महावाक्यपंचीकरण - शतक पांचवे

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


॥ श्रीरामसमर्थ ॥

ऐसा ब्रह्म गोळ पंचभूतखेळ । यामाजी सकळ जीवसृष्टी ॥१॥
च्यारी खाणी च्यारी वाणी जीव नाना । योनी लक्ष जाणा चौर्‍यासी ते ॥२॥
अंडज जारज स्वेदज उद्भिज । खाणीचा समज च्यारी ऐसा ॥३॥
अंडीं जे निपजे अंडज बोलिजे । जारज जाणिजे जारामाजी ॥४॥
पिंडब्रह्मांडींच्या स्वेदें जें निर्मित । स्वेदज हे मात जाणिजे पैं ॥५॥
अंतरिक्ष वायूमाजी प्राणी होती । कितीयेक क्षिती उद्भिज ते ॥६॥
उन्मेश स्फुरण परेचें लक्षण । ध्वनीरूप जाण पश्यंती हे ॥७॥
मध्यमा तो नाद वैखरी तो शब्द । च्यारी वाचा भेद ऐसा असे ॥८॥
पृथ्वीआपयोगें द्रव्यशक्तियुक्त । नाना उद्भवत बीजवडी ॥९॥
तेथुनी औषधी पासूनिया अन्न । पुढें वृद्धि जाण रेत त्याचें ॥१०॥
भूमी गोळा बाह्य याची दशगुणें । असें आवरण पृथ्वीयेचें ॥११॥
तया दशगुणें आवर्णोदक हें । वेष्टणासी आहे सभोवतें ॥१२॥
तया दशगुणें धडाडीत ज्वाळ । तो आवर्णानळ वेष्टलासे ॥१३॥
तया दशगुणें थोर आवरण । जाणिजे पवन आधारासी ॥१४॥
तया थोर दशगुणाधीक । नभाचें कौतुक आहे पैं या ॥१५॥
तया दशगुण अहंकार जाण । त्रिविध हे गुण येकत्वेंसी ॥१६॥
तया दशगुण महत्तत्व जाण । असे पांघुरण ब्रह्मगोळीं ॥१७॥
ऐसें सप्तावर्ण सर्व हें ब्रह्मांड । सप्तावर्ण पिंड तैसें ऐक्य॥१८॥
ऐसीं हें ब्रह्मांडें मायेचे उदरीं । होये भरोवरी स्फूर्तीमाजीं ॥१९॥
विराटीं उभारा सृष्टीची रचना । जागृति हे जाणा अवस्था पैं ॥२०॥
रजोगुण येथें उत्पत्ति बोलिजे । अभिमानी बुझे ब्रह्माऐसें ॥२१॥
प्रथम चरण प्रणवाचा स्थूळ । आकार केवळ मात्रा ऐसी ॥२२॥
हिरण्यगर्भ लिंग स्थिति अवस्था ते । सत्त्वगुण येथें जाणावा पै ॥२३॥
अभिमानी विष्णु तेजसु तो भोक्ता । तारितो बुडतां भवीं जीवा ॥२४॥
उकार हे मात्रा दुजी प्रणवाची । सूक्ष्म देहाची गती ऐसी ॥२५॥
देवाचें कारण देह जे प्रकृती । प्रळये सुषुप्ति अवस्था ते ॥२६॥
अभिमानी येथें रुद्र महेश्वर। मात्रा ते मकार प्रणवाची ॥२७॥
अव्याकृत तें चि तमोगुण होये । ऐसे पादत्रये प्रणवाचे ॥२८॥
सर्व सांगितली त्रिदेहांची युक्ती । ऐक्याचे अंती बरें पाहा ॥२९॥
महाकारण जें देवाचें शरीर । स्वतां सर्वेश्वर अभिमानी ॥३०॥
सर्वसाक्षी ते चि अवस्था जाणावी। मात्रा ते प्रणवी अर्ध चौथी ॥३१॥
ब्रह्मांडींचे देहत्रय जे विशद । सबळ तत्पद कारणाचें ॥३२॥
पंचभूतें आणि त्रिगुण प्रसार । अष्टधा ॐ कार विस्तारला ॥३३॥
शिवचतुष्टयें ब्रह्मांड बोलिलें । पाहिजे ऐकिलें पिंड कैसें ॥३४॥
पिंडी देहधारी जीव चतुष्टये । कैसा तो अन्वये सांगिजेल ॥३६¹॥
आत्माराम सत्य जो स्वानंदघन । तें मूळ स्फुरण ब्रह्माकार ॥३७॥
त्यासी स्वरूपाचें नाहीं विस्मरण । चिन्मये तो पूर्ण ब्रह्मरूप ॥३८॥
त्यासी इच्छा जाली सृष्टी व्हावी ऐसी । किंचित्‍ स्वरूपासी विस्मरे तो ॥३९॥
तें चि विस्मरण महामाया जाण । ईश्वरीं षड्‍गुण उद्भवले ॥४०॥
सृष्टीचें चिंतन स्वरूपीं दुश्चित। अज्ञानें अनंत शक्ति जाल्या ॥४१॥
मायोपाधी तें चि ब्रह्मांड हे शिव। सबळत्व भाव तत्पदाचा ॥४२॥
ते माया अज्ञान शक्ति प्रसवत । अविद्यासंकेत जीव तो चि ॥४३॥
अविद्यात्मक जीव ( तो चि ) पिंड गोळ । त्वंपद सबळ भ्रांतियोगें ॥४४॥
महामायायोगें ईश्वर षड्‍गुण । तें पूर्ण चैतन्य बोलिजेतें ॥४५॥
अविद्यात्मक हें जीवाचें अज्ञान । प्रत्यक चैतन्य ( जा ) णावें पैं ॥४६॥
नौतें बंड जैंईं स्फूर्ती होती जैसी । जालियां हि तैसी साक्षरूपें ॥४७॥
परम पुरुष देव निरंतर । जीव हा साचार औंश त्याचा ॥४८॥
माया अव्याकृत तयेचें कारण । प्रकृति अज्ञान तें चि पिंडीम ॥४९॥
ज्ञानरूप होय शुद्ध हा मुळीचा । अज्ञानें जीवाचा आळ आला ॥५०॥
अविद्येच्या लिंगे शरीरें वेष्टला । भ्रमानें भुलला आपणातें ॥५१॥
संमत श्लोकार्ध अज्ञानेनावृतं । ज्ञानं तेन मोहियंति जंतुहाº
अज्ञान तेथें चि तें अन्यथा ज्ञान । येणें चि दारुनें दु:ख जीवा ॥५२॥
जीव जाणपण प्रकृति अज्ञान । शिवशक्ती खूण ऐसी येथें ॥५३॥
स्थूळ देहपुर माजीं जीव नर । आहे निरंतर निद्रिस्त हा ॥५४॥
स्फूर्ति पूर्ण देव सूत्रधारी सर्व । सत्तायोगें जीव धरीयेले ॥५५॥
श्लोकार्ध ॥ मयि सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मणिगणा इव ॥
येके धातु माळ सूत्र आणि मणी । अंतरात्मा धणी जीवां तैसा ॥५६॥
अविद्या आरसा माया प्रतिबिंब । बिंबला आरंभ ब्रह्मांडाचा ॥५७॥
पिंडीं ईश्वर तो चौथा देह जाण । तो महांकारण जीव नामें ॥५८॥
तिजा देह जाण कारण अज्ञान । तें अन्यथा ज्ञान लिंगस्थानीं ॥५९॥
तेथें तो हिरण्यगर्भ संचरातु । ऐकावा वृतांतु लिंगदेह ॥६०॥
जीवा निर्विकल्प प्रथम स्फुरण । तें चि अंत:करण चतुष्टये ॥६१॥
संकल्प विकल्प मन वोळखावें । वुद्धीचें स्वभावरूप सांगों ॥६२॥
योजिलें जें कार्य करूनि निर्णयें । निर्धारी निश्चयें ते चि बुद्धी ॥६३॥
निर्धाराचा अर्थ चेतव्य चिंतीत । अनुसंधान चित्तरूप ऐसें ॥६४॥
अहंभावयोगे पदार्था ममता । सुखदु: खदाता अहंकार ॥६५॥
स्फूर्तिरूपें तो चि कारणांगें जीव । तेथें चंचळत्व अंत:करणीं ॥६६॥
ते चि पंचप्राण कोणें स्थानीं कोण । व्यापार लक्षण रूप त्याचा ॥६७॥
व्यान सर्व देहीं व्यापुनियां वर्ते । भोक्तव्य रसातें अंगिकारी ॥६८॥
शिरा नाडी देहीं प्रासार तयास । आप्यायन रस पाववीते॥६९॥
जें कां नाभिस्थान तेथें चि समान । तयाचें आसन जाणावें पैं ॥७०॥
तेथुनिया सर्व संधी विभागत । तेणें हे लवत हस्तपाद ॥७१॥
उदानाचें कंठस्थान कीं रहाणें । अन्नपान तेणें गिळीतसे ॥७२॥
स्वप्न निद्रिस्तासी तेथें ही संचार । नाना ते विकार दावीतसे ॥७३॥
गुदस्थानीं असे जाणावा अपान । त्या अधोगमन सर्वकाळ ॥७४॥
मळ आणि मूत्र त्याग निरंतर । तया़चा व्यापार ऐसा असे ॥७५॥
प्राणतंतु त्यासी अखंड वहाणें । नासामार्गें येणें जाणें घडे ॥७६॥
क्षुधा आणि तृषा कारकु शरीरीं । वेग भरोवरी सोहं ऐसा ॥७७॥
ज्ञानइंद्रिये आणि विषयेपंचक । तयातें वोळख ऐशापरी ॥७८॥
अंत:करण शब्द वृत्ति कर्णरंध्रीं । बैसोनी स्विकारी शब्द पै गा ॥७९॥
स्पर्शातें जाणणें मनोवृत्तिगुणें । त्वचइंद्रियेंणे अर्थ बुझे ॥८०॥
रूपोन्मुख वृत्ति बुद्धिची ऐका जी । रीघे चक्षूमाजीं रूप पाहे ॥८१॥
रसाचें ग्रहण चित्तवृत्ती जाण । जिव्हेची हे खूण मुखामाजीं ॥८२॥
गंधाचें आग्रहण अहंकार वृत्ती । नासापुटी वस्ती घ्राणइंद्रिय ॥८३॥
तेणें चि प्रमाणें जाणा कर्मइंद्रियें । सांगो येथान्वयें पंचकें तें ॥८४॥
जैसा शब्द योजी अंत:करणवृत्ती । अक्षरें बोलती वाचा तैसी ॥८५॥
मनाची वासना ते नाना कल्पना । प्राणेंद्रियें जाणा व्यापारासी ॥८६॥
बुद्धिचिया वृत्ती कार्याच्या निश्चयें । वेगीं पादइंद्रियें चेष्टवीती ॥८७॥
चित्तवृत्ती रसें कामातें वांछित । शिस्नद्वारें घेत रतीसुखा ॥८८॥
अहंकार करी मळमूत्रोत्सर्ग । पदार्थाचा योग गुदइंद्रियें ॥८९॥
अंत: करण प्राणयोगें त्रिपंचकें । बोलिलीं कौतुके जाणा तुम्ही ॥९०॥
ऐसे पंचवीस कळालिंग हे जीवाचें । हिरण्यगर्भ याचें आदिस्थान ॥९१॥
ईश्र्वराचीं जाणा देहइंद्रियें तें । ते आदिदैवतें जीवइंद्रियें ॥९२॥
पिंड ब्रह्मांड हें येकरूप आहे । समजोनी पाहे दृष्टांतासी ॥९३॥
जैसा असे येक वर्तुळ पाषान । त्या गर्भी तो अपान त्याचि ऐसा ॥९४॥
देवें तैसें चि हें ब्रह्मांड निर्मिलें । माजी पिंड केलें तदाकारें ॥९५॥
म्हणोनियां येक जीव शिव देख । नाहीम वेगळीक विचारितां ॥९६॥
इंद्रियें पिंडायीं अध्यात्म बोलिजे । रूप तयाचें जें आदिभूत ॥९७॥
ब्रह्मांडीं शिवाचीं इंद्रियें समस्तें । तें आदिदैवतें जीवइंद्रियें ॥९८॥
अध्यात्मादि भूत पिंड इंद्रियातें । मुळादि दैवतें ब्रह्मांडींचीं ॥९९॥
असो हें जीवाचें सूक्ष्म शरीर । ऐक्याचा विचार ऐसा असे ॥१००॥
कल्याण इयाचा निवडूनि अर्थ । श्रोतया यथार्थ सांगे पुढें ॥१०१॥

इति श्री महावाक्य पिंड सूक्ष्म देह विवरण नाम शत ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP