अंक पाचवा - प्रवेश १ ला

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


एक खोली
[ चंद्रराव व कोंडाऊ ]
चंद्रराव - ( इकडून तिकडे फिरत ) बस्स. पाहिजे होते तेवढें कळलें ’ जगावें कीं मरावें ’ हें पुष्कळांना एक मोठे गूढ असतें . पण मला तें अगदीं सोपें झालें आहे. हें पहा याचा निकाल कसा लावायचा हें ठरलें . आतां जास्त चौकशी करण्याची जरुरच उरली नाहीं . जा मला एक कागद , दौत आणि लेखणी इतकें आणून दे . काहीं थोडे ल्याहायचें आहे तेवढें लिहीतों , नंतर जाऊन झोंप येते का पाहतो.( कोंडाऊ जाते. ) काळझोप आली तर सोनेंच झालें . ( दुर्गास उद्देशून ) अरेरे ! लाड्के तुझ्या दु:खाचे कारण आत्तां मला समजलें बरें ! तु माझ्याशी भ्रमिष्टासारखें बोलत होतीस, तुझें मन थार्‍यावर नव्हतें , याचें काहीं मला आतां मोठेसें आश्वर्य वाटत नाहीं . लाड्के , तुझी किती हानि झाली या गोष्टीचा जर मी नुसता विचार करायला लागलों , तर मी देखील वेडा होईन यांत संशय नाहीं . काय बिनतोड प्रसंग हा ! देव कोपला, दैवानें उलट घेतली, ग्रहदशा फिरली. एकदमच सर्व कसें प्रतिकूल झाले पहा ! हां ! मी भकायला लागलो वाटतें . पुरें आतां . पणं मी देवाला आणि दैवाला काय म्हणून नावे ठेवतों ? प्रत्यक्ष माझा बाप आणखी माझा भाऊ हेच राहूकेतूसारखे हात धुवून माझ्या पाठीशीं लागले आहेत. मला खड्ड्यात घालतील तेव्हाच ते संतुष्ट होतील ! काय चमत्कार आं ! मी जिवंत आहें हें त्याना माहीत होतें ; तसेंच आमचे परस्परांवर किती प्रेम आहे हें सुध्दा त्यांना ठाऊक होतें ; इतकें असून तिनें आपलें सर्वस्व दुसर्‍याला वाहिलें हें त्यांच्याने पहावलें तरी कसें ? किती निर्दय बाप हा ! कोण दुष्ट राक्षसी भाऊ हा ! बरें या अनर्थाला दोषांचे पाप तुमच्या पदरात घालीन आणि मग मी तुमच्या दृष्टिआड व स्मृतिआड जाऊन पडेन, हें खास . ( इतक्यांत कोंडाऊ कागद् , लेखणी वगैरे आणून देते. चंद्रराव एक लहानसें पत्र . ) मला गुंगी आल्यासारखे वाटतें हे काय ? माझ्या लाडकीची प्रकृती आज ताळ्यावर नाही. मला तर झोपेंने घेरले. पण ही झोप की काळझोप ! काळझोप आली तर सर्वच काळजी संपली. जाऊं तर खरें  ( जातो. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP