मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सातवा| असत्य भ्रांति प्रसंग सातवा ईश्र्वरस्तुति-प्रस्ताव ईश्र्वरच खरा मायबाप ईश्र्वर पित्याच्या विसर ईश्र्वराचें सौभाग्य ईश्र्वराचें अपार देणें ईश्र्वराच्या उपकाराचाच विसर असत्य भ्रांति नाम ज्ञान भेद-सेंडगळाचा दृष्टांत नाम ज्ञान भेद शेख महंमदास सर्पदंश प्रसंग समाप्ति प्रसंग सातवा - असत्य भ्रांति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत असत्य भ्रांति Translation - भाषांतर उपकार आत्मज्ञानें न्याहाळितां । प्रेमें उमासा येतों वर्णितां शरण रिघतों श्रोत्यां संतां महंतां । ईश्र्वर उपकार वर्णावया ॥६३॥आपल्या प्रारब्धें जीव तळमळी । मग ईश्र्वरासी देतो शिव्या गाळी । भोग आलिया पापपणें न्याहाळीं । अनेक पापें आचरें ॥६४॥जो भोगें वेष्टिला असे जोजारी । निशीं पडला असे पलंगावरी । म्हणे उठा माथ्या आली दुपारी । कुटुंब सावध करतां ॥६५॥तेव्हां निशी असे एक प्रहर । ईश्र्वराविण असत्य बरळे गव्हार । भोग आल्याचा ऐसा बडिवार । ईश्र्वरासी विसरोनि जाती ॥६६॥महा पुण्याच्या बळें जाला भाग्याचा । भ्रांति शोख करिती असत्याचा । प्रेम घोष न करी हरिनामाचा । पुण्यापुण्य वाढावया ॥६७॥शेख महंमद विनवी जगजीवना । नांवे बोलतां न येती मधुसुदना । शब्द वाणी द्यावी करावया वर्णना । नाम ज्ञान भेदाची ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP