प्रसंग दुसरा - प्रसंग समाप्त

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



जीव निद्रा पळोन जाय तत्त्वतां । प्रेमें लागे उन्मनी अवस्‍था । तें मज सांगावें जीं प्रेम महंता । गुह्य मायबापा ॥१०१॥
आतां ऐक पां एकांतीचा उद्गार । बोले सद्‌गुरु होऊनि उदार । प्रकट न करावें जनाभितर । संत कोपतील तूंतें ॥१०२॥
प्रसंग पहिल्‍यापासूनि दुसरा । समाप्त आरंभिला तिसरा । सावध अनुभवी अनुसरा । शेख महंमद म्‍हणे ॥१०३॥
सद्‌गुरु म्‍हणजे शेख महंमदास । तिसरे प्रसंगीं होऊनियां उदास । काय पुसणार तें मज पूस । ‘ना-भी’कार दिधला ॥१०४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP