मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीविठ्ठलमाहात्म्य| अभंग ६१ ते ६५ श्रीविठ्ठलमाहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८६ अभंग ८७ श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ६१ ते ६५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ६१ ते ६५ Translation - भाषांतर ६१.बांधिलें राहीना वैरलें खाईना । दवडिलें जाईना जाणते हो ॥१॥तय खुंटा नांदावें सौरसें बांधावें । कशानें करावें वोढाळें हो ॥२॥तया नेत्र ना पाय तिन्ही एक पाहे । न देखावे ते ठाय देखताहे ॥३॥नामा म्हणे श्रोता विचारावें ज्ञानीं । केश-वाचे नयनीं उतरला ॥४॥६२.ध्यान धारणा नलगे टाळी । विठो पाहावा उघडे डोळीं ॥१॥विठो समाधीचें सुख । पाहतां हरे तहान भूक ॥२॥नामा ह्मणे न करीं कांहीं । चित्त रंगलें हरीचें पायीं ॥३॥६३.येतियां पुसे जातियां धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥येंई विठाबाई आई माउलीये । निढळावरी कर ठेऊनि पालवीये ॥२॥पिवळा पितांबर गगनीं झळकला । गरुडावरी बैसोनी माझ कैवारी आला ॥३॥डोळ्यांतील बाहुली माझी विठाई झाली । घनानंद मूर्ति माझ्या ध्यानासी आली ॥४॥विठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जीवेंभावें ओंवाळी ॥५॥६४.विठ्ठलेंविण जया न गमे एक घडी । सर्वस्व आवडी विठ्ठालाची ॥१॥विठ्ठालचि माता विठ्ठालचि पिता । भगिनी आणि भ्राता विठ्ठालचि ॥२॥विठ्ठालचि क्रिया विठ्ठालचि कर्म । विठ्ठाल सकल धर्म कुळदैवत ॥३॥गुज गौप्य जीविचें विठ्ठाल सांगावे । विठ्ठालें पुर-वावें कोड त्याचें ॥४॥सर्वकाळ करणें विठ्ठालाची कथा । विठ्ठाल जडला चित्ता जयाचिया ॥५॥विठ्ठाल जागृति स्वप्र आणि सुषुप्ति । अखंड वदती विठ्ठाल विठ्ठाल ॥६॥ऐसें सर्वस्वेसीं विठ्ठाल भजतां । सुख आलें हातां विठ्ठालाचे ॥७॥नामा ह्मणे त्याचे चरणरज होऊन । जाहलोंसे पावन ह्मणे आतां ॥८॥६५.विठ्ठाल विसांवा सकळिकां । विठ्ठाल आधार तिही लोकां । विठ्ठाल नकळे ब्रह्मांदिकां । विठ्ठाल रेखा पंढरीये ॥१॥विठ्ठाल डोळस सांवळा । विठ्ठाल धरारे मानसीं । विठ्ठाल सोडवील अहर्निशीं । विठ्ठालावीण मुक्ति कैंची । कुंटणी गणिकेसी उद्धरिलें ॥३॥विठ्ठाल उभा भीमातिरीं । कर ठेवूनि कटावरी । विठ्ठाल भक्ताकाज कैवारी । विठ्ठाल हरी महादोष ॥४॥विठ्ठाल अनाथ कोंवसा । विठ्ठाल नुपेक्षी भरवंस। विठ्ठालेंविण शून्य दाही दिशा । विठ्ठालविण नाहीं हे अनेक ॥५॥श्रीविठ्ठल भक्तीरस । श्रीविठ्ठल परम पुरुष । विष्णुदास ह्मणे नामा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP