मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|देवी विजय| मंगलाचरण देवी विजय श्रीनित्यानंदतीर्थ यांचा परिचय देवीची पूजाविधी व फलप्राप्ती मंगलाचरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा श्रीदुर्गास्तोत्र श्रीमहालक्ष्मी स्तोत्र नामावली जप नवरात्रसंकल्प श्रीमहालक्ष्मीची आरती मंगलाचरण श्रीनित्यानंदतीर्थविरचित श्रीमार्कण्डेयपुराणांतर्गत श्रीदेवीविजय. Tags : devimarathipuranदेवीपुराणमराठी मंगलाचरण Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीजगदंबायै नमः ॥ आधीं नमूं विघ्नहर ॥ नाम जयाचें लंबोदर ॥ जयाच्या कृपे विघ्ने थोर ॥ जाती दूर पळोनि ॥१॥विघ्नें हा मोठा थोर ॥ आमावास्येचा गडद अंधार ॥ याचा नाश करावयास धर ॥ तूं दिनकर विनायका ॥२॥कंटक वृक्षलतेचे दारुण ॥ विघ्न हेचि घोर अरण्य ॥ त्याचे करावयां दहन ॥ तूं हुताशन वडवानळ ॥३॥मोठे मोठे भयंकर ॥ सर्परूपें विघ्नें अपार ॥ याचा नाश करतां बळात्कारें ॥ मजवर गरुडरूपें ॥४॥मदस्रवी मदोन्मत्त ॥ उंच वारणरूप विघ्नें बहूत ॥ तयाचा तसा घात ॥ होऊनि अद्भुत पंचानन ॥५॥उंच विस्तीर्ण अपार ॥ विघ्नें मोठीं पर्वताकार ॥ तयाचा भेदकर्ता वज्र ॥ तूं विघ्नहर सर्वस्वें ॥६॥विघ्नें अत्यंत प्रबळ ॥ सखोल समुद्रचि केवळ ॥ तयाचा प्राशन करतां न लागतां वेळ ॥ तूं वडवानळ गणेशा ॥७॥संवर्त्तकादि मेघगण ॥ पापरूप विघ्नें दारुण ॥ तयाचा विध्वंसिता तूं पवन ॥ गजवदन गणराया ॥८॥जरी तूं कृपा करिसीं ॥ तरीच ग्रंथ जाईळ सिद्धीसी ॥ म्हणोनि विघ्नहरा तुजसी ॥ कायावाचामनेसी नमन माझें ॥९॥आतां वंदू शारदाभवानी ॥ जे कवीश्वराची मुख्य जननी ॥ चतुर्विध वाचेसी स्फूर्तिदाती ॥ कवित्वा लागुनी प्रसाद जियेचा ॥१०॥चतुर्भुज पीतांबरधारी ॥ विणा पुस्तक अक्षमाळा करीं ॥ अभय देऊनि लौकरी ॥ जिव्हाग्री करी वस्ती माझ्या ॥११॥सुहास्य सुंदर वदन ॥ हंसावरी करूनि आरोहण ॥ शीघ्र येऊनि वरदान ॥ करी मज लागुनी जननी ये ॥१२॥वंदीन आता सद्गुरुनाथ ॥ शिष्य प्रबोधनी अति समर्थ ॥ जयाचा लागता मस्तकीं हात ॥ तो त्रैलोक्यात वंद्य होय ॥१३॥जयजयाजी सद्गुरु समयी ॥ जयजय सद्गुरु कृपावंता ॥ जयजय सद्गुरु अनाथनाथा ॥ शरणागता रक्षी मज ॥१४॥तुज स्त्ववावयां लागुन ॥ न कळे वेदशास्त्रा महिमान ॥ सहस्रमुखी शेष जाण ॥ तोही वर्णन करूं न शके ॥१५॥तूं जरी कृपा करिसी ॥ तरीच ज्ञान होय शिष्यासी ॥ शिष्यसेवा अपेक्षा नाही तुजसीं ॥ उपमावें आणिकाशीं कवणा तुज ॥१६॥तूं माये विद्यावेगळा शुद्ध ॥ अद्वयत्वे परमानंद ॥ महिमा तुज अगाध ॥ वर्णितां विबुध वेडावले ॥१७॥तेथें मी पामर तो किती । तुझी काय करूं जाणें स्तुती ॥ तुवांची प्रसन्न होऊनी कृपामूर्ती ॥ ग्रंथार्थ स्फूर्ती द्यावी मज ॥१८॥ऐसी ऐकूनि विनंति ॥ कृपा उपजली सद्गुरुचित्ती ॥ ग्रंथारंभ करी म्हणती ॥ साह्य भगवती होईल तुज ॥१९॥ऐसें होता वरदान ॥ मस्तकी वंदूनि श्रीचरण ॥ संतश्रोत्या विनवण ॥ करावें श्रवण सावध कथा ॥२०॥श्रवणा व्हावें सावध श्रोती ॥ हे म्यां केली तुम्हा विनंती ॥ हे माझी उद्धट उक्ती ॥ क्षमा संती करावी ॥२१॥ऐसें ऐकूनि श्रोते सज्जन ॥ कृपेनें केलें वरप्रदान ॥ होईल तुजला अंबा प्रसन्न ॥ ग्रंथार्थ कथन करी आतां ॥२२॥श्रोत्यांची आज्ञा होता ऐसी ॥ नमन करूनि संत श्रोत्यांशीं ॥ नमस्कारुनि जगदंबेशीं ॥ नित्यानंद कथेशीं आरंभी ॥२३॥इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ झाले मंगलचरण समाप्त ॥ नित्यानंद श्रोत्या विनवीत ॥ अवधान स्वस्थ चित्तें द्यावें मज ॥२४॥इति श्रीमंगलाचरणन्नाम प्रथमोध्यायः ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP