मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|सुदामचरित्र| भाग २६ ते २८ सुदामचरित्र भाग १ ते ५ भाग ६ ते १० भाग ११ ते १५ भाग १६ ते २० भाग २१ ते २५ भाग २६ ते २८ सुदामचरित्र - भाग २६ ते २८ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव भाग २६ ते २८ Translation - भाषांतर २६. भक्षूनियां पोहे संतुष्ट जाहला । मग आनंदला नारायण ॥१॥विश्वकर्म्यालागीं तेव्हां आज्ञा केली । क्षणांत रचिली सुदामपुरी ॥२॥सर्व सुवर्णाची द्वारकेप्रमाणें । ब्राम्हणासी दान गुप्त दिल्हें ॥३॥नामा म्हणे दुजा नाहीं देवावीण । देतांघेतां जाण पांडुरंग ॥४॥२७. सुदामा म्हणे अनंता । आम्हा आज्ञा द्यावी आतां ॥१॥जाऊं घरासीं सत्वर । येऊनि दीवस झाले चार ॥२॥सर्व ठेउनी जातां बरें । वाटे मारिती तस्कर ॥३॥ऐसी ऐकोणी वचनें । सर्व काढिलीं भूषणें ॥४॥आज्ञा घेउनी चालिला । देव बोळवीत आला ॥५॥नामा म्हणे चोर । याचा उफराटा व्यापार ॥६॥२८. नाहीं आमुचे दैवीं त्याणें कोठोनी द्यावें । व्यर्थ कां रुसावें देवावरी ॥१॥न करितां खेद पुढें वाट चाले । गौरक्षक भेटले तयालागीं ॥२॥पुसतसे त्यासी कोणाचें नगर । ते म्हणती घर सुदाम्याचें ॥३॥सुदाम्याची तुम्ही हेळणा करितां । तयाच्या संचीता प्राप्त कैचें ॥४॥मानुनी असार नगरद्वारा गेला । प्रचीती तयाला नयेचि ते ॥५॥जेव्हां वेत्नधारी मजुरा करिती । चरणासी लागती सुदाम्याच्या ॥६॥सुदामदेव तेव्हां मंदिरासी गेला । मग ओंवाळिला सुंदरीनें ॥७॥समाधानी झाला सुदामा ब्राम्हण । करारे कीर्तन नामा म्हणे ॥८॥ N/A References : N/A Last Updated : January 14, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP