मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| आरंभ अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरब्रह्मणे नमः ॥ वेद्यवेदनवेदकत्रिपुटी । ज्याचेनि प्रकाशें नेत्रपुटीं । ज्ञेय ज्ञान ज्ञातृत्व पोटीं । घालूनि उलटी गोचर्या ॥१॥जें होय जयाचें नेतार । तया साधन म्हणिजे नेत्र । एवं ज्ञानेंद्रियांचा निकर । त्रिपुटीप्रसर विस्तारी ॥२॥चिदाभासें भ्रमलेपणें । अविद्यावरणीं आंधळें होणें । तया विक्षेपें भेटवणें । वेद्य दृश्य नाथिलें ॥३॥जें जें बाह्य विषयभान । आब्रह्मभुवनादि विस्तीर्ण । नेत्रपुटीं त्याचें वयुन । साच होऊन प्रतिभासे ॥४॥एवं नेत्रावच्छिन्न वयुन । अबाह्यें बाह्य प्रकाशून । वेद्य ऐसें त्या अभिधान । ठेवून वदन स्वयें होय ॥५॥वेत्तृत्व जीवचैतन्या शिरीं । देऊन विषयां वेद्य करी । वेदन होऊनि जे माझारी । त्रिपुटी उभारी भ्रमगर्भीं ॥६॥तया भ्रमाचे भ्रमणचक्रीं । भ्रमिजे सुरनरखेचरचक्रीं । जैंवी शफरीं मकरीं नक्रीं । टपिजे परस्परीं ग्रासार्थ ॥७॥द्वैत नसोनि अनेकता । वैर नसोनि अमित्रता । भ्रमें वरपडतां प्राकृता । दुजा उमजवितां न भेटे ॥८॥तेथ उलटूनि नेत्रचर्या । मिथ्यात्व बोधिसी दृश्या ज्ञेया । ज्ञान ज्ञातृत्वीं नेसी लया । श्रीगुरुराया गोविंदा ॥९॥ऐसा तुझा कृतोपकार । वर्णूं न शकती विधि हर अमर । तेथ फेडावया सधर । कोण परतर अद्वैती ॥१०॥यालागिं जोंवरी स्मरणधर्म । तोंवरी सद्गुरूवेगळें ब्रह्म । भावील तो पामर अधर । अंधतम पावेल ॥११॥पुढें स्मरणधर्मा पाठीं । अभेदबोधें ऐक्यगांठीं । स्मरण असतां ऐक्य प्रकटी । तोही सृष्टी मूढात्मा ॥१२॥सद्गुरु केवळ परब्रह्म । अवगमल्याही विगतभ्रम । अगाध मर्यादेचा नेम । परमनिःसीम अनुल्लंघ्य ॥१३॥यावत्कल्पांतक देहो । तावन्मर्यादाप्रवाहो । गुरुभजनात्मक बोलिला पहा हो । पार्वतीनाहो गुरुगीते ॥१४॥अद्वैतबोधें लोकत्रयीं । वर्तत असतां भेदक्षयीं । तथापि गुरुभजनाच्या ठायीं द्वैत देहीं उरवावें ॥१५॥जेथ विराला स्मरणधर्म । तेथ आपण सद्गुरुब्रह्म । ये त्रिपुटीचें मोडलें नाम । अनियम नियम तें भजन ॥१६॥अमोघ ऐसी भजनरहाटी । मादृश पामरां दुर्लभ सृष्टी । म्हणोनि वोवियेच्या परिपाटीं । हे वाक्पुटीं वाखाणूं ॥१७॥जैसीं पामरें निदैवें । काय जाणती साम्राज्यविभवें । दळणीं कांडणीं तिहीं गावें । मनाचे हावे पुरवावया ॥१८॥तेंवि गोविंदा तुझें भजन केंवि लाहे मी हीन दीन । यास्तव ग्रंथार्थमिसें स्तवन । करूनि वाङ्मन विनवितसें ॥१९॥श्रीआज्ञेचें मंगलसूत्र । लाहूनि मम वाणी पवित्र । कृष्णावतारबाळचरित्र । यथार्थसूत्र वाखाणीं ॥२०॥तेथ अध्याय सदतिसावा । व्योमा वधूनि संपला आघावा । आतां अक्रूरा आणि केशवा । भेटी होईल सप्रेमें ॥२१॥केशिवध नारदस्तव । आणि वधिला व्योमदानव । हें ऐकोनि कुरुपार्थिव । प्रश्न स्वमेव करूं इच्छी ॥२२॥श्रीकृष्णाचें अगाध चरित । ऐसे मारिले अपार दैत्य । अक्रूरभेटी कथावी त्वरित । हें नृपाचें आर्त समजोनी ॥२३॥भूतभविष्यद्वर्तमान । जाणतां योगींद्र शुक सर्वज्ञ । तेणें भूपति न करितां प्रश्न । अभीष्ट व्याख्यान आदरिलें ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : May 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP