मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीविठ्ठलमाहात्म्य| अभंग ४ ते १० श्रीविठ्ठलमाहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८६ अभंग ८७ श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ४ ते १० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ४ ते १० Translation - भाषांतर ४.ज्ञानियांचें ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकाचें प्रिय सुख वस्तु ॥१॥तें हें समचरण उभें विटेवरी । पहा भीमातीरीं विठ्ठल रूप ॥२॥जें तपस्वियांचें तप जें जपकांचें जाप्य । योगि-यांचें गौप्य परम धाम ॥३॥जें तेजकांचें तेज जें गुरु मंत्राचें गुज । जें पुजकांचें पूज्य कुळदैवत ॥४॥जें जीवनांतें जीववितें पवनातें निववीतें । जें भक्तांचें उगवितें माया जाळ ॥५॥नामा ह्मणे तें सुखची आयतें । जोडलें पुंडलि भाग्य योगें ॥६॥५.वेदांसी अगोचर परब्रह्म कारण । योगिया ह्लदयींचें ममत्व निर्वाण । आकळूं न कळेचि शेखीं धरियेलें मौन । तें रूप पंढरीये विटे समचरण ॥१॥कानडा विठ्ठलवो । उभा भिवरेतीरीं । भक्तांचें आर्तवो जीवा लागलें भारी ॥धृ०॥भूवैकुंठ पंढरी हे देवें रचियली पैं गा । शिवें ती वंदियेली विठो सम चरणांची गंगा । सदाचा नामघोषु कलिमल जाय भंगा । काय वानूं सुख तेथिंर्चे । भेटिलिया पांडुरंगा ॥२॥विठठल नाम वाचे जना हाचि उपचारू । ह्मणवूनि दावि तुझे कटीं ठेवूनियां करू । येरासी मायानदी काम क्रोध मगरू । ठेवा हा नामयाचा स्वामि विठ्ठल वीरू ॥३॥६. वेडावली वाचा वेदाची बोलतां । देवा पाहूं जातां अनिर्वाच्य ॥१॥अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली । जिव्हा हे चि-रली भूधराची ॥२॥भूधराची जिव्हा झालिसे कुंठित । नामा ह्मणे अंत नलगे त्याचा ॥३॥७.हवा हवा ह्मणताती श्रुति । परि त्या नेणती भुललीया ॥१॥तुझिया रूपा नेणती अगा कमळापती । बाळक म्हणती गौळियाचें ॥२॥विष्णुदास नामयानें दावियेल्या खुणा । पंढरीचा राणी श्रीविठ्ठल ॥३॥८. जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तया-लागीं ॥१॥तोचि गोकुळांत होऊनि गोंवळ । झणवितो बाळ यशो-देचा ॥२॥चिन्मय चिद्रूप अक्षय अपार । अपार परेहूनि पर ह्मणती ज्यातें ॥३॥सर्वां भूतांचे फुटकाये खोळें । भरलें न गळे आत्मपणें ॥४॥आनंदी आनंद मातला अपार । वेदालाही पार नाही ज्याचा ॥५॥नामा ह्मणे सर्व रूपें जें रूपस । गोकुळीं विलास मांडियेला ॥६॥९. पुष्पासी परिमळु दूध घृत मेळु । ऊंस तो रसाळु बीज नाहीं ॥१॥तैसें परब्रह्म आहे तें निर्वाण । वर्णितां पुराण नपडे ठायी ॥२॥दीपाचीही दीप्ति दर्पणची कांति । तैसी ब्रह्ममति कवण जाणे ॥३॥नामा ह्मणे जैसें सर्वांघटीं आकाश । केशव परमहंस तैसा जाणे ॥४॥१०.निर्गुण सगुण नाहीं ज्या आकार । होऊनि साकार तोचि ठेला ॥१॥जळीं जळगार दिसे जैशा परी । तैसा निराकारी साकार हा ॥२॥सुवर्ण कीं धन धन कीं सुवर्ण । निर्गुणीं सगुण ययापरी ॥३॥ऐसा पूर्णपणें सहजीं सहज । सखा केशिराज प्रगटला ॥४॥पांडुरंगीं अंगें सर्व झालें जग । निववी सर्वांग नामा ह्मणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP