मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|देवी विजय| अध्याय आठवा देवी विजय श्रीनित्यानंदतीर्थ यांचा परिचय देवीची पूजाविधी व फलप्राप्ती मंगलाचरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा श्रीदुर्गास्तोत्र श्रीमहालक्ष्मी स्तोत्र नामावली जप नवरात्रसंकल्प श्रीमहालक्ष्मीची आरती अध्याय आठवा श्रीनित्यानंदतीर्थविरचित श्रीमार्कण्डेयपुराणांतर्गत श्रीदेवीविजय. Tags : devimarathipuranदेवीपुराणमराठी अध्याय आठवा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ऋषी म्हणे चंड असुर ॥ मुंडही मारिला महावीर ॥ सैन्य त्याने अपार ॥ मारिले समग्र दैत्य तेव्हां ॥१॥शुंभ मोठा प्रतापवान ॥ झाला तो कोपपराधीन ॥ उद्योग मांडिला सर्व सैन्य ॥ आज्ञा तेणें दैत्यें केली ॥२॥आजि असुरसैन्य सर्वस्वें ॥ शहाऐशीं आयुधांसी सिद्ध व्हावें ॥ चौर्यांशीं कंबू सन्नध असावें ॥ शीघ्र निघावें स्वसैन्येसी ॥३॥पंचातत्कोटिवीर्यवान ॥ असुर कुळेजकुळीन ॥ धूम्राची शतही कुळें जाण ॥ माझ्या आज्ञेनें निघा सर्व ॥४॥कालकदौहृदमौर्यवीर ॥ कालिकेयही महाअसुर ॥ युद्धालागीं निघावें सर्वत्र ॥ आज्ञेनें सत्वर माझिया ॥५॥ऐसा आज्ञापी दैत्येश्वर ॥ शुंभाची आज्ञा भयंकर ॥ निघाली सेना अपरंपार ॥ महास्त्रसंभार घेऊनी ॥६॥असुरसेना अतिभीषण ॥ येतां पाहिली चंडिकेने ॥ धनुष्य टणत्कार शब्दें पूर्ण ॥ धरिणी गगन भरोनि टाकिलें ॥७॥सिंहे तेव्हां मोठी आरोळी ॥ सत्राणें राजा हांक दिधली ॥ घंटानादही तें वेळीं अतिशय केला अंबिकेनें ॥८॥धनुर्ज्याघंटानादें ॥ दशदिशा भरला शब्द ॥ काळीही मुख पसरोनि अगाध ॥ केला नाद भयंकर ॥९॥तो मोठा नाद ऐकून ॥ चहूं दिशा दैत्यसैन्य ॥ देवी सिंह काळी जाण ॥ तिघेही दारुण कोपले ॥१०॥ऋषी म्हणे राजा यानंतरें ॥ माराव्या देवीद्वेष्टे असुर ॥ रहावया क्षेमें अमर ॥ वीर्यें अपार बळिवंत ॥११॥ब्रह्माविष्णूमहेशाच्या ॥ आणीकही शक्ती इंद्रादिकाच्या ॥ शरीरापासूनि निघाल्या ॥ स्वस्वरूपें अंबेच्या त्यासमीप आल्या ॥१२॥नाना देवांची रूपें जैसी ॥ वाहनें भूषणें त्याचाचि ऐसी ॥ शक्ती ज्याची त्याचा तैसी ॥ आल्या युद्धासी दैत्यसवें ॥१३॥हंसयुक्त विमानावरी । अक्ष सूत्र कमंडलू करी ॥ आली ब्रह्मशक्तीची स्वारी ॥ ब्रह्माणीया परी म्हणती तिसी ॥१४॥माहेश्वरी वृषारूढ ॥ करी घेऊनि त्रिशूल दृढ ॥ आली वेष्टूनि सर्प प्रचंड ॥ चंद्रखंडविभूषित ॥१५॥कौमारी शक्ती घेऊनी ॥ मयूरवाहनी बैसुनी ॥ युद्धा आली दैत्यरणी ॥ गृहरूपिणी अंबिका ॥१६॥तशीच विष्णूशक्ती ही जाण ॥ गरुडवाहनी बैसुन ॥ शंखचक्र गदाशार्ङ् ॥ खङ्ग घेऊन युद्धा आली ॥१७॥यज्ञवराह अवतारीं ॥ ज्यासी सर्वत्र म्हणती हरी ॥ त्याची ही निघोनि शक्ति शरीरीं ॥ रणामाझारी वाराही आली ॥१८॥नृसिंहशक्ती नारसिंही ॥ त्याच्याच शरीरा ऐसी तेहीं ॥ सकोपें युद्धीं येतां पाहीं ॥ गगन नक्षत्राही होय पात ॥१९॥वज्रहस्तें इंद्रशक्ती ॥ बैसोनियाते ऐरावतीं ॥ सहस्रनेमा झाली येती ॥ वहन आकृती इंद्राची ऐसी ॥२०॥त्यांसी तेव्हां ईशान ॥ देवशक्ती अवघ्या मिळून ॥ असुरासी शीघ्र मारणे ॥ मत्प्रीत्यर्थ म्हणे चंडिके ॥२१॥देवी शरीरापासूनिही थोर ॥ निघती झाली अतिभयंकर ॥ चंडिकाशक्ती अत्युग्र ॥ शतशिवा नाद थोर करीत ॥२२॥ते सांगे ईशान धूमजटिला ॥ अपराजिता भवानी ते वेळां ॥ दूत होऊनि जाय वहिला ॥ शुभनिशुंभा जवळी तूं ॥२३॥सांगे शुंभनिशुंभासी ॥ मोठ्या गर्विता दानवासी ॥ आणीकही सर्व दैत्यांसी ॥ उभें युद्धासी सन्नध ॥२४॥इंद्रालागीं त्रैलोक्य द्यावें ॥ हविर्भागही देवास समर्पावें ॥ पाताळलोकीं तुम्हीं रिघावें ॥ वांचवावा जीव इच्छाल जरी ॥२५॥फारचि असेल जरी बळ ॥ जरी युद्धाची इच्छा धराल ॥ तरी माझे तृप्त होतील ॥ मांसभक्षी सकळ दूत ते ॥२६॥तेव्हां देवीआज्ञेनें जाऊन ॥ सांगितले सकळ दैत्या वर्तमान ॥ म्हणोनि शिवदूती आख्या जाण ॥ लोकीं आपण प्रख्यात झाली ॥२७॥देवीवचन त्यानें ऐकिलें ॥ सविस्तारें शुंभें सकळ ॥ निघाला क्रोधें प्रबळ ॥ आला खळ कात्यायनी जेथें ॥२८॥त्यानंतरें प्रथम येतांचि आपण ॥ शरशक्ती यष्टीवृष्टि करून ॥ रोधी वर्षाव करूनि कोपानें ॥ देवीसी आपण अमरारी ॥२९॥तिनेंही टाकून शर ॥ शूल आणि परस्वधचक्र ॥ लीले करूनि छेदिले अपार ॥ शस्त्रसंभार स्वशरें करोनी ॥३०॥त्याच्याही आधीं काळी आपण ॥ शूल टाकूनि करी विदारण ॥ खट्वांगे आपटीतचि जाण ॥ संचार आपण करी रणीं ॥३१॥शिंपूनि कमंडलूचें जळ ॥ तेज सहवीर्य हत केलें सकळ ॥ ब्रह्माणीनें शत्रू भ्रांत केला सबळ ॥ सैरावैरा धांवे सैन्यामध्यें ॥३२॥माहेश्वरी त्रिशूलें करून ॥ वैष्णवीही चक्रें दारुण ॥ कौमारी कोपें स्वशक्ती करून ॥ दैत्यालागून मारिती सर्व ॥३३॥ऐंद्रीते वज्रघातें ॥ दैत्य शतावरी करी निःपात ॥ मारूनि पडिले पृथ्वीवर तें ॥ वोघ रक्तवृष्टीचे करी ॥३४॥विध्वस्त तुंडप्रहारें । वक्षस्थळ फोडीं दंताग्रें ॥ वाराही रणी तीक्ष्ण चक्रें ॥ फाडूनि फार टाकिले ॥३५॥कोणासी नखेंच फाडून ॥ भक्षण करी राक्षसगण ॥ नारसिंही रणीं संचार करी संपूर्ण ॥ शब्द गर्जवी जाण दिगंतर ॥३६॥करूनि मोठा अट्टाहास ॥ शिवदूती असुरा करूनि पिशे ॥ पाडूनि पृथ्वीतळीं दैत्यास ॥ भक्षी सावकाशे पोटभरी ॥३७॥कोपले ऐसे मातृगण ॥ महाअसुराचा घेती प्राण ॥ कोणत्याही उपायें करून ॥ उभें न राहें जाण असुरसेना ॥३८॥दैत्य पळती दशदिशा पाहिले ॥ मातृगणांनी फार मारिलें ॥ रक्तबीज युद्धा आला ते वेळें ॥ असुर खवळे महामहाकोपें ॥३९॥रक्तबिंदू जवें भूमिपात ॥ त्याचा शरीराचा पडे जेथें ॥ भूमिवरी उत्पन्न होत ॥ त्याचि ऐसा तेथें असुर होय ॥४०॥गदापाणी युद्ध करी ॥ सन्मुख येऊनि ते ऐंद्री ॥ इंद्रशक्ती वज्र घेऊनि करी ॥ असुरा मारी अतिवेगें ॥४१॥वज्रे ताडितां असुर ॥ वाहूं लागे रक्ताचा पूर ॥ त्याच्या समान योद्धे असुर ॥ पराक्रमी अपार उत्पन्न झाले ॥४२॥रक्तबिंदू त्याच्या शरीरापासून ॥ जितुके जितुके पडती जाण ॥ तितुकेही असुर होता संपूर्ण ॥ बळवीर्ये करून त्यासी ऐसे ॥४३॥तेही युद्ध करिती रणीं ॥ जे झाले रक्तबिंदूपासूनि ॥ मातृगणासही लटणी ॥ शस्त्रपाणी असुर ते ॥४४॥पुन्हां मारिता वज्र ॥ धाव लागला शिरावर ॥ वाहूं लागतां रुधिर पूर ॥ झाले अपार शतावधी ॥४५॥वैष्णवी ते रणांगणी ॥ दैत्या पाहूनि चक्र हाणी ॥ ऐंद्रीही गदे करूनी । असुरा रणी मारितां ॥४६॥वैष्णवी चक्रें तोडितां शरीर ॥ वाहूं लागला रक्ताचा पूर ॥ सहस्रशः जग व्यापिले असुर ॥ रणशूर त्याचि ऐशे ॥४७॥कौमारी करी शक्तिघात ॥ वाराही खङ्गे हाणित ॥ माहेश्वरी त्रिशूल मारित ॥ रक्तबीजा आघात करितां तेव्हां ॥४८॥तोही गदा घेऊनि असुर ॥ येकेका वेगळाले करी मार ॥ आला मातृगणावरी कोप अपार ॥ रक्तबेवेजालागुनि तेव्हां ॥४९॥शक्तीशूलशस्त्रें आदिकरून ॥ असुरांसीं मारितां दारुण ॥ रुधिरनदी वाहतां भरून ॥ शतावधी उत्पन्न झाले असुर ॥५०॥त्याचें रक्त झालें अपार ॥ जग व्यपैले असुरें समग्र ॥ ऐसें पाहुनि सुरवर ॥ भ्याले फार ते काळीं ॥५१॥देव भयाभीत पाहून ॥ चंडिका बोले शीघ्र वचन ॥ काळीसी म्हणे चामुंडे विस्तीर्ण ॥ वदन करणे तुवां वेगीं ॥५२॥माझ्या शस्त्रघातें उत्पन्न ॥ रक्तबीज महासुराचें जाण ॥ रक्तबिंदुकडेचि लक्ष ठेवून ॥ मुख पसरून सवेगें ॥५३॥भक्षण करावें तुवां रणीं ॥ उत्पन्न झालें असुरापासूनी ॥ ऐसी करितां दैत्याकरणी ॥ क्षीण रक्त तत्क्षणीं होईल ॥५४॥रुधिर केल्या तुवां भक्षण ॥ दुजा दैत्य न होय उत्पन्न ॥ ऐसें देवीनें करूनि भाषण ॥ शूल घेऊनि मारी त्यासी ॥५५॥मुखें काळी ग्रहण करीते ॥ रक्तबीजाचें तितुकें शोणित ॥ तेव्हां तोही सवेग हाणीत ॥ गदाघात चंडिकेसी ॥५६॥तो गदाघात अल्पमानी ॥ नव्हे वेदना देहालागूनी ॥ त्याला मारितां शरीरापासूनि ॥ रक्त झणी वाहे अपार ॥५७॥जेथें तेथें मुख करून ॥ चामुंडा रक्ताचें करी प्रतीक्षण ॥ महासुराचें रक्त संपूर्ण ॥ मुखीं जाण पडे तिच्या ॥५८॥चामुंडा भक्षी समस्त ॥ उदर भरी त्याचें शोणीत ॥ देवी त्रिशूल - वज्रे हाणीत ॥ खङ्गे मारीत शस्त्रास्त्रबाणें ॥५९॥रक्तबीजालागी मारितां ॥ चामुंडा पान करी त्याचा शोणिता ॥ गतप्राण पडला पृथ्वीवरती ॥ शस्त्रास्त्रें त्या मारिल्यावरी ॥६०॥रक्तबीज महाअसुर ॥ झाला रक्तहीन राजा क्षणमात्रें ॥ तेव्हां झाला हर्ष अपार ॥ देवा सर्व अत्यंत राजा ॥६१॥रक्तमदें मदोन्मत्त ॥ मातृगण नाचती समस्त ॥ सुमेधा म्हणे ऐक अद्भुत ॥ भाग्यवंत राजा सुरथा ॥६२॥मार्कंडेय म्हणे भागोरीसी ॥ पूर्वींची कथा सांगितली तुजसी ॥ नित्यानंद म्हणे श्रोत्यासी ॥ अवधान कथेसी देइजे ॥६३॥श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराणसंमत ॥ नित्यानंद यती प्राकृत ॥ पद्यरचना करेत यथामती ॥६४॥अष्टमाध्याय संपूर्ण ॥ झाला जगदंबेच्या कृपेनं ॥ नित्यानंदा निमित्त करून ॥ जिचा ती सिद्धी नेला ॥६५॥॥ श्रीगणेशायनमः ॥ इतिश्रीदेवीविजय ग्रंथ अष्टमाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥॥ श्रीदेवीविजय अष्टमाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP