करुणा - अभंग ३१ ते ३३

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


अभंग ३१ ते ३३
३१.
येईं जीवाचिया जीवा । रामा देवाचिया देवा ॥१॥
सर्व देव बंदीं पडिले । रामा तुम्ही सोडविले ॥२॥
मारूनियां लंकापती । सोडविली सीता सती ॥३॥
देवा तुमची ऐसी ख्याती । रुद्रादिक ते वर्णिती ॥४॥
३२.
शरण आलों नारायण । आतां तारीं हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया । त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला । हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥
जनी म्हणे देवा शरण । व्हावे भल्याने जाणोन ॥४॥
३३.
ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१॥
माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आस । न करीं निरास आर्तभूतां ॥२॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा । अभय तो द्यावा कर तयां ॥३॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य  उच्चैश्रवा । अढळ पद ध्रुवा दिधलेंसे ॥४॥
उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तूं दातारू काय वानूं ॥५॥
म्हणे दासी जनी आलें या कीर्तनीं । तया कंटाळुनी पिंटू नका ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-01-30T20:16:38.6530000