अध्याय तेरावा

श्रीनित्यानंदतीर्थविरचित श्रीमार्कण्डेयपुराणांतर्गत श्रीदेवीविजय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऋषी म्हणे हें राजा तुज सांगितलें ॥ उत्तम देवीचें माहात्म्य सकळ ॥ ऐसा देवीचा प्रभाव प्रबळ ॥ जिनें जग सकळ धारण केलें ॥१॥
विद्याही तसेंच करी जाण ॥ महाविष्णूच्या मायें करून ॥ तिनें तुला या वैश्यालागून ॥ तैसेंचि अन्यें विवेक्याही ॥२॥
प्रस्तुत मोहिते मागें मोहिलें बहुत ॥ पुढेंही मोहील आणिक ते ॥ तूं तिसीच हे नृपते ॥ शरण जाई परमेश्वरीसी ॥३॥
तिसी जे शरण गेले नर ॥ स्वर्ग मोक्ष पावले भोग अपार ॥ मार्कंडेय म्हणे ऋषिवाक्य ऐकूनि सत्वर ॥ सुरथनृपवर तेव्हां तो ॥४॥
भागोरी रे सुमेधा ऋषीसी जाण ॥ नमन करूनि सुरथ राजानें ॥ झाला विरक्त मोहापासून ॥ राज्यहरण त्याहीपासूनी ॥५॥
तात्काळ गेला तपासी ॥ भागोरी रे संगे घेऊ वैश्यासी ॥ अंबेच्या घ्यावया दर्शनासी ॥ नदी बाळवंटीसी बैसला ॥६॥
वैश्यही तेथें तप करीत ॥ देवीपर जपे सूक्त ॥ त्यांनीं त्या वाळवंटीं देवी तें ॥ मृत्तिकेची मूर्ति करूनी ॥७॥
तीसी पूजासामग्री संपूर्ण ॥ पुष्पधूप अग्नितर्पण ॥ उपवासी करिती जाण ॥ तन्मय होऊन शुद्ध मनें ॥८॥
तीसी ते करिती बळिदान ॥ जे गात्ररक्त उत्पन्न ॥ ऐसें करितां आराधन ॥ वर्षत्रय संपूर्ण नेमेसी ॥९॥
जगन्माता संतोषली ॥ प्रत्यक्ष त्यांसी बोलती झाली ॥ देवी म्हणे राजा ॥ जे प्रार्थिशील ये काळीं ॥ वैश्या तुवांही केली जे इच्छा ॥१०॥
तें तें मागूनि घ्या सकळ ॥ देईन तुम्हां मी संतोषलें ॥ मार्कंडेय म्हणे राजानें राज्य मागितलें ॥ भ्रष्ट झालें जें पूर्वकाळीं ॥११॥
राज्य माझें येचि काळें ॥ शत्रूनें जे हरण केलें बळें ॥ वैश्यानेंही त्या मागितलें ॥ वैराग्य तात्काळ होऊन ॥१२॥
माझें हे भागोरी देख ॥ हा संग नाशकारक ॥ देवी म्हणे राजा स्वल्प देख ॥ स्वराज्य सकळिक पावशील ॥१३॥
शत्रू मारूनि अस्खलित ॥ राज्य पावशील समस्त ॥ मेल्यावरी होईल प्राप्त ॥ जन्म निश्चित सूर्यापासून ॥१४॥
सावर्णिमनू म्हणून ॥ पृथ्वीवरी होसी उत्पन्न ॥ मार्कंडेय म्हणे त्याशीं देवीनें ॥ इच्छिलें वरदान दिधलें ॥१५॥
तात्काळ ते गुप्त झाली ॥ भक्ति करूनि त्यांनीं स्तविली ॥ देवीपासूनि वर पावला ते काळीं ॥ राजा बळी सुरथ तो ॥१६॥
सूर्यापासूनि जन्म पावूनि ॥ मनू झाला तो सावर्णी ॥ ऐसी कथा ऋषीवर्णी ॥ राजालागूनी सर्वही ॥१७॥
ऐसी कथा राजालागुन ॥ सुमेधा ऋषी सांगे आपण ॥ तेचि कथा मार्कंडेय ऋषीनें ॥ भागोरी ऋषीसी संपूर्ण सांगितली ॥१८॥
श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेय पुराण संमत ॥ नित्यानंद श्रोत्या विनवी ॥ पुढील श्रवणार्थ कथेसी ॥१९॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ त्रयोदशाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय त्रयोदशाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP