मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर ममाद्यामंगलं नष्ट्म फलवांश्चैव मे भवः । यन्नमस्ये भगवतो योगिध्येयांघ्रिपंकजम् ॥६॥भगवत्प्राप्तीचें कारण । जें मज भगवत्प्रेमा पूर्ण । उदेला तेव्हांचि अकल्याण । भंगोनि कल्याण उदेलें ॥६८॥भगवप्रेमाची प्रवृत्ति । तेचि अमंगळाची हंती । आजि ते बहुवस उदेली चित्तीं । अमंगळशांति तद्योगें ॥६९॥माझें जन्म आजि सफळ । ऐसा निश्चय जाला अढळ । ज्या कारणास्तव तो घननीळ । भक्तवत्सल वंदीन ॥७०॥योगीश्वरां जे चूडामणि । तेही पदाब्ज पूजिती ध्यानीं । ते मी प्रत्यक्ष पाहोन नयनीं । साष्टांग मूर्ध्नि वंदीन ॥७१॥ज्याचिया चरणरजाचे प्राप्ती । पंकजभव भव सकाम चित्तीं । सनकादि तपश्चर्या करिती । ध्यानीं हरिमूर्ति पहावया ॥७२॥आजि कंसाच्या निदेशमात्रें । ते मी प्रत्यक्ष पाहीन नेत्रें । कंस उपकार वर्णी वक्त्रें । स्फुरती गात्रें हरिप्रेमें ॥७३॥कंसो बताऽद्याकृत मेऽत्यनुग्रहं द्रक्ष्येंऽघ्रिपद्मं प्रहितोऽमुना हरेः । कृतावतारस्य दुरत्ययं तमः पूर्वेऽतरन्यन्नखमंदलत्विषा ॥७॥बत शब्दार्थें आश्चर्य परम । मानूनि म्हणे हा कंस विषम । तो मजला कल्पद्रुम । हरिपदप्रेमफळदानें ॥७४॥कंसें अनुग्रह केला मज । जे आणावयासि गरुडध्वज । प्रेरिलों यास्तव अधोक्षज । पाहोनि पदाब्ज वंदीन ॥७५॥जो कां केवळ परब्रह्म । तो हा श्रीकृष्ण पुरुषोत्तम । साधुरक्षक वधूनि अधम । स्थापक धर्म अवतरला ॥७६॥कंसाज्ञेवरूनि त्याचे । आजि पदाब्ज मी पाहीन साचे । जिहीं पूर्वीं बहु भक्तांचें । अंधतमिस्र निरसिलें ॥७७॥अंबरीषादि राजर्षिवृंद । आश्रयूनि जें चरणारविंद । तामस दुरत्यय अगाध । तो भवसिंदु निस्तरले ॥७८॥अज्ञानतमाब्धि भव हा निबिड । तेथ हरिपदनखमार्तंड । तत्प्रकाशें तरले सुघड । अल्पही अवघड न मनूनी ॥७९॥ते मी आजि कंसकाजें । पाहीन भगवत्पदांबुजें । कृपा केली अधोक्षजें । येर्हवीं नुमजे हरिगरिमा ॥८०॥यदर्चितं ब्रह्मभवादिभिः सुरैः श्रिया च देव्या मुनिभिः ससात्वतैः ।गोचारणायानुचरैश्चरद्वने यद्गोपिकानां कुचकुंकुमांकितम् ॥८॥हरिपदगरिमा कोणेपरी । जेथींची अचिंत्य गुणसामग्री । वर्णूं न शकेचि वागीश्वरी । मां केवि ते इतरीं उमाणिजे ॥८१॥ऐश्वर्यसत्तायोगवरिष्ठ । म्हणोनि कंजज नीलकंठ । सदैव अर्चूनि हरिपदपीठ । नमिती मुकुटसंघृष्टि ॥८२॥आदि शब्दें तो ईश्वर । ज्याचे विधिहर गुणावतार । तोही न पवे ऐश्वर्यपार । म्हणोनि तत्पर पदभजनीं ॥८३॥असो हे ऐश्वर्याची गरिमा । परी सौभाग्यविभागें आगळी रमा । तेही लंपट हरिपदपद्मा । लावण्यमहिमा विसरूनि ॥८४॥क्षीराब्धिमथनीं सुरवरकोटि । विधिहरादि लक्षूनि दृष्टिं । हरिपदकमळीं घालूनि मिठी । येरें करंटीं उपेक्षिलीं ॥८५॥निलयललनाललामलास्या । लक्षूनि लालस लिगटती तोषा । सांडूनि कैवल्य सुखाची आशा । भवदुर्दशाभिभूत ॥८६॥कांताकनकादि निकेतनीं । कमनीयत्व कौशल्यगुणीं । ग्रथित ग्रस्तांच्या देखोनि श्रेणी । निर्मुक्त मुनि तत्त्यागें ॥८७॥श्रीसौभाग्या देऊनि पाठी । सदन सुंदरी सुवर्णकोटी । निगड क्ष्वेड बडिश पोटीं । मानून हठी निष्टले ॥८८॥ऐसे भवरसरतिविरक्त । मुनिजन सज्जन सात्वत भक्त । तेही होऊनि पदाब्जनिरत । परमपुरुषार्थ साधिला ॥८९॥अपवर्गार्थ सात्वत मुनि । रंगले ज्याचिये श्रीपदभजनीं । त्याची प्राप्ति सामान्य जनीं । लाहिजे कोठूनि जरी म्हणिजे ॥९०॥राजा दुर्गम दुर्गांतरीं । द्वास्थ पार्षद वेत्रधारी । उद्भट भटसंघ गोप्तारीं । केंवि पामरीं तो भजिजे ॥९१॥मृगयायात्रायानीं वनीम । सर्वां सुलभ नृप दर्शनीं । म्हणाल तरि तो तेही स्थानीं । पार्षदगणीं अभिगुप्त ॥९२॥राजा अल्पक मानवकोटीं । तत्प्राप्तीची दुर्लभ गोठी । मा ज्यातें नमिती विधि हर मुकुटीं । त्याची भेटी केंवि घडे ॥९३॥तरी हा केवळ जगज्जीवन । परम कृपाळु श्रीभगवान । सवें घेऊनि अनुचरगण । धेनुरक्षणकार्यार्थ ॥९४॥भूतमात्राच्या कारुण्यें । चरणीं न घालूनि पादत्राणें । गोगोपनार्थ विचरे वनें । अंतःकरणें कळवळुनी ॥९५॥तेथ चरणस्पर्शासाठीं । मोक्ष पावतीकोट्यानुकोटी । नाहीं कोण्हाही आडकाठी । कृपाळु पोटीं सर्वज्ञ ॥९६॥कित्तेक दर्शनें संस्पर्शनें । स्मरणें क्रीडनें अवलोकनें । अनुचिंतनें संभाषणें । ध्यानें नमनें उद्धरती ॥९७॥अनंत तपांची सामग्री । जिहीं अच्छिद्र बांधिली पदरीं । ते येथ तृणादिदेहधारी । हरि उद्धरी पदस्पर्शें ॥९८॥शास्त्रपरिभाषाप्रसिद्धि । कर्माचरणें चित्तशुद्धि । जालिया होय ज्ञानोपलब्धि । हरिसन्निधि तैं जोडे ॥९९॥तैसा येथें दुर्घट काहीं । साधनांचा पांगडा नाहीं । हरिपदप्रेमा उदेल्या देहीं । सुलभ सर्वांही सर्वत्र ॥१००॥कोण गोपींचीं कर्माचरणें । कीं वेदसास्त्राध्ययनें पठनें । योगाभ्यसनें पुरश्चरणें । अपरोक्षज्ञानें त्यां कैंचीं ॥१॥निःसीम अनन्य प्रेमा देहीं । अवंचकभावें अनुरत पायीं । विरत जाणोनि देहीं गेहीं । देहीं विदेही त्या स्मरवी ॥२॥कुंजसदनीं यमुनापुलिनीं । वृंदावनीं गोवर्द्धनीं । सुलभ गोपींतें अनुदिनीं । हरिपदनलिनीं कुचघृष्टि ॥३॥एवं स्वर्चित विधिहरप्रमुखीं । लक्ष्मी ज्याच्या भजनें सुखी । मुनिजन सात्वत उपासकीं । ओक्षकामुकीं जें सेव्य ॥४॥जे पद वयस्यानुचरगणीं । मिश्र फिरती वृंदाविपिनीं । अनुकंपार्थ गोचारणीं । ते आजि नयनीं पाहीन ॥१०५॥गोपीकुचकुंकुमपंकिल । तळवां सामुद्रसुचिह्नमेळ । अघहर जेथें गंगाजळ । त्रिजगन्मंगळ संभवलें ॥६॥ऐसें ज्याचें पादारविंद । तो आजि पाहीन मी गोविंद । उजवे जाती कुरंगवृंद । फलितार्थ विशद हा त्याचा ॥७॥हरि अवतरला दैत्यदलना । तो आजि गोचर होईल नयना । सुंदर अवयव आणुनि ध्याना । करी चिंतना तें ऐका ॥८॥द्रक्ष्यामि नूनं सुकपोलनासिकं स्मितावलोकारुणकंजलोचनम् ।मुखं मुकुंदस्य गुडालकावृतं प्रदक्षिणं मे प्रचरंति वै मृगाः ॥९॥कृष्णमृगांचिया पंक्ति । प्रादक्षिण्यें शकुन देती । बहुतेक आजी कृष्णमूर्ति । शुभसंकेतीं देखेन ॥९॥त्या कृष्णाचें सुंदर मुख । अरुणापांग सरळ नासिक । आकर्णनयन केशर तिलक । स्मितभा मृगांक लाजवी ॥११०॥कुंडलमंडित गंडयुगळ । गुडालक म्हणजे कुटिल कुंतळ । सुभगलावण्यलक्ष्मी बहळ । तें मुखकमळ पाहीन मी ॥११॥ऐसे संकल्प करूनि पोटीं । असंभावना परती लोटी । हृदयपल्लवीं शकुनगांठी । बांधोनि गोठी हे बोले ॥१२॥अप्यद्य विष्णोर्मनुजत्वमीयुषो भारावताराय भुवो निजेच्छया । लावण्यधाम्नो भवितोपलंभनं मह्यं न न स्यात्फलमंजसा दृशः ॥१०॥ऐसें चिंतूनि कृष्णवदन । नावरे प्रेमाचें अवतरण । पुनरपि साकल्यें चिंतन । करी सद्गुणसमवेत ॥१३॥निजजनाचे इच्छेकरून । मनुष्यवेष अवलंबून । विष्णु म्हणिजे व्यापक पूर्ण । त्याचें दर्शन लाहीन मी ॥१४॥कोण्या कारणें मनुष्य होणें । तरी भूभार फेडावयाचि कारणें । अखिल लावण्या मिरवणें । आश्रय होऊनि निज तेजें ॥११५॥जया तेजाचा कवडसा । पवाड होय विश्वाभासा । निवाड त्याचिया लावण्यरसा । कोणा सौरस करावया ॥१६॥ज्याची चित्प्रभा चराचरीं । लावण्यरसाची माधुरी । रंगें रोचक गोगोचरीं । तो वैखरी केंवि वदवे ॥१७॥त्या विष्णूचें लावण्यरूप । आजि पाहीन मी सकृप । सकळ होईल हा संकल्प । तैं भाग्य अमूप नेत्रांचें ॥१८॥ऐसें न घडे काय म्हणून । अवश्य घडेल हा निश्चय पूर्ण । तरीच होती मज शुभ शकुन । वृथा अनुमान कां कल्पूं ॥१९॥तस्मात् न घडे ऐसें नव्हे । होईल हा निश्चय जीवें । करितां पुढती शंका शिवे । विवेकविभवें ते निरसी ॥१२०॥तें चौ श्लोकांचें कुलक । श्लोकत्रयें शंकापंक । निरसूनि तोष दर्शनात्मक । चौथा श्लोक उपपादी ॥२१॥तरी ते शंका म्हणाल कैसी । कर्तृत्वभोक्तृत्वादि आवेशीं । कृष्णीं प्रवृत्ति आम्हांचि ऐसी । तैं विष्णुत्व त्यासी केंवि घडे ॥२२॥इये शंकेच्या निरसनीं । विवरण वदली अक्रूरवाणी । शुकें घातली नृपाकर्णीं । ते घ्या श्रवणीं अवधानें ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP