श्रीगुरुबोध ग्रंथ - अष्टम प्रकरण

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

॥ श्रीगणेशायनम: ॥ ऐसी स्थिति ज्यांची झाली । ते कां करितील वाचळी । अद्वयसमुद्रींच्या जळीं । विरोनि गेले ॥१॥
जैसें जळामाजीं लवण । तैसें ज्यांचें जीवपण । समरसोनि गेलें जाण । सुखसमुद्रीं ॥२॥
येर जे अभक्त शब्दज्ञानी । ते चातुर्यकला दाविती जनीं । परी अंतरीं स्वानुभूति राणी । वास न करी ॥३॥
लोकांसि नाना प्रश्न करिती । सांगू जातां अडविती । आपण जाणते म्हणूनि दाविती । जनांमाजीं ॥४॥
साधु जें गुह्या सांगती । तें सर्व लपोनि आयकती । ठाउकें आहे म्हाणूनि मिरविती । थोरवी लोकीं ॥५॥
जनहो आइका आइका । ऐशा रीतीं फसूं नका । येणें तुम्हां यमलोका । जाणें घडे ॥६॥
शब्दज्ञान काय करावें । आपण अंगें अनुभवावें । सद्नुरूसी शरण जावें । म्हणजे कळे ॥७॥
साधे सद्‌गुरूची कृपा । तरीच हा मार्ग सोपा । नाहीं तरी तुमच्या पापां । मोज नाहीं ॥८॥
श्रीरामाचें भजन करा । आनंदयोगें संसार तरा । श्रीगुरूचे चरण स्मरा । अंतर्यामीं ॥९॥
असो त्याची आतां कथा । तुवां सर्व आयकिलें तत्वतां । ज्ञान झालें तरी भजनपथा । न मोडावें ॥१०॥
कर्म यथायुक्त करावें । निष्काम ईश्वरीं समर्पावें । भजन पूजन वाढवावें । सर्वोत्तमाचें ॥११॥
निर्गुण ज्ञान अनुभवावें । सगुण भजन न सोडावें । सर्वकाळ ध्यान करावें । सद्नुरूचें ॥१२॥
सद्नुगुरु सद्रुगुरु सद्रुगुरु  । ऐसा नामांचा गजरु । भावें करितां अहंकारु । गळोनि जाय ॥१३॥
अहंकाराचें जें गळणें । तेंचि स्वरूपाचा उदय होणें । गुरुकृपोचिया खुणे । गुरुभक्त जाणती ॥१४॥
इतरांसि तेथें टकमळ । ज्यांसि निश्चयो नाहीं एक । देहबुद्धीचा कलंक । गेला नाहीं ॥१५॥
सगुण भक्तीची ऐसी रीति । कीं योषाजारपरी स्थिति । अनुसंधान न सोडी दिवसरातीं । एक क्षण ॥१६॥
श्रीसद‌गुरूचें करीं ध्यान । परी निरवयव अलक्ष्य लक्षीं खूण । सच्चिदानंद मूर्ति जाण । अनुभवें पाहे ॥१७॥
जो जो पदार्थ द्दष्टीं पडावा । तो तो सद्‌गुरुस्वरूप जाणावा । येणें रीतीम अनुभवावा । विश्वात्मयोग ॥१८॥
द्रष्टयावांचूनि द्दश्य दिसेना । तरी द्रष्टयाविणें असेना । उद्भव स्थिति लय जाणा । द्र्ष्टयाचिमाजीं ॥१९॥
समुद्रास्मात लहरी उठती । समुद्रावरीचा तगती । समुद्रींच विरोनि जाती । अकस्मात ॥२०॥
आपाअपणा विसरला । म्हाणोनि द्दश्याचा भास झाला । अनुभवें पाहतां जडभागाला । उरी नाहीं ॥२१॥
जो जो पदार्थ साकार दिसे । तो तो सत्यत्वें जरी भासे । तरी आकार ठसा बसतसे । मनामाजीं ॥२२॥
जें जें द्दश्य द्दष्टीं पडलें । तें तें सच्चिदानंदाचें घडलें । ऐशा अनुभवें उघडलें । कैवल्यपद ॥२३॥
आकारीं निकाराचें स्फुरण । तरी ठसा निराकाराचा उठे जाण । आकार सत्य मानितां आपण । बद्ध झाला ॥२४॥
जो जो पदार्थ पाहे । त्यामाजीं आपण भरला आहे । अनाम अरूप जाणताहे । खूण आपुली ॥२५॥
जेथें तुर्या उन्मनी विरती । क  ओणे सांगावी ते स्थिति । ऐशा रीतीं जे अनुभविती । तेचि धन्य ॥२६॥
ईश्वराचे मोठे उपकार । दिधला मनुष्याचा आकार । तेणें आपण निराकार । कळों आलें ॥२७॥
त्या ईस्वराचें भजन । सर्वकाळ करावें जाण । जयाचे उपकाराउत्तीर्ण । कदा नोहे ॥२८॥
देव धणी आपण चाकर । ऐसा असावा कृतनिर्धार । तयाचें पूजन निरंतर । करीत जावें ॥२९॥
जयाचें अनंत अवतार । रूपें अलक्ष निराकार । तयासि घालावे नमस्कार । सर्वात्मभावें ॥३०॥
याला म्हाणती उपासना । यावांचूनि शोभा नाहीं ज्ञाना । जैसी सुस्वरूप अंगना । परी तिलक नाहीं ॥३१॥
स्वानुभूति अंगें वरावी । उपासना द्दढ धरावी । अखंड ध्यानी आठवावी । सद्‌गुरु मूर्ति ॥३२॥
इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । ह्रदयीं भेटे ॥३३॥
इति श्रीगुरुबोधे अष्टम प्रकरणं संपूर्णम्‌ ॥८॥ श्रीराम

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP