मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|साक्षात्कार| अध्याय चौथा साक्षात्कार अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा साक्षात्कार - अध्याय चौथा वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी अध्याय चौथा Translation - भाषांतर सद्गुरुराया दिगंबरा । परब्रह्म पूर्णावतारा । भक्तवत्सल दीनोद्धारा । करुणाकरा निजमूर्ति ॥१॥मागील कथेचें अनुसंधान । उभय यतींचें संभाषण । केलें रेवताचळ - वर्णन । ऋषिस्थानें कथियेलीं ॥२॥श्रोते होईजे सादर । कवैत्वसिंधूरत्नाकर । त्यांतील ओव्या मुक्तें सुंदर । उभयकर्णीं घालावीं ॥३॥पाहूनी गिर्नाराची शोभा । अंतरीं उठिल्या प्रेमजिभा । भेदुनी जाऊ पाहती नभा । नेत्रद्वारा कडोनी ॥४॥जुनेगडाप्रती जाऊन । नरसीमेहताचें दर्शन । सवेंचि हाटकेश्वरालागून । दृष्टीलागीं पाहिलें ॥५॥पहाता झालों दामोदरकुंड । जयाचें सामर्थ्य प्रचंड । अस्थि पडिल्या असतां उदंड । पाणी व्हावें तयांचें ॥६॥तयामाजी करोनि स्नान । सवेंचि रेवतीकुंडीं जाऊन । सुस्नान झालों दुसरेन । अर्ध्यप्रदान दिधलें ॥७॥श्रीदामोदराचे चरण । भाळीं लाविले प्रेमेंकरून । सवेंचि मुचकुंददर्शन । घेता झालों आदरें ॥८॥द्वापराचे ठायीं जाण । रेवताचळ एकांत पाहोन । मुचकुंदें केलें शयन । निबिड गुंफेमाझारी ॥९॥तंव काळयवन आणि श्रीकृष्ण । प्रवृत्त झाले युद्धालागून । नाटोप झाला तो यवन । मग मधुसूदन पळाला ॥१०॥मार्गीं पळतांना विचार । करोनि ह्मणे हा महावीर । माझेनि न करवे संहार । कैसा विचार करावा ॥११॥मानसीं आठवली युक्ति । जे मुचकुंदासि आहे वरदउक्ति । बहुसाल करावी सुषुप्ति । उठवितां तुजप्रती भस्म होवो ॥१२॥हे युक्ति रचोनि गोपाळ । आपुले अंगावरील पट्टकुल ॥ तेणें कडोनि आंग सकळ । झाकता झाला मुनीचें ॥१३॥आपण गुप्तरूपें करून । पहात ठेलासे दुरून ॥ तों इतक्यांत काळयवन । तया स्थानीं पातला ॥१४॥ह्मणे हा कृष्णचि निजला । घेऊनि निद्रेचे मिषाला । ह्मणोनि लत्ताप्रकार केला । ऋषीलागीं तयानें ॥१५॥मुनि जंव नेत्र उघडोनि पाहे । तंव जवळी उन्मत्त उभा आहे । मग अशापुनिया लवलाहें । भसम केला यवन तो ॥१६॥मुचकुंदासि द्यावया दर्शन । प्रकट झाला मधुसूदन । शापित पाहुनिया यवन । वर देते जहाले ॥१७॥कलियुगामाजी जाण । जे मियलशा पीर होऊन । तुझी सत्कीर्ति वाढून । पूज्य होसी सर्वत्रीं ॥१८॥मग दामोदर झाले आपण । निकट मुचकुंदाचें स्थान । पर्वतावरी काळयवन । पीर करोनि स्थापिला ॥१९॥तयासी पाहुनिया नेत्रीं । चलिलों पर्वतामाझारीं । तंव मृगीकुंड बहु विचित्री । दृष्टीलागीं देखिलें ॥२०॥करोनि तयामाजी स्नान । घेतलें भवेश्वराचें दर्शन । सवेंचि करितां झालों गमन । मीमकुंडा जवळिकें ॥२१॥तया तीर्थातें वंदून । दृष्टी पाहिलें विवरस्थान । अति सूक्ष्म द्वारांतून । गेलों तया भीतरीं ॥२२॥निबिड दाटली अंधारी । कंटक पाषाण बहुत द्वारीं । अंत न लागे दूरवरी । शोधूनिया पहातां ॥२३॥भय सांडोनिया अंतरीं । मन केलें पर्वताकारीं । शोधित गेलों दूरवरी । चापचीत हातानें ॥२४॥बहुत दूरवरी आंत गेलों । नेत्रद्वय उघडिता झालों । तंव तेज पाहुनि दीपलों । एकाएकीं दृष्टीसी ॥२५॥पाहता झालों तपेश्वर । जैसा प्रगटला दिवाकर । भस्क - चर्चित जटाभार । मस्तकावरी शोभती ॥२६॥घालोनिया पद्मासन । खेचरी मुद्रा अवलंबून । मन करोनि उन्मन । ध्यानस्थ होऊनि बैलए ॥२७॥एक घटिका कर जोडूनी । उभा ठेलों बद्धपाणी । तंव कृपादृष्टीनें तयांनीं । नेत्र उघडोनि पाहिलें ॥२८॥प्रथम झाले क्रोधायमान । ह्मणती आहेस रे तूं कवण । कैसें झालें तुझें येण । विवराचिया माझारीं ॥२९॥द्वारीं व्याघ्र चवकीस होता । तो तुला पाहोनि भक्षिता । त्याजपासोनी तूं तत्वता । कैसा चुकोनि आलासी ॥३०॥मग तयाप्रती म्यां विनविलें । स्वामींचे कृपेनेंचि रक्षिलें । व्याघ्रासी नाहीं म्यां पाहिलेम । दृष्टीलागी उघडोनी ॥३१॥व्याघ्र खाता मजलागुनी । तरि माझी कायसी होती हानी । अमरत्व गुरुकृपें करूनी । प्राप्त झालें मजलागीं ॥३२॥चर्मदेह - आशा सोडून । मायामोहा करूनि छेदन । चिदानंदीं सुखसंपन्न । होवोनी दुखी राहिलों ॥३३॥मज नाहीं मृत्यु - जनन । कवणापासूनि नाहीं हान । मी निराधार निरंजन । परिपूर्ण ॥३४॥व्याघ्र जरि मज खाऊं येता । तरि त्याचे हृदयीं कोण वसता । मीच सर्वघटीं व्यापकता करूनिया राहिलों ॥३५॥जैसा इंदु राहुनी आकाशीं । बिंबव्या दावी घटप्रदेशीं । एक असोनी बहुत वेषीं । घटोघटीं दिसतसे ॥३६॥कां एक उदक सर्वांलागून । परि कांदा ऊस भिन्नभिन्न । रस पाहतां चाखून । एकमेका न मिळती ॥३७॥तैसे व्याघ्र आणि मनुष्य । उभयपक्षीं एकचि वास । सत्वरज आणि तमांश । व्यक्ती मात्र वेगळ्या ॥३८॥व्याघ्रें हें देहे जरी खादलें । तरी वाया एथें काय गेलें । जैं स्वहस्तें पायासि ताडिलें । हीनत्व आलें कवणासी ॥३९॥कां उदकावरी बुद्बुद येती । एकमेकासी झगटती । लय पावलिया पूर्वस्थिते । गेली नाहीं सर्वथा ॥४०॥कां पंचभूतें प्रळयकाळीं । करिती एकमेकां गिळी । परी उत्पन्न व्हावयाची मुळी । भंग नाहीं पावली ॥४१॥तैसा मी अनादि अद्वय । उरळा नाहीं द्वैतभाव । तेथें मज अपाय उपाय । होऊं शके कोठोनि ॥४२॥ऐसें तया प्रती भाषण । करितां झालों कर जोडून । महाराज योगेश्वर प्रसन्न । होवोनिया बोलती ॥४३॥पुसूनिया नामाभिधान । ह्मणती धन्य रे निरंजन । तव सद्गुरू ज्ञानसंपन्न । करूणाघन धन्य रे निरंजन ॥४४॥तुझे मस्तकीं कर ठेवून । दिधलें हें तुज तत्वज्ञान । जन्ममरणाचें खंडन । झालें जया प्रसादें ॥४५॥आतां घ्यावया माझें दर्शन । इच्छा काय आलासि करून । ईप्सित असेल तुझें मन । तें परिपूर्ण करितों मी ॥४६॥दत्तात्रय - शिखराखालीं जाण । रतनबाग आहे उपवन । वृक्ष लागले अति सघन । भीतरी पवन न रिघेची ॥४७॥तये स्थानीं रतनबावडी । तिजला अडीच पायर्या शिडी । तियेच्या उदकाची प्रौढी । सुवर्ण करी लोहाचें ॥४८॥ती आहे कवणे ठिकाणीं । हें ठावें नाहीं कोणालागुनी । पूर्वीं मोळक्या तया स्थानीं । एक गेला होता पैं ॥४९॥तृषेनें झालासे व्याकुळ । अरण्यामाजी शोधीत जळ । तों दृष्टीसी वापी सोज्वळ । निबिड स्थानीं देखिली ॥५०॥अडीच पायरिया उतरून । उदक केलें बहु प्राशन । तंव दैवयोगें करून । कुराडी उदकें भीजली ॥५१॥जावोनिया पहिला वर्ण । तिचें झालें दिव्य सुवर्ण । मोळक्या आनंदें करून । घरा घेऊनि पैं गेला ॥५२॥लोह घेऊन परतून । शोधीत आला दुसरेन । बहुत श्रमला परि ठिकाण । नाहीं कोठें लागला ॥५३॥तितुकियानें मात्र पाहिलें । पुन्हा त्यातें ठाऊकें न झालें । त्याविण दुसरियातें वहिलें । ठाऊक नाहीं तें स्थान ॥५४॥तुज मी झालोंसे प्रसन्न । दावोनि देतों तेथींची खूण । इच्छील जितुकें तुझें मन । उदक नेई तितूकें ॥५५॥ऐसें वदतां तपेश्वर । तयासी मी वदलों उत्तर । माझें ज्ञान निरंतर । अक्षयी राहो तव कृपें ॥५६॥हेंचि मागतों वारंवार । जोडोनिया दोन्ही कर । नलगे द्रव्याचें भांडार । पीडाकार ज्ञानासी ॥५७॥मागणें तरी एक आहे । श्रीदत्तासी दृष्टीसी पाहे । हा वर देऊनि लवलाहें । बोळवण करावी ॥५८॥इतुकें ह्मणतां तया लागून । ते अंतरसाक्षी परम निपुण । ह्मणती गुरूचें वरदान । तुजप्रती आहे कीं ॥५९॥तया गुरुकृपें करून । होईल दत्ताचें दर्शन । माझाहि आशीर्वाद जाण । तयापरी घडो कां ॥६०॥परि एक सांगणें तुजप्रती । इच्छा कांहीं न धरी चित्तीं । जरि झाली तृष्णा उत्पत्ती । तरि गुरूमूर्ति न भेटे ॥६१॥शुद्ध करोनिया मन । घेसी दिगंबरदर्शन । तरिच साध्य होईल जाण । नाहीं तरि न घडेचि ॥६२॥करोनि साष्टांग नमस्कार । तथास्तु वदलों मी उत्तर । करोनि साष्टांग नमस्कार । उदित झालों निघावया ॥६३॥त्यांनीं प्रसादा लागून । एक फळ दिधलें जाण । तें म्यां तेथेंचि भक्षून । तृप्त झालों ते काळीं ॥६४॥तयाचे गोडीप्रती जाण । अमृतहि लाभे फिकेपण । सुगंधीनें भरलें गगन । तृप्त मन जहालें ॥६५॥तया दिवसापासून । क्षुधेनें नाहीं केलें येण । मोजुनिया तीन दिन । पळोनि गेली दिगंता ॥६६॥असो तया काळीं विनंती । करिता झालों त्याजप्रती । स्वामी तुमची इथें स्थिती । किती दिन आहे हो ॥६७॥किती सिद्ध इये स्थानीं । बसिलेत अनुष्ठानीं । वातांबुपुर्णाशनी । करीत योग साधना ॥६८॥मग ते ह्मणती नाहीं प्रमित । युगें लोटुनि गेलीं बहुत । आह्मां ऐसे यया स्थळांत । पुष्कळ गुप्त रहाती ॥६९॥मग ह्मणती जाय रे सत्वर । आह्मां क्लेश होती फार । लावुनि जाय विवरद्वार । शिळा तोंडीं लावोनि ॥७०॥मग तयासी नवस्कारून । निघता झालों मी तेथुन । द्वारी चंड शिळा लावून । दगड बहुत रचियेले ॥७१॥सवेंचि पर्वतावरी चढून । केलें भीमकुंडाचें दर्शन । गौमुखीं गंगेचें स्नान । करिता झालों आदरें ॥७२॥रामानंद दृष्टी पाहून । घेतलें अंबेचें दर्शन । ववेचि गोरक्षासि भेटून । अवघडनाथ पाहिले ॥७३॥कमंडलू उदकें सुस्नात । होउनि गेलों शिखरावरुतें । मार्ग कठिण अत्यंत । हातें धरूनि चढावें ॥७४॥उच्च बहुत तें शिखर । उभगिलें जैसे मेरुमांदार । किंवा दुसरा हिमाकर । उपमे लागी जयाचे ॥७५॥तळीहुनि वरी जातां । दिनमणीच जाय अस्ता । होवोनि कठिण अवस्था । मागुती खालीं उतरावें ॥७६॥सर्व पर्वता आंतून । सर्वदा मेघांचें मंडण । षडृतूप्रती जाण । तेथूनिया नवजाती ॥७७॥वायू आंतून सणाणी । उडवूनि नेत वृक्ष पाषाणीं । शिखरीं जावयासी जननी । विरळा प्रसवेल कोणाची ॥७८॥असो सद्गुरुकृपें करून । वरि चढोनि गेलों जाण । तंव वायु लागूनिया सघन । पडूं पाहे खालती ॥७९॥मग मी पाषाण आलिंगुनी । पाहिलें नेत्रासी उघडोनि । तंव गुरुपादुका चिन्मय खाणी । दृष्टीलागी देखिल्या ॥८०॥जैसे तिन्ही देह्यांवरी । महाकारण तेजाकारी । पादुका शोभल्या तयापरी । दैदीप्यमान साजिर्या ॥८१॥सद्गदित कंठ होऊन । केल्या पादुका आलिंगन । नेत्रीं प्रेमाश्रु येऊन । क्षाळणपूजा जाहली ॥८२॥करुनिया नूतन कवन । वर्णिले श्रीदत्ताचे गुण । मधुरोत्तर वचनें वदून । स्तुति बहुत पैं केली ॥८३॥करोनिया नमस्कार । अंतरीं केला दृढविचार । एथें बैसुनि निरंतर । दिनत्रय पर्यंत ॥८४॥राहुनिया निराहारी । दृष्टी पाहूं हा गिरनारी । षड्भुज मूर्ति साजिरी । षडआयुधें मुक्त जे ॥८५॥ऐस अनिश्चय मनीं करून । प्रवर्तलों बैसायालागून । तंव एकाएकीं आठवण । झाली गुरुआज्ञेची ॥८६॥सात महिने एकादश दिन । झाले नाहींत अद्यापि पूर्ण । मध्यंतरी करितां साधन । गुरुदर्शन नव्हेचि ॥८७॥पूर्ण महिने भरत तंववरी । एथें बैसावें कवणेपरी । मग विचार केला निजअंतरीं । जे प्रदक्षिणा कराव्या ॥८८॥पादुकांसी करोनि नमन । खालीं उतरता झालों जाण । माता अनुसूयेचें दर्शन । जाऊनिया घेतलें ॥८९॥रेणुका देवीस नमस्कार । करोनि भक्ति - पुर:सर । काळिका देवी अत्यादर । जाऊनिया वंदिली ॥९०॥तें स्थान बहुत भयंकर । अघोरी वसती निरंतर । करोनि मनुष्याचा आहार । बहुकाळ वांचती ॥९१॥मागील दशवरुषां माझारी । तेथें बहुत होते अघोरी । नरमांस भरोनिया उदरी । तयालागीं आचरती ॥९२॥कोणीएक बैरागी आंधळा । हात ठेवोनि शिष्याचे गला । चढोनिया पर्वतमौळा । दर्शनासी पातला ॥९३॥तंव हारनाम नामें अघोरी । तेथ येऊनि झडकरी । पोर उचलुनि तये अवसरीं । घेऊनिया पळाला ॥९४॥जाऊनी काळिकेचे देउळीं । पोर खांडुनी केली गोळी । पाचन करावया ते काळीं । मडक्यामाजी ठेविलें ॥९५॥इकडे बैरागी शोकयुक्त । आरडोनिया हाका मारित । दोन्ही नेत्रें करुनी भित्त । मार्ग कांहीं न लक्षे ॥९६॥मग उच्चारुनिया श्रीदत्त । मोठ्यानें हाका मारित । होऊनिया तृषाक्रांत । क्षुधायुक्त जहला ॥९७॥पाहोनिया ऐसें निर्वाण । गोसावी याचे रूपें करून । मुसळप्राय दंड घेऊन । दत्तात्रय प्रगटले ॥९८॥जाऊनिया अघोर्यापाशीं । बोलते झाले तयासि । सत्वर सोडोनी मुलाशी । द्यारे तुह्मी सर्वही ॥९९॥अघोरी वदते झाले वचन । मूल तों झालासे पाचन । सामर्थ्य असेल तरी आपण । उठवूनी नेइजे ॥१००॥तंव दिगंबरें मारितां हाक । फुटलें चुलीवरील मडक । पोर होऊनी सम्यक । स्वामीपाशीं पातलें ॥१०१॥ऐसा पाहोनी चमत्कार । अघोरी पळाले समग्र । पाठीं लागोनी दिगंबर । एकप्रति ताडिलें ॥१०२॥वरकड अर्बुदाचळा गेले । मनुष्य - भक्षणातें सोडिलें । तंव लंगडा श्रीगुरुते बोले । मेलों मेलों ह्मणवूनी ॥१०३॥दिगंबरासि आली करुणा । केलें त्याचे संरक्षणा । तो अद्यापि तया ठिकाणा । लंगडा होवोनि आहे पां ॥१०४॥इकडे बैरागी खेदभरित । श्रीगुरुसि हाका मारित । तंव मूल घेऊन त्या स्थळांत । दिगंबर पातले ॥१०५॥देऊनि त्यासि दिव्यनयन । साक्षात् दिधलें दर्शन । पोर त्याचे स्वाधीन करून । आपण गुप्त जाहले ॥१०६॥असो ती काळिका देवी नमून । सूर्यकुंडाप्रत केलें गमन । सर्व गुंफा अवलोकून । जुनेगडासी पातलों ॥१०७॥श्री रघुनाथ गुरुप्रसाद । नामस्मरणीं धरूनी छंद । सगुण ध्यानासी निर्द्वंद्व । उर्ध्वदृष्टी पहातसे ॥१०८॥सद्गुरूचे उभय चरण । अवलोकोनी निरंजन । देहासहित आपुलें मन । ओवाळूनी टाकितसे ॥१०९॥इतिश्री साक्षात्कार ग्रंथ । संमत श्रीगुरुरघुनाथ । दत्तात्रय मूर्तिमंत । गुरुकृपें भेटले ॥११०॥॥ श्री दिगंबरार्पणस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP