पंचमम् ब्राम्हणम् - भाष्यं १५

सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.


भाष्यं :--- एवं पाडक्तेन दैववित्तविद्यासंयुक्तेन कर्मणा त्र्यन्नात्मक: प्रजापतिर्भवतीति व्याख्यातमनन्तरं च जायादिवित्तं परिवारस्थानीयमित्युक्तम । तत्र पुत्रकर्मापरविद्यानां लोकप्राप्तिसाधात्वमात्रं सामान्येनावगतं न पुत्रादीनां लोकप्राप्तिफलं प्रति विशेषसंबन्धनियम: । सोऽयं पुत्रादीनां साधनानां साध्यविशेषसंबन्धो वक्तव्य इत्युत्तरकण्डिका प्रणीयते ॥

श्रुति :--- अथ त्नयो वाव लोका मनुष्यलोक: पितृलोको देवलोक इति सोऽयं मनुष्यलोक: पुत्रेणैव जय्यो नान्येन कर्मणा कर्मणा पितृलोको विद्यया देवलोको देवलोको वै लोकाना श्रेष्ठस्तस्माद्विद्यां प्रश सन्ति ॥

अर्थ :--- आतां तीनच लोक आहेत. मनुष्यलोक, व देवलोक असे: तो मनुष्यलोक पुत्राच्या योगानेंच साध्य आहे, दुसर्‍या कर्मानें नाहीं. कर्मानें पितृलोक  व विद्येनें देवलोक साध्य आहे. त्या लोकांतील देवलोक श्रेष्ठ आहे. म्हणून विद्येची प्रशंची करितात. ॥१६॥

भाष्यं :---  अथेति वाक्योपन्यासार्थ: । त्रयो वावेत्यवधारणार्थ: । त्रय एव शास्त्रोक्तसाधनार्हा लोका न न्य़ूना नाधिका वा । के ते इत्युच्यते मनुष्यलोक: पितृलोको देवलोक इति । तेषां सोऽयं मनुष्यलोक: पुत्रेणैव साधनेन जय्यो जेतव्य: साध्यो यथा च पुत्रेण जेतव्यस्तथोत्तरत्र वक्ष्यामो मान्येन कर्मणा विद्यद्या वेति वाक्यशेष: । कर्मणा‍ऽग्निहोत्रादिलक्षणेन केवलेन पितृलोको जेतव्यो न पुत्रेण नापि विद्यया । विद्यया देवलोको न पुत्रेण नापि कर्मणा । देवलोको वै लोकानां त्रयाणां श्रेष्ठ प्रशस्यतम: । त्स्मात्तत्साधनत्वाद्विद्यां प्रशंसन्ति ॥

श्रुति :--- अथात: संप्रत्तिर्यदा प्रैष्यन्मन्यतेऽथ पुत्रमाह त्वं ब्रम्हा त्वं यज्ञस्त्वं लोक इति स पुत्र: प्रत्याहाहं ब्रम्हाहं यज्ञो‌ऽहं लोक इति यद्वै किंचानूक्त तस्य सर्वस्य ब्रम्होत्येकता । ये वैके च यज्ञास्तेषा सर्वेषां यज्ञ इत्येकता ये वैके च लोकस्तेषा सर्वेषां लोक इत्येकता । एतावद्वाइद सर्वमेतन्मा सर्व सन्नयमितो‍ऽभुनजदिति । तस्मात्पुत्रमनुशिष्टं लोक्यमाहुस्तस्मादेनमनुशासति स यदैवंविदस्माल्लोकात्प्रैत्यथिभिरेव प्राणै: सह उत्रमाविशति स यद्यनेन किंचिदक्ष्णयाऽकृतं भवति तस्मादेन सर्वस्मात्पुत्रो मुञ्चति तस्मात्पुत्रो नाम स पुत्रेणैवास्मिलँलोके  प्रतितिष्ठत्यथैनमेते देवा: प्राणा अमृताआविशन्ति ॥१७॥

अर्थ :--- त्यानंतर यास्तव संप्रदान कर्म. जेव्हां मी आतां मरणार असें समजतो तेव्हां पिता पुत्राला बोलावून म्हणतो ‘तू ब्रम्हा आहेस, तुं यज्ञ आहेस व तूं लोक आहेस: तेव्हां तो पुत्र उलट म्हणतो - ‘मी ब्रम्हा आहें, मी यज्ञ आहे; व मी लोक आहे.’ जें काईं अध्ययन त्या सर्वाची ब्रम्हाशब्दांत एकता होते. जे कांहीं यज्ञ त्या सर्वांची यज्ञशब्दांत एकता होते. जे कांहीं लोक आहेत त्या सर्वांची लोक या शब्दांत एकता होते. गृहस्थाला कर्तव्य म्हणून असलेलें हे सर्व एवढेंच आहे. हा सर्व  भार माझ्यापासून काढून घेऊन व तो आपल्यावर ठेवून घेऊन या लोकापासून हा माझें पालन करील (असें पिता मानितो.) यास्तव वर सांगितल्याप्रमाणें अनुशसन केला गेलेल्या पुत्राला ब्राम्हाण लोक्य - लोकाला हितकर म्हणतात. म्हणूनच या पुत्राला पितर अनुशासन करितात. तो असें जाणनारा म्ह० मीं आपली कर्तव्यता पुत्राला समर्पिली आहे, असा ज्याचा निश्चय झाला आहे तो जेव्हां या लोकापासून निघून जातोमरतो: तेव्हां याच वाडमन:प्राणांसह पुत्रांत प्रवेश करितो. तो पुत्र, जर या पित्यानें कांहीं कोणच्छिद्रानें - प्रमादानें न केलेलें असेल. तर त्या सर्वापासून त्याला सोडवितो. म्हणून त्याला ‘पुत्र’ म्हणतात. तो पिता पुत्राच्या योगानेंच या लोकांत प्रतिष्ठित होतो. ज्यानें आपल्या कर्तव्याचें संप्रदान केलें आहे अशा पित्यामाध्यें हे व्यागादिक हिरण्यगर्भसंबंधी अमृत प्राण प्रवेश करितात. ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP