्रय । पूर्णांजलि भरोनि तोय । स्नानीं प्रयोग पढता होय । देशकालादि स्मरोनी ॥६७॥पुन्हा करूनि निमज्जन । अघमर्षण सूक्तपठन । करितां कृष्णीं झळंबे मन । तें लक्षण अवधारा ॥६८॥रामकृष्ण कोमळ बाळ । चाणूर मुष्टिक जैसे काळ । त्यांपें नेतों मीं चांडाळ । केवळ खळ शिशुघाती ॥६९॥कोणीकडे हे शिशु सुकुमार । मल्ल कोठें वज्रकठोर । अपाड त्यांसि जानोनि समर । हे शंका अक्रूर अवलंबी ॥३७०॥तें जाणूनि जगत्पति । करावया शंकानिवृत्ति । अघमर्षणीं अक्रूराप्रति । ऐश्वर्यशक्ति प्रकाशी ॥७१॥जळीं निमग्न पाहे नेत्रीं । रामकृष्ण कोमळगात्री । कां पां आले जळान्तरीं । म्हणोनि अंतरीं दचकला ॥७२॥तौ रथस्थौ कथमिह सुतावानकदुंदुभेः । तर्हि स्वित्स्यंदने न स्त इत्युन्मज्य व्यचष्ट सः ॥४२॥प्रार्थूनि रथीं म्यां स्थिर केले । जळामाजीं कैसे आले । तरी रथीं नसती म्हणोनि पाहिले । उन्मज्जन करूनियां ॥७३॥तत्रापि च यथापूर्वमासीनौ पुनरेव सः । न्यमज्जद्दर्शनं यन्मे मृषा किं सलिले तयोः ॥४३॥तंव रथींहि यथास्थित । आनकदुंदुभीचे सुत । बैसले देखोनि अक्रूरचित्त । परम विस्मित पैं झालें ॥७४॥मग म्हणे मज सलिलीं यांचें । दर्शन झालें असे साचें । तें काय मृषा या संशयाचें । निवारण करावया ॥३७५॥पुन्हा तैसाचि यमुनाजळीं । पाहे देऊनिया बुटकळी । तंव तो साग्रज वनमाळी । जळीं स्थळीं समगमला ॥७६॥भूयस्तत्रापि सोऽद्राक्षीत्स्तूयमानमहीश्वरम् । सिद्धचारणगंधर्वैरसुरैर्नतकंधरैः ॥४४॥सहस्रशिरसं देवं सहस्रफणमौलिनम् । नीलांबरं बिसश्वेतं शृंगैः श्वेतमिव स्थितम् ॥४५॥भूयः म्हणिजे तेथेंचि पुन्हा । पाहे निश्चळ करूनि नयना । देखता झाला शेषशयना । त्या विवरणा अवधारा ॥७७॥द्वादशश्लोकपर्यंत ध्यान । वदला व्यासाचा नंदन । त्यांत दों श्लोकीं संकर्षण । भगवद्वर्णन दशश्लोकीं ॥७८॥अहि म्हणिजे पन्नगयाति । अहीश्वर तो पन्नगपति । त्यातें अक्रूर कोणे रीती । कोणे स्थिती पाहतसे ॥७९॥सहस्रशीर्ष विशालतनु । सहस्र म्हणिजे गणनाहीनु । सहस्रशब्दाचें व्याख्यान । अनंत म्हणोनि श्रुति वदती ॥३८०॥सहस्रशीर्ष जो कां पुरुष । सहस्रपाद सहस्राक्ष । या श्रुत्यर्थामाजि दक्ष । अनंत अलक्ष लक्षिती ॥८१॥ज्यासि असतीं सहस्र शिरें । दोन सहस्र त्या असावीं नेत्रें । तस्मात् अनंत ऐसा चतुरें । सहस्रवाचक विवरावा ॥८२॥आणि ते यमुनेचिया ह्रदीं । अक्रूरें मस्तक मोजिले कधीं । मग ते सहस्रगणनाशब्दीं । वदला सुबुद्धि शुक वक्ता ॥८३॥एवं अनंत संकर्षण । प्रतिमस्तकीं शोभती फण । तद्युक्त मौळीं मणिभूषण । श्वेत संपूर्ण तनुशोभा ॥८४॥पद्मफुल्लारविसभासुर । तैसा श्वेतमस्तकनिकर । सहस्रशृंगी जेंवि गिरिवर । रजताकार कैलास ॥३८५॥एवं श्वेतशरीर पूर्ण । परिधान केलें नीलवसन । उदयाद्रिच्छायाचंडकिरण - । मंडित जैसा क्षीराब्धि ॥८६॥ऐसा साम्बर सालंकार । ज्यातें स्तविती निर्जर असुर । सिद्धचारणगंधर्वनिकर । नतकंधर होत्साते ॥८७॥सबाह्य भासुर सर्वांकडे । सर्व प्रकाशी निजउजिवडें । यालागीं देव म्हणणें घडे । कोणीं वांकुडें न म्हणावें ॥८८॥ऐसा अहीश्वर संकर्षण । त्यावरी कैसा श्रीभगवान । दहा श्लोकीं तें व्याख्यान । अन्वय संलग्न एकादशीं ॥८९॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP