मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग दुसरा| संवेदना-दृष्टांत प्रसंग दुसरा पंच महाभूतें-शक्ति नर-पद्मिनी लक्षण साधू लक्षण पवित्रापोटीं पवित्र हिरण्यकश्यप-प्रल्हाद प्रल्हादाची जन्मकथा संवेदना-दृष्टांत भूषण म्हणजे दुःखाचें कारण शिष्यानुसंधान-दृष्टांत ज्ञान विज्ञान मांडणी-लक्षण निद्राशक्ति प्रसंग समाप्त प्रसंग दुसरा - संवेदना-दृष्टांत श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत गुरूची शिष्यास संवेदना-दृष्टांत Translation - भाषांतर चावटी करूनियां पुससी । तूं बहु निःसंग जालासी । सांग कवणें चिथावलासी । सत्शिष्या सगुणा ॥५१॥स्वामी चिथावलों तुमच्या कृपादृष्टीं । म्हणोनि जाली आगमेसी भेटी । आणि दुजा कोण असे सृष्टीं । चिथाविता मजला ॥५२॥मह तुम्हांवाचूनि नेणें दुसरा जैसी कन्या ध्यातसे माहेरा । आणि वत्स हुंबरें धेनुक्षीरा । तैसा मी तुम्हांप्रती ॥५३॥जैसें कोरड्या काष्टाचें बाहुलें । खांब सूत्रानें बोलुन बोलाविलें । तैसें तुम्ही मला चेतविलें । आपुल्या सामर्थ्ये ॥५४॥नाना नग घडे मोडे भूषण सोनारा । तैसें भूषण दिधलें दातारा । कवित्व रस बंदिस्त अक्षरां । तुझीं तूंचि बैसविसी ॥५५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP