मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीविठ्ठलमाहात्म्य| अभंग १६ ते २० श्रीविठ्ठलमाहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८६ अभंग ८७ श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग १६ ते २० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १६ ते २० Translation - भाषांतर १६.हात पाय सर्व मिळोनियां मेळा । चला पाहूं डोळां ह्मणताती ॥१॥देखणें तें नव्हे देखतील कैसें । देखण्याची असे सर्व डोळां ॥२॥चंचुभूत अंश अशांत मिळाली । निर्गुणाची खोली देव जाणे ॥३॥नामा ह्मणे तेव्हां तुज पाहों आला । पाहोनि तो ठेला सर्वांभूतीं ॥४॥१७. देख देख देख पैल पैल । पैल उभा असे विटेवरी ॥१॥खोळे बुंथीचा आकारु झकळे पीतांबरु । सौभाग्य सुंदरु विठ्ठल देव ॥२॥दान दीक्षा गुरू नामया दातारू । धरावया नागरू केशिराज ॥३॥१८. काष्ठीं अग्नीम असे प्रगटे नयनीं । काष्ठींही असोन्नी वेग-ळाची ॥१॥तैसें निर्धारितां असे पैं सकळां । दावितां निराळा पांडु रंग ॥२॥तरु बीजीं जैसें सर्व व्यापक असे । जळाविण नसे फळ पहा कीं ॥३॥नामा ह्मने बीज नासिलें तें भोग । तूंचि पांडुरंग आह्यांसाठीं ॥४॥१९.वैकुंठीं माहें तंव चतुर्भुज दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥१॥क्षीरसागरीं पाहें तों तेथें निद्रिस्त । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥२॥द्वारके पाहें तंव पाताळीं चरण । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥३॥ह्लदयीं पाहें तंव अव्यक्तचि दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥४॥नामा ह्मणे ऐसा सर्व गुण संपूर्ण । पंढरीये उभा शोभतसे ॥५॥२०.निर्गुण सगुण नव्हे तें समान । तैसें तेंही जाण योगा-भ्यासीं ॥१॥प्रल्हादासी हरी शंख चक्र गदा । सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥अर्जुनासी देव उभा पाचारासी । सखा उद्धवासी साक्ष दावी ॥३॥नामा म्हणे माझा केशिराज भोळा । दाविसी गो-पाळां बाळलीळा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP