मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|महावाक्यपंचीकरण ग्रंथ| शतक दुसरे महावाक्यपंचीकरण ग्रंथ शतक पहिले शतक दुसरे शतक तिसरे शतक चवथे शतक पांचवे शतक सहावे शतक सातवे महावाक्यपंचीकरण - शतक दुसरे ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण शतक दुसरे Translation - भाषांतर ॥ श्रीरामसमर्थं ॥तुर्येपुढें जे कां निवांत जाणीव । चिन्मये तो देव शुद्ध ज्ञान ॥१॥याचा येक औंश जडातें व्यापुनी । विचित्र करणी ढिसाळाची ॥२॥चौंभूताचा खेळ येका औंश जाण । अर्ध ऐसी खूण बुजे बापा ॥१३॥वायु जेथें लीन जाल्यां जाणपण । तो च अर्ध जाण वस्तुरूप ॥१४॥अत्यंत गहन अर्थ येथं आहे । पाहिल्याविण हें काय कळे ॥१५॥थोर तो प्रत्ययो सत्य विवेकाचा । गुरुमुखें याचा शोध होय ॥१६॥वायु जाणपण मूळ बीय होय । सूक्ष्माची सोय जाण ऐसी ॥१७॥ब्रह्मांड नसतां चंचळासि ठाव । नाहीं अभिप्राव जाण बापा ॥१८॥अष्टधेचा मेळा स्फूर्तिमाजि घडे । सृष्टीपैलिकडे गोष्टी याची ॥१९॥पुढें जे रचना सर्व ब्रह्मांडास । तो चि येक औंश तुर्यागुण ॥२०॥लीळा सर्वेश्वर पूर्ण अगोचर । धरी चराचर येका औंशें ॥२१॥श्लोकपाद ॥ एकांशेन स्थितो जगत्अनुभवेम शोध पाहिल्यावांचुनी । केवि बाणे मनीं खूण याची ॥२२॥अहं ऐसी स्फूर्ती ते चि मूळमाया । महत्तत्व माया वायुरूपें ॥२३॥मूळ मायेपोटीं विस्तार सर्व ही । वायूविण कांही असेचिना ॥२४॥वोंकाराची खूण मूळ तें चि जाण । आकाश तें पूर्ण अंतरात्मा ॥२५॥तेथुनिया सर्व सृष्टी आरंभली । विस्तारें बोलिली ऐक आतां ॥२६॥आकाश तें चि तें जाणिव बोलिजे । वायु तो सहज चंचळत्वें ॥२७॥त्रिगुण आणितें पंचभूतमेळा । आकार भूगोळा वायुरूपें ॥२८॥मूळीचा कर्दम वायो ते जाणीव। जगज्जोति नांव शिवशक्ती ॥२९॥दो रूपें समीर सीत आणि उष्ण । विजू सूर्य चंद्र तारांगणें ॥३०॥शक्ति वायुचिये घसणीते संधी । ते तेजोद्भव वृद्धि विजू सूर्य ॥३१॥सीतळ वायु जो सतेज मिश्रित। तेथें उमटत तारा चंद्र ॥३२॥आप तें चि मृद मेघ ते विशद । पृथ्वी ते प्रसिद्ध जळीं गोठे ॥३३।ऐसीं पंचभूतें गुणत्रैं मिश्रित । ऐकणें संकेत सावधान ॥३४॥सर्वेश्वरइच्छा त्रिविध प्रकार । त्रिगुणविचार जाणिजे पै ॥३५॥शुद्ध जाणपण सत्वगुण जाण । जाणणें नेणणें रजोगुण ॥३६॥नेणणें तो चि तो तमोगुण तेथें । त्रिगुण या अर्थें बुझें ऐसें ॥३७॥भूताआंगीं गुण गुणाअंगीं भूतें । प्रचितीस येतें विचारानें ॥३८॥जाणीव समीर अष्टधा प्रकार । सृष्टि हे विस्तार मूळान्वयें ॥३९॥प्रत्ययें पहातां निश्चयेसीं होय । येदर्थीं संशयो नाहीं बापा ॥४०॥तंव शिष्य म्हणे आलें प्रत्ययासी । अनुमान यासी नाहीं स्वामी ॥४१॥परंतु आशंका येकी उद्भवली । ग्रंथांतरीं बोली भिन्न आहे ॥४२॥मायेपोटीं गुण गुणापोटीं भुतें । वाढलीं समस्तें तमोगुणी ॥४३॥तेथुनी आकाश वायु तेज आप । पृथ्वी ऐसें रूप विस्ताराचें ॥४४॥ठाईं ठाईं ऐसें बोलियलें देवा । वाटे याचा गोवा शास्त्राधारें ॥४५॥गुणापलिकडे भुतें सांगितलीं । मूळ माया केली भूतात्मकें ॥४६॥शिष्याचा आक्षेप ऐके स्वामि ताता । कैसें जाला देता प्रत्योत्तर ॥४७॥शास्त्रीं निरोपिलें तें चि हें बोलिलें । पाहिजे शोधिलें स्वानुभवें ॥४८॥श्रुतिशास्त्रीं आहे नीट चि वक्तव्य । उमजल्यां सोय कळों येतें ॥४९॥धाटि पाहों जातां ग्रंथाचिये साक्षी । जाणाया परीक्षी पाहिजे तो ॥५०॥परीक्षेवांचूनी सर्व अनुमान । नव्हे समाधान तेणें गुणें ॥५१॥ऐका याची युक्ति सावधान श्रोता । श्रुळींची वेवस्ता भुतें कैसीं ॥५२॥कर्दम त्रिगुण भुतें अष्ट काया । आदि मूळमाया सुक्षम ते ॥५३॥आळोनिया नीर जेवि भासें गार । तैसा सर्वेश्वर दृश्यामाजिं ॥५४॥भू जळाग्नि वायु पांचवें आकाश । तो मूळपुरुष महद्भूत ॥५५॥इच्छा मूळशक्ति वोंकाराची गती । वायुविण स्फूर्ति शब्दीं कैंची ॥५६॥वायुविण शब्द नव्हे कीं साचार । बोलिलें वोंकार पाहा कोण ॥५७॥ज्ञप्ति नाद मात्रा तिन्हीं येकाक्षर । नाद तो प्रकार वायुरूपें ॥५८॥मुळीं जरी नाद स्मरण विचार । पुढें तो उच्चार शब्दमात्रा ॥५९॥त्रिगुणाचीं रूपें कर्तृत्वें दिसतीं । येरवीं असती मुळामाजि ॥६०॥सृष्टीपूर्वीं गुण कोण्या रूपें होतें । होतीं पंचभूतें कैसीं पाहा ॥६१॥स्फूर्तीमाजि पूर्वीं बीज सर्व जाण । तरी हें निर्माण बंड जालें ॥६२॥मुळीं हो भुगोळीं हो कां तिहीं ताळीं । पंचभुतें मेळीं अनु नाहीं ॥६३॥यदर्थीं वचन असें येक जाण । करावें श्रवण श्लोकार्थासी ॥६४॥श्र्लोक : स्वर्गमृत्यपाताले वा यक्तिंचित्सचराचरं ।सर्व पंचभूतिकं राम षष्ठं किंचित् न दृश्यते ॥१॥प्रचिती पहातां वेगळा भुतासीं । ठाव त्रिगुणासीं कोठें आहे ॥६५॥पंचभूतात्मक सर्वही आकार । मुळेविण थार गुणा कैंची ॥६६॥गुण भूतें येक मुळींच अहेती । विचारावें चित्तीं खोल दृष्टी ॥६७॥ब्रह्मांडापरतें विवेकें भरावें । पाहातां स्वभावें कळों येतें ॥६८॥सर्वा पैलिकडे मूळमायेपोटीं । अव्यक्त हे दाटी गुणभूतें ॥६९॥ऐसें निरूपण वेदांतीचें जाण । अष्टधा स्मरण मूळमाया ॥७०॥सुक्षम कर्दमु जरी मुळीं होता । पावला पष्टता विस्तारासी ॥७१॥पुढें आकाराया ढोबळें वाढाया । सुक्षमाची क्रिया स्थूळा आली ॥७२॥शिष्य म्हणे हां जी खुणे पावलों मी । समजलों स्वामी दीनबंधु॥७३॥मूळमाया पंचभूतिक सुक्षम । जाणितलें वर्म अनुभवें ॥७४॥मूळमाया कोणें केली हें सांगिजे । कोडें हें उमजे जेणें स्वामी ॥७५॥मायेपुढें सामग प्रासार बोलिला। आधार तयेला कोणाचा पैं ॥७६॥वोघ पुढें जो कां बाणला समज । उगमीं उमज व्हावा देवा ॥७७॥ब्रह्म तें निश्चळ माया हे चंचळ । सांगा अळुमाळ संधी याची ॥७८॥ब्रह्मासी लागेना स्पर्श दुजा कांहीं । माइक सर्व हि कोणें केलें ॥७९॥परब्रह्में केलें सर्व चराचर । ऐसे ज्ञाते फार बोलताती ॥८०॥कैसा हा विचार सांगा सविस्तर । ऐकावें चतुर वक्ता म्हणे ॥८१॥ग्राम जेथें नाहीं सीमा तेथें कैंची । ब्रह्मीं कर्तृत्वाची वार्ता कवी ॥८२॥जळ नाहीं तेथें तरंग कोठुनी । वृक्ष ते नसोनी छाया कैसी ॥८३॥निर्मळासी मळ कैंचा लागों पाहे । कदापि न साहे ब्रह्मीं दुजें ॥८४॥संत महानुभाव परब्रह्म जाले । ते मागुते आले घडेना कीं ॥८५॥ब्रह्मासी करणें वाउगें बोलणें । वेर्थ अनुमानं शोधेंविणें ॥८६॥असो मूळमाया कोणें केली हे चि । ऐकणें येथींची विवंचना ॥८७॥मुळीं मिथ्या त्याचा कर्ता कोण आहे । प्रत्ययेंविण हे कळेना कीं ॥८८॥माया शब्दें जाण लटिकें वचन । नाहीं च कवण करी तेथें ॥८९॥सत्य जालें नाहीं जालें मिथ्या पाहीं । केलें कोणे काई बरें पाहा ॥९०॥पूर्ण ते चि दृष्टी सत्य ऐसी गोष्टी । मुळीं नाहीं सृष्टी माया कैंची ॥९१॥शिष्य म्हणे स्वामी कैसें हें बोलणें । केंवि उमजणें अर्थ याचा ॥९२॥विस्तार सांगतां नाहीं हि म्हणतां । आशंका हे आतां कैसी फिटे ॥९३॥स्वामी म्हणे तुज नाहीं हें बिंबलें । मागुतें बोलिलें ऐक आतां ॥९४॥आदि परब्रह्म येक नित्य मुक्त । अक्रिय येकांत ईश्वराचा ॥९५॥तेथें अव्याकृत सुक्षम बोलिली । मूळमाया जाली श्र्लोक ऐका ॥९६॥श्लोक : आदिमेकं परं ब्रह्म ॥ नित्यमुक्तमविक्रियं ॥तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकं ॥१॥जेथें मन वाचा निशेष राहिली । तेथें उद्भवली माया कैसी ॥९७॥मूळ स्फूर्ती जे कां मुळीं आहे जाण । तयेचें स्फुरण दृश्याकारें ॥९८॥तेणें गुणें नांवें बहुत लागलीं । दृश्यातीत बोली कैची तेथें ॥९९॥ब्रह्में नाहीं केली दिसे विस्तारली । पाहिजे ऐकिली युक्ति याची ॥१००॥हें चि निरूपण सांग पुढें आहे । कल्याणें सर्व हें बोलियलें ॥१०१॥इति श्री मूळ सूक्ष्म विवरण महावाक्य शत द्बितीय संपूर्णं ॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP