मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|संत नामदेव रचित गवळण| ६ ते १० संत नामदेव रचित गवळण १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३४ गवळण - ६ ते १० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगगवळणनामदेव ६ ते १० Translation - भाषांतर ६. येत येत उभा राजबिदीं । सर्वें चाले गोपाळांची मांदी । नारी पाहती उभया बिदीं । एकीच्या धरूनि बाहुवा खांदीं ॥१॥हरिहरनंदना साद्दश्य लोचना । डोळ्यां वेगळा न बा जासी कान्हा । अरे कान्हा मनमोहना । गोपी भुलल्या तुझिया गुणा ॥ध्रु०॥चतुर्वेद नागवी भाट सांगातें । उभया वर्णितां रामकृष्णातें । श्रुति स्मृति विद्यावंतें । जय जय म्हणती कृपानिधितें ॥२॥येत येत उभा रहात । सुदाम्याच्या खांद्यावरी हात । समद्दष्टी गोपिका न्याहाळीत । चैतन्य चोरोनि आनंदें डुल्लत ॥३॥ऐसा कृष्ण सौभाग्यसुंदर । लावण्य गुण रत्नाकर । विष्णुदास नामयाचा दातार । भक्ति भावें वोळंगा सारंगधर ॥४॥७. जाये जाये जाये परतोनी पाहे । लाजावला जीव पर न लगे सोय गे माय ॥१॥नावेक विठ्ठल पाहूं द्या साजणी । न पुरे गे धणी डोळियांची ॥२॥देखिला गे माय लावण्यसागर । नामया दातार केशिराज ॥३॥८. मल्हार महुडें गगनीं दाटलें । विजु खळें गर्जिन्नलें गे माय ॥१॥गोविंद पाहाया लौकरी । कैसे वरुषताहे मधु धारी ये माया ॥२॥आनंदें मयूरें नाचती आपैसे । प्रेमे निळकंठ झाले ते कैसे ॥३॥नामया स्वामी द्दष्टी सोज्वळ । जीव लागला गोपाळेगे माय ॥४॥९. ध्यान सांवळें गोकुळींचें । धांव पाव वेगीं हरी सांवळिया ॥ध्रु०॥सांवळीसी आंगीं उटी । सांवळी कस्तुरी लल्लाटीं । सांवळीसी कांसे कासियला कटीं । गोवळिया ॥१॥सांवळीसी तनु वरवी । सांवळें वृंदावन मिरवी । सांवळ्याशा तुळसी कानीं । मंजुरिया कोंवळिया ॥२॥संवळीसी कंठीं माळा । सांवळें ह्रदयीं पदक विशाळा । सांवळ्याशा गोपी केल्या ओंवळ्या । गोंवळिया ॥३॥सांवाळिसी हातीं काठी । सांवळासा कांबळा पाठीं । नामयाचा स्वामी गायी राखी । धवळ्या आणि पिंवळ्या ॥४॥१०. कोकिळे चित्कळा रत्नाची ते कीळा । मान ईं सोज्वळा वर्णूं हरीचा ॥१॥वृंदावनीं वेणू वाजे रुणुझुणू । वेध तनुमनु गोपाळांचा ॥२॥देहुडा पाउलीं हरि गोपाळा गोजिरीं । वाहाती ते लालोरी हरी छंदें ॥३॥वेधलीं वनचरें गोधनें अपारें । पक्षीकुळें साचारें तल्लिन झालीं ॥४॥यमुनेचें उदक जळचरें सम्यक । पाताळीं पन्नग एको ठेली ॥५॥ऐसे कृष्ण वेधें तल्लिन झाले बोधें । नामा म्हणे वेणूछंदें स्थिर झाली ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP