भूपाळी - उठि उठि वो बलभीमा स्वामिस...
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
उठि उठि वो बलभीमा स्वामिसुंदर गुणसीमा ।
उठवि अंजनिमाता अंतरिं धरूनिया प्रेमा ॥धृ॥
पूर्व दिशेसी भानु उदयो व्हावया पाहे । कमलदळाच्या भ्रमरालागीं सुटका होताहे । निबिड वनाचे ठाई कोकिळ बोबाये । चरावया चालिले पक्षी मार्ग बहू वाहे ॥१॥
गंगाद्वारा प्रति मुनिवर चालिले स्नाना । ब्रह्मगिरीच्या वरुते जाती निजतपआचरणा । साधकजन पातले सखया तुझिया दर्शना । त्यांजप्रति दे भेटी सत्वर वायुनंदना ॥२॥
सर्वहि वानरगन जाले तुजभोवते गोळा । चिमणाली लेंकुरें उडति उभवुनि लांगूला । तुझिया योगे शोभा दिसती सर्वहि कपिकूळा । सत्वरि जागा होई माझ्या तान्हुल्या बाळा ॥३॥
निरंजन सुखधामविलासि गोदेचे तटीं । सद्गुरु श्रीरघुनाथ अला आहे पंचवटी । ऐकुनिया वचनासि अरूळी देउनिया मोठी । उठिला श्रीहनुमान प्रेमें टाळीया पीटी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP