प्रसंग पहिला - लेखन अनुभवी असावें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



क्षेम देतां बुके फरासास । लाविल्‍याविण सुगंध लागे अंगास । तैसें आळविलें पाहिजे गुणवंतांस । लक्षण वोळखोनियां ॥७३॥
पवित्र पवित्रासी भेटतेवेळे । होती प्रेमसुखाचे सोहोळे । त्‍यासी देखोनि चांडाळ तळमळे । अभाग्‍यपणें ॥७४॥
साधूस जाल्‍या साधूचें दर्शन । बीजरत्‍नें द्रवती मुखामधुन । तेणें पुनित होय त्रिभुवन । चांडाळ देखील ॥७५॥
ज्‍यासी पडेल गुरुत्‍व ठावें । तेणें मौन्य धरूनियां राहावें । गंभीरत्‍वें आचरण आचरावें । या जनांमध्यें ॥७६॥
केळीजवळी लाविल्‍या बोरी । वारियानें हालवितां सर्वांग चिरी । तैसी या जनाची संगती बरी नव्हे । साधुजनांलागी ॥७७॥
नेणतेपणें अविद्या उपधि । जाणतपणें होय वेवादी । म्‍हणऊनि हे दोन्ही पण छेदी । सज्ञानपणें ॥७८॥
नेणतपण खैराचा शूळ । जाणतपण चंदनाचा केवळ । टोचितां फुटतां न लगे वेळ । जाणीव नेणीस तैसी असे ॥७९॥
खैर जळोनि होय निमग्‍न । झिजल्‍या श्रीखंड होय केवळ चंदन । तैसे गळित जाल्‍या साधुसज्‍जन । शीतळ मिरविती जनांभीतरी ॥८०॥
हें सद्‌गुरुनें सांगितलें उपलक्षण । पुन्हांहि सांगती कुशळपण । तें ऐकावें विवेकीं विवरोन । ज्ञान विज्ञान गोडी ॥८१॥
पाहे रुचि जाणे रुचिलागुन । तेथें मनाचें होय अमनपण । तें विकारारहित बरर्वपण । पंचमा वागवितील ॥८२॥
त्‍या पंचमा सांगेन वेगळाल्‍या । ज्‍या या सर्वत्रातें प्रसवल्‍या । नांवें नातलग होऊनि पिशुना जाल्‍या । ज्‍याच्या त्‍यामध्यें ॥८३॥
सद्‌गुरु म्‍हणे शेख महंमद । आणिक एक ऐके पां शब्‍द । प्रारब्‍ध संचित क्रिया वेवाद । ज्‍याच्यानि गुणें ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP