महावाक्यपंचीकरण - शतक पहिले
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
॥ श्रीराम ॥
मुळींचें स्मरण तें माहाकारण । गुणसंगें जाण अर्ध ऐसें ॥१॥
मायायोगें मूळ प्रकृती ब्रह्मांडीं । अहं ब्रह्म प्रौढी तेथीची पै ॥२॥
जीव पिंडीं ज्ञान तें महाकारण । अहं जीवपणें भ्रांतीगुणें ॥३॥
जीवशिवऐक्य देहातीत ज्ञानें । परी स्थानमानें देहसगें ॥४॥
अवस्था हे तुर्या ते सर्वसाक्षिणी । स्थानक हे मूर्धनी ब्रह्मरंध्र ॥५॥
अभिमानी पिंडीं प्रत्यगात्मी जाण । परमात्मा हे खूण ब्रह्मांडींची ॥६॥
शुद्ध सत्वगुण गुणेंद्र तो जाण । ज्ञानशक्ति खूण मूळमाया ॥७॥
परा वाणी तेथें उन्मेषु नादाचा । जाणावी हे वाचा चौथी जे कां ॥८॥
आनंदावभास भोग उभयेता । मुक्ति सायोज्यता अथर्वण ॥९॥
अर्धमात्रा नाम संकेतेम हें जाण । चतुर्थ चरण प्रणवाचा ॥१०॥
ऐसे चारी देह पिंड हे जीवाचे । ब्रह्मांड शिवाचें साक्षी देव ॥११॥
ऐसी जाली सृष्टी माजी अष्ट सृष्टी । कल्पनेचे पोटीं सबळत्वें ॥१२॥
तंव शिष्य म्हणे कैशा अष्ट सृष्टी । स्वामी म्हणे गोष्टी सांगों ऐक ॥१३॥
कल्पनीक येकी शाब्दीक प्रत्यक्ष । चौथी चित्री लक्ष जाणीजे पै ॥१४॥
स्वप्नले पै सृष्टी पांचवी जाणावी । स्वधरत्रभावीं साहावी पै ॥१५॥
सातवी ते वर्चीर सृष्टि ऐसि खूण । जे दृष्टिबंधन आठवी हे ॥१६॥
ऐशा अष्ट सृष्टी सबळ कल्पना । प्रळयांतीं जाणा नाशताहे ॥१७॥
प्रळये कैसा तो मी नेणे जी स्वामी । सांगों उपक्रमीं बुझसील ॥१८॥
प्रळये ते पांच दोनी ते पिंडीचे । लक्षण तयाचें ऐसें असे ॥१९॥
प्रत्यइ जीवातें सुषुप्ति कारण । स्थूळ लिंग भान लपे तेथें ॥२०॥
हा नित्यप्रळये जाणा दैन्यंदीन । स्थूळाचें मरण दोनी पिंडी ॥२१॥
ब्रह्मांडीं प्रळये दोनी जे आहेती । ब्रह्मयाची सुषुप्ति दैन्यंदीन॥२२॥
चारीं युगें क्रमें सहस्रदां जाये । तै दिवस होये ब्रह्मयाचा ॥२३॥
हें चि परमीत रात्रींचें जाणावें । विधी लीन व्हावें अव्याकृतीं ॥२४॥
स्थूळोत्पत्ती सरे तपे द्वादशार्क । महा मेघोदकें वर्षतील ॥२५॥
तै प्रळयोदकीं त्रैलोक्य निमेल । अज्ञानीं राहील हिरणयगर्भ ॥२६॥
विधीची हे निद्रा चौ सहस्रां युगां । पुरे होय जागा ब्रह्मा तईं ॥२७॥
पुन्हां जीव लिंग संचितारंभकें । सामर्थ्यें कौतुकें सृष्टी निर्मी ॥२८॥
सुषुप्ती समाधी ब्रह्ययाची ऐसी । दुज्या प्रळयासी सांग आतां ॥२९॥
तो माहाप्रळयो सर्व लयो होतां । ब्रह्मांडासहीत ब्रह्मादिक ॥३०॥
शत वरुषें मेघ उघडती तेथें । आदित्य तपत तीव्र बारा ॥३१॥
भस्म सृष्टी चर भडाग्नी सूर्याग्नि । पादप पाषाणीं भस्म व्हावें ॥३२॥
शशाचा¹ गरळा तेज सूर्ये ज्वाळा । मिळोनि पाताळा दग्ध करी ॥३३॥
शत संवत्सर पूर्ण नभोदरीं । मेघ शुंडाधारीं प्रळयाचा ॥३४॥
जीव भूमंडळ जळोनिया ज्वाळा । मिळोनी पाताळा येक जाले ॥३५॥
शुंडाधारीं मेघें जळ महांपुरें । दग्ध पृथ्वी विरे जळामाजीं ॥३६॥
सप्त हि सागर माहां मेघोदकें । तें आवर्णो(द)क येक जालें ॥३७॥
भूगोळीं मर्यादा मही नाही होत । जळ चि वर्तत तेजोदरीं ॥३८॥
आवर्णाग्नि आणि प्रळयाग्नि तेथें । काळाचे क्षुधेतें रुद्राक्षें ही ॥३९॥
ऐसे सर्व अग्नी जाजुल्य जालीयां । जळ शोखुनीयां तेज उरे ॥४०॥
अद्भूत समईर तेजातें खग्रासी । तयाचे निरासी सर्व वायु ॥४१॥
लिंगदेहीं जे कां अनंत संचीतें । जीवशिव युक्तें येक जालीं ॥४२॥
इच्छारूप जे कां स्फुरण चंचळ । समीरीं सकळ बीज आलें ॥४३॥
अव्याकृत जें कां अज्ञान कारण । वायूचें चळण बीज ऐसें ॥४४॥
वायोचा उद्भव होय जेथुनीयां । पुन्हां जाये लया स्फुरणीं तो ॥४५॥
ढसाळाचें बीज जेवि वटबीज। प्रमाण सहज बोले वेद ॥४६॥
कल्प महाप्रळय याची ऐसी गोष्टी । सर्वा परीपाटीं बीज माया ॥४७॥
जेथुनी उपजत तेथें लीन होये । स्फुरणाची सोय सृष्टयाकार ॥४८॥
बोलावया शब्द ब्रह्मीचा विवर्त । अधो ऐसी मात संकेताची ॥४९॥
या माहा प्रळयीं सर्व वीचलें । यांत सांपडलें नाहीं तें चि ॥५०॥
स्वरूपीं मिळणी वीण जे बाहेरी । पुन्हां येरझारी न चुकती ॥५१॥
पुन्हा ऐसी मात ऐक्य शिष्यराव । म्हणे हा उद्भव पुन्हां कैसा ॥५२॥
पूर्वी जें बोलिलें त्याचीपरी सर्व । जाण अभिप्राव खूण ऐसी ॥५३॥
ब्रह्मा विष्णु रुद्र देव ऋषी गण । दानव मानव सर्व जे कां ॥५४॥
स्वरूपाकार जे देव त्रै जाण । ते अवतरण नित्यमुक्त ॥५५॥
अनु¹ जे कां ब्रह्मीं तें प्रळयातीत । बीजांगे निर्मीत चुकेना कीं ॥५६॥
चौप्रळयाचा रूपाचा संकेत । जाण संकळीत सांगीतलें ॥५७॥
याकारणें ज्ञान सद्रुरुकृपेनें । प्रवाहीं जिवानें चुकीजेतें ॥५८॥
जीव शिव कैसे विचारिलें ठाया । विवेकप्रळया रूप ऐसें ॥५९॥
पंचम जाणीजे देवाभक्ततांसी जे । ऐक्य तेथें बुझे विचाराने ॥६०॥
सत्य रूप ज्ञान हें जावं नेणीजे । तवं न होईजे भवातीत ॥६१॥
असतांची दशा नाम रूप भास । व्हावें निराभास सर्वातीत ॥६२॥
व्रतें तपें यज्ञ तीर्थें नाना विधी । नाना कळा सिद्धी जरी जाल्या ॥६३॥
नाना मत्तें योग जनीं नाना परी । परी मायापु ........
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP