मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|महावाक्यपंचीकरण ग्रंथ| शतक चवथे महावाक्यपंचीकरण ग्रंथ शतक पहिले शतक दुसरे शतक तिसरे शतक चवथे शतक पांचवे शतक सहावे शतक सातवे महावाक्यपंचीकरण - शतक चवथे ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण शतक चवथे Translation - भाषांतर ॥ श्रीराम ॥तो परस्परानुप्रवेशाचा मेळा । तत्वें जालीं गोळा महाभूतीं ॥१॥अंत:करण व्यान श्रोत्र त्वचा ऐसीं । शब्देसीं आकाशीं प्रवेशलीं ॥२॥मन समान हे त्वचा चौथें पाणी । स्पर्शेसीं पवनीं मिसळलीं ॥३॥बुद्धि उदानेसी चक्षु पाद चौथें । रूपेंसीं मिळतें जालें तेजीं ॥४॥चित्त अपानेसीं जिव्हा शिस्न रस । जालीं समरसें जाण अपीं ॥५॥अहंकार प्राण घ्राण चौथें गुद । पांचवें ते गंध पृथ्वीयेसी ॥६॥ऐसी विषयरूप पंचभूतें यासीं । च्यारी येकयेकासी मिळालीं पै ॥७॥देवइच्छा माया ते मूळ प्रकृती । जाली विस्तारती त्रिधारूपें ॥८॥येथूनी प्रपंच शिव आणि जीव । उपाधी हे सर्व देवेम केली ॥९॥इच्छा मूळ शक्ति तेथें विस्मरण । देवाचें कारण अव्याकृत ॥१०॥महाभूतें मेळा येकत्र तामस । मायागुणें भास सूक्षमाचा ॥११॥ते चि गुणमाया भूतासमवेत । दो ठाईं करीत देवइच्छे ॥१२॥त्यांत येक भाग कळा पंचवीस । हिरण्यगर्भास निमीयले ॥१३॥अंत: करण विष्णु चेंद्र तो चि मनु । बुद्धि कमळासनु देव लिंगी ॥१४॥चित्त नारायणु अहंकार खूण । तो गौरीरमण जाणावा पैं ॥१५॥श्रोत्र दिशा आणि त्वचा तो पवन । चक्षु सूर्य जाण दिव्यरूप ॥१६॥जिव्हा ते वरुण घ्राणाचा जो ठाव । तो अश्विनीदेव ज्ञानेंद्रियें ॥१७॥वाचा जाण वन्ही पाणी तो सुरेशु । पाद जाणिजेषु त्रिविक्रम ॥१८॥शिस्न प्रजापती गुद तो नैरुती । देवाची निगुती कर्मइंद्रियें ॥१९॥व्रह्मांडीं विहरण तें चि पंचप्राण । दशभेदें जाण सप्त स्कंदीं ॥२०॥स्कंद कोणेपरी शिष्य प्रश्न करी । स्वामी तो उत्तरीं सांगे कैसें ॥२१॥पृथ्वीपासोनियां मेघाचें मंडळ । प्रथम सकळ अव स्कंद ॥२२॥मेघाहुनी सूर्यापर्यंत विशद । तो प्रवाह स्कंद दुसरा पैं ॥२३॥सूर्यापसोनियां चेंद्रमापावेतों । ऊर्ध स्कंद हा तो तिसरा कीं ॥२४॥चेंद्रापासोनियां ताराचें मंडळ ॥ चौथ्या हा केवळ सह स्कंद ॥२५॥नक्षत्रापासोनी शनीपर्यंत हा । वैव स्कंद पहा पांचवा तो ॥२६॥शनीपासोनियां सप्तऋषी जेथें । पर स्कंदु वर्ते सहावा तो ॥२७॥ऋषीपासुनीयां ध्रुवस्थानीं भेद । परिवाहा स्कंद सातवा तो ॥२८॥भूताचें कारन मात्रा सूक्षम जाण । इंद्रियेसि ज्ञान विषयो पांच ॥२९॥ऐसे पंचप्राण सप्त स्कंदी जाण । व्यापुना पवन चालतसे ॥३०॥विषयाचें सुख स्थूळेविण नाहीं । सूक्षमी वाहीं आतुडेना ॥३१॥यालागी हे स्थूळ विराट देवाचें । मिश्रित भूताचें पंचकृत ॥३२॥येक येक भूतें पांचा ठाईं केलीं । पांचा मेळविलीं परस्परें ॥३३॥हे ईश्वरिम इच्छा सर्व हि कारण । भूत पंचीकर्ण वेद बोले ॥३४॥येक चि आकाश पंच भाग जाले । ते कैसें मिळालें पंचविध ॥३५॥अंत: करणरूपें राहे आपणा पें । मिळे व्यानरूपें वायोआंगीं ॥३६॥श्रोत्ररूपें वन्ही वाचांश जीवनीं । शब्दांशे मेदिनी नभा ऐसे ॥३७॥वायु मनरूपें आकाशीं संचार । समान तो स्थीर आपणा पें ॥३८॥त्वचारूपें तेजीं पाणी तें अपासीं । स्पर्श तो पृथ्वीसी वायुऐसा ॥३९॥तेज बुद्धिरूपें प्रवेश आकासीं । आणि उदानेंसी वायुमाजी ॥४०॥चक्षु आपणा पें अपी पादरूपें । पृथ्वीरूप रूपें तेज ऐसें ॥४१॥आप चित्तरूपें मिसळे गगनीं । अपानें पवनीं समरसे॥४२॥तेजीं जिव्हारूपें शिस्न अपणा पें । पृथ्वी रसरूपें आपऐसें ॥४३॥पृथ्वी अहा रे मिळाली आकाशीं । प्राण तो वायुसी घ्राण तेजीं ॥४४॥अपासी ते गुद अपणा पे गंध । पृथ्वी पंचविध मिळे ऐसी ॥४५॥ऐसा हा येकोपा पंच महाभूतां । प्रकट स्थूळता पंचकृती ॥४६॥कवण भूताचा कवण गुण धर्म । कोण कैसा धर्म ऐकावें पै ॥४७॥सत्छिद्रता धर्म औकाश प्रधान । कर्म शब्दगुण आकाशाचें ॥४८॥शब्द स्पर्शे गुण चांचल्य हे धर्म । विहरणादि कर्म वायूचें पैं ॥४९॥शब्द स्पर्शे रूप गुण उष्ण धर्म । पचनादि कर्मे तेजाचे पैं ॥५०॥शब्द स्पर्शे रूप रस ऐसे गुण । कर्मधर्म कोण आपयाचे ॥५१॥द्रवत्व हे धर्म क्लेदनादि कर्म । बुझे आपवर्म सांगितलें ॥५२॥शब्द स्पर्श रूप रस आणि गंध । गुण पंचविध मेदिनीचे ॥५३॥कठीणत्व धर्म धारणादि कर्म । पृथ्वीयेचे नेम जाण ऐसे ॥५४॥मूळ तें कारण भूताचे हे गुण । कार्यासी ते जाण वर्तताती ॥५५॥आरद्रत्व जैसें असे त्या जळातें । ते तरंगीम वर्ते तैशापरी ॥५६॥येके भूतीं मुख्य ऐसे गुण येक । अन्ये अगांतुक चौं भूतांचे ॥५७॥ते कार्यपरत्वें मिळोनी वर्तती । अधिक हे युक्ती ऐसी असे ॥५८॥शब्द गुणाकाशीं तो वेद्य श्रोत्रांसी । जन्म हा वायूसी नभीं जाला ॥५९॥यालागी द्बिगुण समीरासी जाण । शब्द स्पर्श खूण श्रोत्र त्वचा ॥६०॥वायूपासुनीयां जन्म या तेजासी । म्हणोनी तयासी त्रिगुणीनें ॥६१॥शब्द स्पर्श रूप वेद्य हा त्रिपक्षु । श्रोत्र त्वचा चक्षु जाणा वन्ही ॥६२॥तेजापासोनियां जन्म या आपासी । वेद्य इंद्रियासी चतुर्गुणी ॥६३॥शब्द स्पर्श रूप रस गुण च्यारी । श्रोत्र त्वचा नेत्रीं जिव्हेसीं पैं ॥६४॥जळीं पृथ्वी जाली पंचै गुणाथीली । ते चि वेद्य जाली पंच इंद्रिया ॥६५॥शब्द स्पर्श रूप रस आणि गंध । पृथ्वीचा संमंध पंचइंद्रिया ॥६६॥पंच महाभूतें केली पंचकृतें । देवें त्या अनंतें इच्छामात्रें ॥६७॥पंचधातु मूस होये अग्नीसंगें । तेवि या श्रीरंगें केलें कैसें ॥६८॥तन्मात्रा विचित्र भूतें कालविलीं । तात्काळ शोखिलीं महा तेजें ॥६९॥ऐसा जाला गोळ त्याचे देह स्थूळ । निर्मि घननीळ ब्रह्मांड हे ॥७०॥हिरण्यगर्भ जे देवताचें स्थान । देव ते संपूर्ण तेतीस कोटी ॥७१॥यक्ष ऋषीगण गंधर्व किन्नर । आणि विद्याधर असुर ते ॥७२॥कात्यायनी कोटी नव ऐसे जाण । कोटी त्या छपन्न च्यामुंडिका ॥७३॥औट कोटी भूत आणिक बहुत । सूक्षमीं वर्तत वायुरूपें ॥७४॥ऐसें हें सूक्षम देवाचें शरीर । त्या गृह बिढार स्थूळ देहो ॥७५॥यालागी सर्वेशें सवेवसमोहो । रचिला ऐका हो ब्रह्मांडीं या ॥७६॥सप्त हि पाताळ ते चि श्रीचरण । तेथें अधिष्ठान त्रिविक्रमाचें ॥७७॥कैसे ते चरण बोलो निवडोनी । तें नामाभिधान स्थानांकित ॥७८॥विराट पाउलीं जाण पादतळ । तें होये पाताल सातवें तें ॥७९॥सहावें पाताळ जाण रसातळ । प्रपद्य केवळ विराताचें ॥८०॥गुल्फद्वय जें कां पांचवें पाताळ । ते चि महातळ नाम त्याचें ॥८१॥चौथें जें पाताळ त्याची पोटरिया । नाम तरी तया तळातळ ॥८२॥तिसरे पाताळ त्या नांव सुतळ । ते जानुयुगुलें विराटाचें ॥८३॥दुसरें वितळ प्रत म अतळ । ते उरुयुगुलें जाणावे पै ॥८४॥महीतळ तो चि जघनप्रदेशु । कंठ जाणिजेषु विश्वरूपा ॥८५॥रोमावळी त्याची त्रिगुणगुल्मता । गंगादि सरिता नाडीचक्र ॥८६॥सप्त हि सागर देवाचें उदर । वडवाग्नी जठर तेथें असे ॥८७॥नाभिस्थान तें चि जाण भूमंडळ । मध्य तो केवळ विराटाचा ॥८८॥वक्षस्थळ ते चि जेथें जोतिर्लोक । आणि महर्लोक कंठस्थान ॥८९॥जनलोक ते चि विराटीं वंदन । ललाटाचें स्थान तपोलोक ॥९०॥ब्रह्मभुवन तें मस्तक जाणावें । सत्यलोक नावें विख्यात हा ॥९१॥भानूचें मंडळ तें चि नेत्रगोळ । चक्षु ते विशाळ सूर्याऐसे ॥९२॥दिशाची पोकळी जाणा कर्णबिळीं । श्रीकरकमळीं इंद्रलोक ॥९३॥पुत्रकलत्रस्नेहे दंतपंगती ते हे । यमलोक पाहे दाढा त्याची ॥९४॥वरुणलोक तो जिव्हारूप जाण । प्रजापती शिस्न विराटाचें ॥९५॥निर्येलोकु जेथें गुदस्थान तेथें । जळवृष्टि रेत वृद्धियोग ॥९६॥देहामाजीं क्रीमी कीटक आहेती । जीवयोनी होती त्रिभुवना ॥९७॥व्यान तो चि नाग कूर्म तो समान । कर्कश उदान यीयापरी ॥९८॥देवदत तो चि चौथा जो अपान । पांचवा तो प्राण धनंजये ॥९९॥प्राणेसीं विराट तिन्हीं ताळें नीट । ब्रह्मांड हें पष्ट शास्त्र बोले ॥१००॥विराट देहाचें ऐसें हें लक्षण । ऐकावें कल्याण म्हणे पुढें ॥१०१॥इति श्री महावाक्य ब्रह्मांड विराट विवरण नाम शत ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP