प्रसंग सातवा - नाम ज्ञान भेद-सेंडगळाचा दृष्‍टांत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


एके यातीचे असें सेंडगळ । अनेक भाषांचे करी कल्‍लोळ । तैसे मजकरवीं बोलवावें सकळ । स्‍वयें लडिवाळ तुझा ॥६९॥
छपन्न भाषा असे प्रगट बोली । कोणासी चार भाषा बोलतां आली । तो म्‍हणे मजसारखी नाहीं खोली । गर्वें मरे जगीं ॥७०॥
जैसे तृण भक्षून माते ढोर । उन्मत्त कांट्या घेती शिरावर । अभिमानें उकिरड्याचा करी फेर । पायें उकरूनियां ॥७१॥
ऐसें एक चार गोष्‍टी शिकले । ते जनीं अभिमानें मिरविले । बहुतेकांस हितोपतां मेले । स्‍वहित नेणती आपुलें ॥७२॥
सर्व विद्यांचें नसतां पुरतेपण । येरूनियेरांसी धरिती अभिमान । धन्य त्‍या सेंडगळाचें लक्षण । अभिमान नेणेंचि ॥७३॥
शेख महंमद म्‍हणे जी ईश्र्वरा । मज सेंडगळासमान दातारा ज्ञान नाहीं दिधलें परमेश्र्वरा । मानी ना तुझे आभार ॥७४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP