श्रीनित्यानंदतीर्थ यांचा परिचय

श्रीनित्यानंदतीर्थविरचित श्रीमार्कण्डेयपुराणांतर्गत श्रीदेवीविजय.


श्रीनित्यानंदतीर्थ यांनी नासिकजवळ पंचवीस मैलांवर असलेल्या, देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धमात्रा असलेल्या सप्तशृगगडावरील हनुमान मंदिरात ‘ श्रीदेवीविजय ’ लिहिले. ही ओवीबद्ध प्राकृतरचना त्यांनीं पौष वद्य एकादशी, गुरुवार, सन १८३५ मध्ये पूर्ण केली.
श्रीनित्यानंदतीर्थ यांना महालक्ष्मी प्रसन्न झालेली होती, असे त्यांच्या रचनेवरून सहज ओळखता येते. मार्कंडेयपुराणावरून श्रीनित्यानंदतीर्थांनी सोळा अध्याय लिहिले असून, त्याचे पठण - श्रवण त्या काळी हनुमानमंदिरात व श्रीसप्तशृंगी देवीमंदिरात होत होते. भक्त - श्रोते यात तल्लीन होत असत. परंतु या रचनेचे विस्मरण झाल्यासारखीच स्थिती सध्याच्या काळात झाली होती. सदर रचनेची अत्यंत दुर्मिळ व अतिशय जीर्णशीर्ण हस्तलिखित प्रत कै. विष्णु लक्ष्मण बिडकर यांच्या आटपाडी, जिल्हा सांगली येथे सुरक्षित आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP