मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७ वा| श्लोक ३६ ते ३७ अध्याय ७ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ अध्याय ७ वा - श्लोक ३६ ते ३७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ३७ Translation - भाषांतर खं रोदसी ज्योतिरनीकमाशाः सूर्येन्दुवह्निश्वसनांबुधींश्च । द्वीपान्नगांस्तद्दुहितॄर्वनानि भूतानि यानि स्थिरजंगमानि ॥३६॥जांभईमिसें पसरिलें मुख । जैसा दर्पण केलिया सन्मुख । आपणा मागील पर्वत रुख । तेथ अशेप बिंबती ॥१३॥कां पर्वत निकटींचे धवळारी । पर्वत देखिजे गवाक्षद्वारीं । किंवा मानससरोवरीं । बिंबे हिमाद्रि मेरूसीं ॥१४॥तेंवि बाळका वदनीं पाहे । अवघें चराचर देखती होय दिशाचक्रेंसी व्योम आहे । भूतसमूहें सम मही ॥४१५॥गगनीं दिसती चंद्रसूर्य । ज्योतिश्चक्र ज्योतिर्मय । पवन पावक सिंधुतोय । देखे माय सुतवदनीं ॥१६॥द्वीपें खंडें कुळाचळ । वृक्ष गुल्मलता सकळ । जलचर वनचर पक्षिकुळ । देखे वेल्हाळ यशोदा ॥१७॥पर्वतशिखरें नानापरी । नद्या जन्मल्या पर्वतोदरीं । पुण्यसरितांचिये तीरीं । पुण्यक्षेत्रीं जन वसती ॥१८॥अयोध्या मथुरा मायापुरी । काशी कांची अवंती नगरी । कुशस्थळी सर्वां शिरीं । गोमती तीरीं मोक्षदा ॥१९॥लक्षचौर्यांयशी योनिभेद । भूतभौतिकें नानाविध । यात्रा उत्सव कीर्तनानंद । सज्जनवृंद सुरसेना ॥४२०॥श्वेतारण्य वेदारण्य । दंडकारण्य पुष्करारण्य । चंपकारण्य नैमिषारण्य । पुण्य पावन देखिलीं ॥२१॥वनें उपवनें उद्यानें । अटवी कांतारें काननें । ब्रह्मारण्यें गहनें विपिनें । दुर्गमस्थानें देखिलीं ॥२२॥पश्वादिकें गोळांगुळें । तुरंग उरग नागकुळें । देखोनि ब्रह्मांडचि सगळें । दचकोनि डोळे झांकिले ॥२३॥सा वीक्ष्य विशं सहसा राजन्संजातवेपथुः । संमील्य मृगशावाक्षी नेत्रे आसीत्सुविस्मिता ॥३७॥द्वैपायनि म्हणे नृपा । यशोदेवरी करूनि कृपा । वदनीं दाविलें विश्वरूपा । झाला सोपा एथवरी ॥२४॥परंतु वैष्णवी मायापट । ब्रह्मादिकां नुपजे कपट । तेथ गवळीयें रानगट । केंवि स्पष्ट उमजती ॥४२५॥म्हणोनि अकस्मात यशोदा जननी । देखोनि विश्वरूप बाळका वदनीं । कंप दाटला गदगदोनि । आले दचकोनि रोमांच ॥२६॥मग ते मृगशावविशालनयना । भयभीत संभ्रमें झांकी लोचना । विस्मय पूर्ण दाटला मना । मधुसूदना आठवी ॥२७॥जगद्व्यापका जगन्मया । जगद्रूप हे तुझी माया । पूर्ण कृपेनें ओपी अभया । निरसूनि भया संरक्षीं ॥२८॥ऐशी कथा हे परीक्षिति । ऐकोनि संतोष पावला चित्तीं । पुढील प्रश्नाची करावी विनति । योगींद्राप्रति तें कळलें ॥२९॥सावध करोनि तो नृपनाथा । नामकरणादि सांगेल कथा । जें ऐकतां निरसी व्यथा । विघ्नें माथा नुरवती ॥४३०॥कासया मोक्षार्थ साधनें । सायुज्यप्राप्ति सुगम श्रवणें । विमुख त्यांचें दैव उणें । नलगे सांगणें चतुरासि ॥३१॥अधिष्ठान प्रतिष्ठानीं । चिन्मात्रैकसाम्राज्यदानीं । स्वानंदसुखाच्या सिंहासनीं । जो अनुदिनीं उपविष्ट ॥३२॥भेदशत्रूचें छेदोनि वक्त्र । अभेदसार्वभौम स्वतंत्र । एकात्मता एकच्छत्र । सर्वीं सर्वत्र एकाज्ञा ॥३३॥भूतदयेचा रक्षूनि तंतु । भजनभाग्यें भाग्यवंतु । दोषदरिद्रा कीजे अंतु । हे संतत अनुज्ञा ॥३४॥ निष्काम श्रुतिसंमताचारें । ईश्वरानुग्रहें सद्विचारें । सद्गुरुकृपामृततुषारें । भवभेउरें नुरवावें ॥४३५॥ऐसें याचें अनुशासन । शत्रुशकटावरी शासन । शमदमवंत सभास्थान । शोभे सन्मानपूर्वक ॥३६॥विवेक विचार उभयमंत्री । बोध सद्भाव विदुषशास्त्री । उपनिषदार्थकथा श्रोत्री । पुण्यचरित्रीं तोषविती ॥३७॥ऐसा एकनाथ चक्रवर्ती । लोकत्रयीं कल्याणकीर्ति । ब्रह्मब्रह्मण्य अमूर्तमूर्ति । सत्प्रवृत्तीं प्रकटला ॥३८॥तेथ कृष्णदयार्णवानुचर । निशाणदुंदुभींचा उत्साह गजर । गाजूनि मुमुक्षुत्वअधिकार । करी सादर जिज्ञासु ॥३९॥इति श्रीमद्भागवत । अठरासहस्रसंख्यागणित । पारमहंस्यसंहितामृत । शुकप्रणीतपुरान ॥४४०॥यामाजिं हा दशम स्कंध । शकटतृणावर्तांचा वध । महाराष्ट्रटीका श्रीहरिवरद । कैवल्यप्रद श्रोतयां ॥४१॥गोविंदचरणपंकजभ्रमर । श्रीकृष्णदयार्णवानुचर । श्रोतयां करी नमस्कार । कथा सादर परिसाव्या ॥४२॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां शकटतृणावर्तभंजनविश्वरूपदर्शनाख्यानत्रयं नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोकसंख्या ॥३७॥ ओंवीसंख्या ॥४४२॥ एवं संख्या ॥४७९॥ ( सात अध्याय मिळून ओवीसंख्या ४३७२ )सातवा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP