कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ७
श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.
जव वर्तीलें खोटे पातडें ॥ तंव तोंडावरी बैसले तेंची पीढें ॥ तेणें सुजलें थोबाडे ॥ मग जाला भयाभीतु ॥२७७॥
तंव साळीग्राम गडबडिलें ॥ देव्हार पाट साउमे आले ॥ अगळांचें सर सुटलें ॥ खळबळीले खीळ खांबे ॥२७८॥
तेला तुपाची मापें ॥ डौले चाटु लाटनी उमपें ॥ आणीकें काष्टें सकोपें ॥ मार करिती भटासी ॥२७९॥
बैसावया पाट घातला थोरु ॥ तोची पाठीवरी बैसला निस्टुरू ॥ घृतालागी आणिला नळा थोरू ॥ तोचि मस्तकी वाजतु असे ॥२८०॥
तंव थोरी अरळपें माहा शब्दु करी ॥ म्हणे पाहाहो आम्हीं म्हणो भला नंदु ये नगरी ॥ आम्हाशी मार होतो भारी ॥ आपण विनोदु पाहातसें ॥२८१॥
उभा राहोनी पळों पाहें बाहेरी ॥ तंव पागोटें गुंतलें मोहटीवरी ॥ आगंनीहुनी उडी घाली कुसा बाहेरी ॥ आतां मज जीवें उरी नाहीं ॥२८२॥
खळखळीली काष्टें धांवीनले चाटु ॥ म्हणती घालु डेरा अवघाची लाटु ॥ मुसळें हाणोनि पाडिला तळी भटु ॥ उखळे म्हणती हा सगळाची गिळु ॥२८३॥
सीळा लाटनी पोळपाट ॥ म्हणती ठेसुं पाठी मग लाटुं पोट ॥ कासावीस जाला भट ॥ म्हणोनी पीटी लल्हाट आपुलें ॥२८४॥
ऐसा कष्टी सांडिला दारवठा ॥ केंस सरिसे करी उभा राहोनि चोहाटां ॥ तंव कांठीया टोणपे बैसती घोटा ॥ म्हणती भटा घेउनी जीवें ॥२८५॥
चालिली मापें नगरीची येकदटे ॥ म्हणती भारूनी घोटें भटा जासी कोठें ॥ तंव काठवटीं खोडवी खीया नेटें ॥ उठावली भटावरी ॥२८६॥
तंव धांवती धानें तबकें राजन मोटें ॥ तांबे कळस काहीं हांडे ताटें ॥ ते मेळा करूनी उठावली येकदटें ॥ तंव भटु डोळे झांकी ॥२८७॥
तंव चालिली जाती रोख भरट ॥ म्हणती भटा तुझें करुनी रे पीठ ॥ तंव तो काकुळती त्यांसी बोले भट ॥ जीवदानें द्यावें मज ॥२८८॥
हे म्हणे तंव शस्त्राचें भार अपार ॥ भटा भोंवते उभे राहती थोर थोर ॥ त्या देखोनि भटा ये हींवज्वर ॥ म्हणें आहा कैसे मरण पावलो ॥२८९॥
तंव ब्रह्मपुरी थोर थोर गजबजीली ॥ हे भटो आम्हा भोंवती कळी कैसी आणीली ॥ दगड जोशी म्हणे असा उथली ॥ पातडें सांगे तया ॥२९०॥
तंव हाक देती मूर्ति खेताळ वेताळ ॥ बरीरव धांवती भूतळ मैराळ ॥ हनवंतु हाकारी देवतें गांवांळ ॥ भटु जातो गीळ हां ॥२९१॥
मांभळ भटु म्हणे मी भटु तुमचा ॥ मज राखा गा दिवसु आजीचा ॥ येरु म्हणती तुज विचंबु जाचा ॥ तरी कंसा कोण सांगे हे मात ॥२९२॥
भटु माहाशाब्दा रें पळों गेला ॥ तंव कासोटा वेसीडांभा अडकला ॥ तंव माभळभट नज्ञची पळाला ॥ मथुरे वाटे ॥२९३॥
तंव उठावली रानें काष्टें ॥ भटा मारीत येती आवताचे भार नेटें ॥ म्हणती तुझे विदारू रे आंग मोटें ॥ तंव तो काकुळतीये तया ॥२९४॥
तंव हळधर रागें धांवती ॥ येकु दीस पेरणीचा आलारे म्हणती ॥ घ्या भटा असुड मार करिती ॥ तंव भटु म्हणे शिव शिव ॥२९५॥
यैसें म्हणे तंव नांगर कुळव विघ्न भटा पाठीं बैसती ॥ जैसे पाषाण वरी भोंवती ॥ आवतांचे झनाण येती ॥ (आकाशी फिरती) ऐसे घारा गीद ॥२९६॥
तंव तो पळतु मथुरेसी आला ॥ भटाचें धोत्र सांडवले (नज्ञ जाला) ॥ तवं त्यासी पळतां देखिला ॥ लोकी मथुरेचिया ॥२९७॥
म्हणती कोणें केला कष्टी ॥ असुद्ध वाहे ललाटीं ॥ सुजोनी आली पाठी ॥ गुडगे घोंटी फुटली ॥२९८॥
स्वजन पुसती भटोजी ॥ यैसे काई तस्करी उपोद्रो केला कवणें ठांईं ॥ कीं तुमचें आंगीं पीसें आहे काई ॥ कीं कोठें केली चर्म चोरी ॥२९९॥
तुम्हा मारू कोठे जाहला हे सांगा ॥ येरु म्हणे पळा काष्ठें आली मागां ॥ विसरलो देहभावो काय सांगा ॥ मळमूत्र होत असें देखा ॥३००॥
तंव लोकीं धरून नेला रायापासी ॥ रावो म्हणे भटो तुज वेवस्ता जाली कैसी ॥ येरु म्हणें पळा येती काष्टे तुम्हांसी ॥ मारावया आतां ॥१॥
या बोला कंस कोपला भटावरी ॥ म्हणें वोढुन टाका रे बाहेरी ॥ सांडुनी आमचा दलभारू थोरी ॥ बोले हा भलतैसें ॥२॥
तंव भटाची मुर्छा हरली ॥ मग समुळ वेवस्ता सांगीतली ॥ समा तटस्त गहिली ॥ आतां कंसे होईल ॥३॥
रीठासुर दैत्ये दारुणु ॥ म्हणती त्यांचा बाळकें घेतला प्राणु ॥ भटु म्हणौनी सोडिला अपमानु ॥ करुनियां हा ॥४॥
मग राव पडिला चिंतावनी ॥ त्याची उपजताची यैसी करणी ॥ आतां ऐसा नाहीं कवणी ॥ जो बुधीचि त्याते मारी ॥५॥
तंव ते पूतना आली समेसी ॥ ते हात वोढवी विडीयासी ॥ म्हणें विषपान करून मारीन त्यासी ॥ तरीची रायाची बहीण मीं ॥६॥
मग गोकुळासी गेली ॥ ते येशोदेसी भेटली ॥ विडा वस्त्रें दीधली ॥ थोरां आदरेसीं ॥७॥
तुं येशोदे भाग्यांची वो थोरी ॥ पुत्र झाला तुझिये उदरी ॥ आतां यासी जतन करी ॥ कंसु वैरी दोषो न सके ॥८॥
तंव ते बाळक पाहावया उचळिले ॥ आणी तोंडी स्थान घातले ॥ येरे वीसे सोकिलें ॥ ततक्षणी ॥९॥
दोन्हीं सोकुनी स्थाणें ॥ मग सर्वांगीचे अशुद्ध सोषीलें तेणें ॥ त्याची मीठी न सुटे कवणें गुणें ॥ मग मूर्छागत पडिली तें ॥१०॥
ते उतानी पडिली भूमीवरी ॥ हात पाये षोडीते धरणीवरी ॥ तंव प्राण गेला ते तोंड पसरीं ॥ भयानक दिसे ॥११॥
तंव गोकुळ थोर गजबजिले ॥ म्हणती बाळकें पूतनेंते सुकुंनी पाडिले ॥ कंस न सोडी आम्हा कांहीं केलें ॥ पूतनेंकरितां आतां ॥१२॥
यैसी पूतनेंसी वैरमुक्ती दीघली ॥ तंव कंसासुरा मातु गेली ॥ मग धोवा धोवीं केली ॥ आरंभिले बारसें ॥१३॥
आतां पाळनियांआची औती ॥ बाळका नांव पाहुनी ठेविती ॥ हे पुढीलें कथेची स्तुती ॥ सांगरे कृष्णदासा ॥१४॥
॥ प्रसंग सातवा ॥७॥
Last Updated : November 11, 2016
TOP