मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|श्रीगुरुबोध ग्रंथ| नवम प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथानुक्रमणिका प्रथम प्रकरण द्वितीय प्रकरण तृतीय प्रकरण चतुर्थ प्रकरण पंचम प्रकरण षष्ठ प्रकरण सप्तम प्रकरण अष्टम प्रकरण नवम प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ - नवम प्रकरण श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज. Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर नवम प्रकरणं प्रारंभः Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशायनमः ॥सत्संगती श्रवण मनन । केलेंचि करावें जाण । मी देह ही आठवण । सोडूनि द्यावी ॥१॥ज्या ज्या वेळीं कल्पना उठे । मागें परतावें नेटें । तरी मग सहज भेटे । आनंदकंद ॥२॥सहज - देवासि सोडिती । नानासायासीं पडती । ऐसियां नरा मोक्षगति । मिळेल कैसी ॥३॥सहज देवासि आठवावें । दिसे त्याचें मूळ धरावें । यथाशक्ति सुख द्यावें । प्राणीमात्रां ॥४॥बहुत काय बोलावें । तुझें तुवां अनुभवावें । आनंदधाम न सोडावें । कदाकाळीं ॥५॥सच्चिदानंदावांचूनि कांहीं । जगामध्यें पदार्थ नाहीं । कल्पनाचि बाधक पाहीं । मूळ याला ॥६॥ती कल्पना सोडितां । आनंद प्रत्यया ये तत्वतां । तेंचि स्वरूप अनुभवितां । मोक्ष लाभे ॥७॥उन्हामध्यें तापला । साउली वृक्षातळीं बैसला । त्या वेळीं जो आनंद झाला । तेंचि स्वरूप ॥८॥तृषेनें कंथ शोषला । गोड शीतल पाणी प्याला । त्या वेळीं आनंद वाटला । तेंचि स्वरूप ॥९॥नानाव्यापारी श्रमला । विश्रांतीसाठीं बैसला । त्या वेळीं जो आनंद झाला । तेंचि स्वरूप ॥१०॥भुकेनें फार तलमळला । पंचपक्वान्नीं जेविला । त्या वेळीं जो आनंद वाटला । तेंचि स्वरूप ॥११॥काय ह्मणोनि सांगावें । या रीतीं सर्व जाणावें । विचार करितां शिणावें । नलगे कांहीं ॥१२॥अमूक पदार्थापासुनी । सुख उत्पन्न झालें ह्मणोनी । जी कल्पना उठे मनीं । तेचि बाधक ॥१३॥पदार्थ कल्पना सोडावी । द्वैतभावना मोडावी । अखंडानंद जोडावी । आपुली पदवी ॥१४॥पदार्थ, सेवणार आणि कल्पना । सोडूनि आनंद आणावा ध्याना । ऐशापरी आनंदधारणा । पदोपदीं धरावी ॥१५॥आनंदधारणा जो अनुभवी । त्याची काय वर्णावी पदवी । तोचि जाणावा या भंवीं । तारक सर्वां ॥१६॥त्याणेंचि मुक्तीला वरिलें । बेचाळीस कुळां उद्धरिलें । द्वैतभावना सोडूनि धरिलें । आनंद पद ॥१७॥ऐसियापरी प्रबोध केला । ह्मणती संशय काय राहिला । प्रेमें कवळूनि मजला । हृदयीं धरिलें ॥१८॥त्यावेळीं मिठी घालुनि चरणांस । बोलिलों संशयाचा झाला नाश । आपुल्या कृपें भवपाश । तुटोनि गेला ॥१९॥पुन्हा सद्गुरु ह्मणती । तुज प्रबोध केला जो निश्चितीं । तो कदापि दुर्जनांपती । सांगों नको ॥२०॥हें परमगुह्य जाणावें । हें तुवांचि अंगें अनुभवावें । गोष्टीसरिसें न बोलावें । कदाकाळीं ॥२१॥ओ अनन्य येईल शरण । त्याच्या निश्चय पाहूनि जाण । एकांतीं लक्षूनि सद्गुरुखूण । निवेदावी ॥२२॥तरीच याचें येईल फळ । सुटेल द्वैतबुद्धीचा मळ । हें वचन त्रिसत्य केवळ । लक्षीं धरीं ॥२३॥झणीं अभक्तां सांगसी । तरी पश्चात्तापें शिणसी । ते फिरतील देशोदेशी । निंदा करीत ॥२४॥सुवर्णाचा दाविना बरवा । कां मातीमोल करावा । अनुपकारिया द्यावा । किन्निमित्त ॥२५॥भुकेल्या अन्न वाढावें । अथवा तृषिता उदक द्यावें । तैसें शरण आलिया सांगावें । प्रेमेंकरूनि ॥२६॥जरी खरी विरक्ति बाणली । तरी तीच वेळ उदयाची झाली । समजे तात्काल अनुभविली । स्वरूपस्थिति ॥२७॥ऐसी आज्ञा वंदोनि शिरीं । मस्तक ठेविला चरणांवरी । अभय दिलें पावसी खरी । मोक्षसिद्धि ॥२८॥त्यावेळीं आनंद वाटला । अश्रूंचा पूर लोटला । सद्गुरुराज भेटला । चिन्मय मूर्ति ॥२९॥सर्वात्मभावें पूजिलें । जोडूनि हस्त विनविलें । अखंड दर्शन दिधलें । पाहिजे मज ॥३०॥यावरी श्रीगुरु ह्मणती जाण । जें तुज आनंदाचें होय स्फुरण । तेंचि आमुचें दर्शन । नित्य घेईं ॥३१॥तव भक्तीची रत्नमाळा । स्वानुभूति नोवरीच्या गळां । अर्पूनियां स्वानंद सोहळा । अंगें भोगीं ॥३२॥ऐसें बोलोनि सद्गुरुनाथ । प्रवेशले माझ्या हृदयांत । विष्णु कृष्ण जगन्नाथ । आनंदमूर्ति ॥३३॥अठराशें पंचवीश शकोत्तरीं । शोभन नाम संवत्सरीं । पौषमासामाझारीं । आज्ञा केली ॥३४॥रविवार शुक्ल द्वितीया दिनीं । द्वितीयावस्थेमाजी प्रगटुनि । प्रेमें बोलिले मजलागुनी । काय करिसी ॥३५॥मी बोलिलों काय करावें । मज कांहींच न कळे स्वभावें । श्रीगुरु बोलिले उठावें । मी सांगतों ॥३६॥ह्मणती गुरुबोध लिहावा । मी कथितों आईक बरवा । पाहिलें मुखाकडे तेधवां । हास्य केलें ॥३७॥इतुक्यांत जागा झालों । चोहोंकडे पाहूं लागलों । फार आश्चर्य पावलों । मनामाजीं ॥३८॥दौतलेखणी घेतली । डोळ्यापुढें अक्षरें दिसलीं । तींच असती म्यां लिहिलीं । माझीं नव्हे ॥३९॥नकळे प्रश्न सांगणें । नाहीं व्युत्पत्तीचीं लक्षणें । सद्गुरुखुणेवांचूनि नेणें । आणिक मी ॥४०॥मी प्रेरकाचा लेखक । ह्मणे मुकुंदराज बालक । तेचि विश्वयंत्राचे चालक । सद्गुरुनाथ ॥४१॥इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । हृदयीं भेटे ॥४२॥इति श्रीगुरुबोधे नवम प्रकरणं संपूर्णम् ॥९॥ श्रीमज्जगदीश सद्गुरुराज चरणारविंदार्पणमस्तु ॥ ( एकंदर ओंवीसंख्या २२९ ) शुभंभवतु ॥श्रीरस्तु॥ सकल मंगलावाप्तिरस्तु ॥॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP