करुणा - अभंग १३ ते १५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१३.
तुझी नाहीं केली सेवा ।  दुख वाटतसे जीवा ॥१॥
नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें  दु:ख झालें मला । तें तूं सोशिलें विठ्ठला ॥३॥
क्षमा करीं देवराया । दासी जनी लागे पायां ॥४॥
१४.
आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी ॥१॥
तुम्हा थोराचें उचितें । हेंचि काय सांगूं तूंतें ॥२॥
अहो ब्रम्हियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥
दयेच्या सागरा । जनी म्हणे अमरेश्वरा ॥४॥
१५.
आम्हीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥
सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
जळकोपलें जळचरासी । माता न घे बाळकासी ॥३॥
म्हणे जनी आलें शरण । जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP