मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १| अभंग ९१ ते ९५ भक्तवत्सलता १ भक्तवत्सलता २ अभंग १ अभंग २ अभंग ३ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते १०८ भक्तवत्सलता - अभंग ९१ ते ९५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ९१ ते ९५ Translation - भाषांतर ९१.देऊनि भातुकें गळां घाली मिठी । सखा जगजेठी भक्ती भावा ॥१॥आधार करोनि राहिले पंढरीं । तेथें निरंतरीं प्रेम दावी ॥२॥नामा ह्मणे सेवा करोनियां शुद्ध । संसार संबंध नाहीं तया ॥३॥९२.कोल्हीं कय कोल्हीं होती जड । तैसें तुझें मज मिळालें असे वाड ॥१॥आंधळें मुकें कानीं नायके । त्यासी काय जननी पोसूं न शके ॥२॥नामा म्हणे केशव क्रुपेचा सागरु । जयाचा जारु तयासींच भारु ॥३॥९३.योगी हे शिणती तुझिये प्राप्तिलागीं । नातुडसी जगीं कवणासी ॥१॥एक जटा नखेम स्वयें वाढविती । दिगंबर होती एक देवा ॥२॥त्यांसी तुझी भेटी नव्हेचि कल्पांतीं । अखंड शिणती साधनानें ॥३॥आमचे सन्निध सर्वदा राहसी । आमच्या भाग्यासी पार नाहीं ॥४॥धन्य झालों आम्ही तुझिया प्रसादें । नाचे तुझ्या छंदें नामदेव ॥५॥९४.मजसाठीं काय लाजतोसी देवा । तृणा आणि जीवा साच होसी ॥१॥ते काय पवाडे गमाविलों ब्रीदें । ब्रह्मादिकें वृंदें ध्याती कैसीं ॥२॥जाणतां नेणतां सर्वांसी उद्धार भवसिंधु पार पावविसी ॥३॥नामा ह्मणे तुःए उपकार ऐसे । दावीं जगदीशा हेळामात्रें ॥४॥९५.उपमन्यु बाळा स्थापी क्षीरसिंधु । अनाथाचा बंधु नाराणा ॥१॥तुझें नाम मुखीं जपे सर्वकाळ । दिधलें अढळपद त्यासी ॥२॥अनेक वृत्तांत काय सांगों देवा । अन्याय केशवा कोण मानी ॥३॥नामा ह्मणे तैसें मी नाहीं मागत । ऐकोनियां मात आलों जन्मा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP