मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|सुदामचरित्र| भाग २१ ते २५ सुदामचरित्र भाग १ ते ५ भाग ६ ते १० भाग ११ ते १५ भाग १६ ते २० भाग २१ ते २५ भाग २६ ते २८ सुदामचरित्र - भाग २१ ते २५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव भाग २१ ते २५ Translation - भाषांतर २१. देखिला सांवळा राजा द्वारकेचा । सर्वही सुखाचा ठेवा दिसे ॥१॥माथां तो मुगुट कुंडलें श्रवणीं । प्रभा दिनमणी तुच्छ जेथें ॥२॥कोटी मन्मथांची झाडणी करावी । ऐसी ते बरवी अंगकांती ॥३॥श्रीमुख शोभलें पूर्णचंद्रा ऐसें । देखतांचि दोष सर्व जाती ॥४॥केशराची उटी कस्तुरी मळवटी । माळ रुळे कंठीं वैजयंती ॥५॥श्रीवच्छलांछन मुद्रिका भूषण । झळकती आन भुजादंड ॥६॥नामा म्हणे ऐसा देखियेला देव । तयाचा अनुभव काय वानूं ॥७॥२२. देखिला सुदामा आपुल्या नयनीं । मग चक्रपाणी उठे त्वरें ॥१॥सिंहासना खालीं टाकोनियां उडी । कर द्वय जोडी नमनालागीं ॥२॥भेटूनियां तेव्हां धरिला हस्तकीं । बैसवी मंचकीं वैडुर्याच्या ॥३॥म्हणे रुक्मिणीसी आणीं उदकाला । पुजूं या द्विजाला सन्मानेंसी ॥४॥नामा म्हणे देवें चरण प्रक्षाळिले । आंचळीं पुसीले आपुलिया ॥५॥२३. स्नानालागीं उठा म्हणे नारायण । आणविलें उष्ण पाणी तेव्हां ॥१॥सोळा सहस्र स्त्रिया उटणीं लाविती । अक्षवाण आरती करिताती ॥२॥करविलें स्नान पतिबंर परिधान । अलंकार भूषणें दिल्हीं त्यासीं ॥३॥स्वइच्छा भोजन वाढिलें तयासी । नामाही पंक्तिसी बैसविला ॥४॥२४. सोळा सहस्र ताटें द्विजालागीं आलीं । अमृताची गेली चवी तेव्हां ॥१॥पक्कान्नाचा तरी वाढवूं विस्तार । होईल उशीर कथेलागीं ॥२॥हरिरुचि जेवण सुदामा जेविला । वेगीं आंचवला संसारासी ॥३॥नामा म्हणे त्यासी देवें दिल्या विडा । रंगला तो जोडा वैराग्याचा ॥४॥२५. काय वहिनीनें दिधलें आम्हांसी । दाखवा वेगेसी कृष्ण म्हणे ॥१॥सोडियेली तेव्हां मुष्टी तंदुळिका । रुक्मीणीनाइका पुढें ठेवी ॥२॥घेऊनि ते पोहे मुखामाजी टाकी । मागे ते भीमकी धरोनी हात ॥३॥ब्रम्हदिक देव उभे पोह्यांसाठीं । नाहीं त्या लल्लाटीं नामा म्हणे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 14, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP