मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग दुसरा| शिष्यानुसंधान-दृष्टांत प्रसंग दुसरा पंच महाभूतें-शक्ति नर-पद्मिनी लक्षण साधू लक्षण पवित्रापोटीं पवित्र हिरण्यकश्यप-प्रल्हाद प्रल्हादाची जन्मकथा संवेदना-दृष्टांत भूषण म्हणजे दुःखाचें कारण शिष्यानुसंधान-दृष्टांत ज्ञान विज्ञान मांडणी-लक्षण निद्राशक्ति प्रसंग समाप्त प्रसंग दुसरा - शिष्यानुसंधान-दृष्टांत श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत शिष्यानुसंधान-दृष्टांत Translation - भाषांतर जैसा चंद्र द्रवे चकोर वदनीं । तैसें तुम्ही केलें मजलागुनी । आतां कां दूर धरितां दाटोनी । सेवकालागीं स्वामिया ॥६३॥आठवला शब्द तुम्हांसी ना पुसों । तरी कवणासी मी विश्र्वासों । तरी काय परदेशीपणीं असों । सांगावें स्वामी मज ॥६४॥मातेनें बाळकासी हेडावलें । तें अंगसेंगेंचि लगटलें । तैसें मज अनुसंधान लागलें । तुमच्या चरणांचें ॥६५॥जेवितां मांजर हेडावलें । तें ठायां भोंवतेंच भोंवों लागले । तैसें माझे चित्त गुंतलें । तुमच्या ध्यानीं ॥६६॥महंमद निष्ठुरपणाची टीका । सांगतों तें स्वामी ऐका । मांजरी पीडली असे भुका । तरी पिलें भक्षण करी ॥६७॥दांतीं पिलें धरूनि मांजरी पळे । अंतरीं कांहीं घात ना कळवळे । तैसें निष्ठुरीं ममतेचे सोहोळे । तुमचे मजलागी ॥६८॥नदीधारे नीट मीन चढे । मागें अंडियांचें सांकडें पडे । परतोनि पहातां मच्छ धडफुडे । होऊनि मागें लागती ॥६९॥ऐसा असे तुमचा अनुसंधानी । म्हणोनि पर्वतलों निज नयनीं । ज्ञानविज्ञानत्वाची मांडणी । दिसे भासे लक्षण ॥७०॥ज्ञानविज्ञान मांडणीमग सद्गुरु बोलते जाले मात । ती तंव पहात होतों तुझें चित्त । हृदयीं आलंगिलें त्वरित । काय पुसरणार तें पूस ॥७१॥या चहूं शक्तींचीं मांडणी । तुम्ही सांगितली जी कृपावचनी । आणिक एक आठवलें ज्ञानीं । पुसावयालागीं ॥७२॥मनुष्यांमध्यें सिद्ध सुधारणा । धेनूंमध्यें कपिला पवित्र जाणा । कस्तुर्या मृग अखंडपणा । कवणे गति स्वामी ॥७३॥गरुड ऐरावत वासुकी नाग । शहामृग अरबी वाघ । हीन यातीस ऐका पैं दीर्घ । जवादि पुरतकाळीं ॥७४॥अंडज खाणीमध्यें राजहंस । त्यांस मोत्याचा असे स्फुरस । हनुमंतासहि नित्य निज ध्याय । कवण्या गुणें ॥७५॥रावा देखा रामनाम पावला । हुमा पक्षी पवित्र जन्मला । मयूर ईश्र्वरासी आवडला । कवणियास गुणें ॥७६॥उद्भिज खाणीं वनस्थळीं । त्यामाजी तो चंदन परिमळी । वाळा वेळा पुष्पें नव्हाळी । कवणेपरी असे ॥७७॥तुळसी बेल आघाडा । उत्तम औषधि पवित्र झाडा । अमृतफळ तांदुळ निवाडा । भक्ष पूजेलागीं ॥७८॥खारिक खोबरें अग्रचंदन । यावेगळें आणिक पवित्रपण । चहूं खाणी वर्णिता महिमान । व्युत्पत्ती वाढेल ग्रंथीं ॥७९॥आतां स्वेदज खाणीं माझारीं । हिरे माणिकें रत्नें नानापरी । अनेक ठीक ढऊळ परोपरी । साहाकारिलें असें ॥८०॥पांच परिस पाषाण प्रतिमा । या वेगळ्या अनेक याति महिमा । हें सांग पां कवणियां कामा । सुफळ वचनें ॥८१॥सद्गुरु म्हणती बरवी दृष्टि केली । तुवां साखरेची साल काढिली । माझी चिंता समाधान पावली । चर्चितां गुह्य गुण ॥८२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP