मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री कृष्णदासांची कविता|कृष्णदासांची बाळक्रीडा| प्रसंग ३ कृष्णदासांची बाळक्रीडा माहिती व विवेचन प्रसंग १ प्रसंग २ प्रसंग ३ प्रसंग ४ प्रसंग ५ प्रसंग ६ प्रसंग ७ प्रसंग ८ प्रसंग ९ प्रसंग १० प्रसंग ११ कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ३ श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत. Tags : krishnadaspoemकविताकृष्णदासमराठी प्रसंग ३ Translation - भाषांतर यैसे विचारी मानसी ॥ तंव आश्रीनी बोलिली आकाशीं आरे कंसा परियेसी ॥ सांडी गर्व पद ॥९२॥आरे तुझी देवकी बहिन ॥ तीली पुत्र होईल जाण ॥ त्याचेयां हातें मरण ॥ पावसील तुं ॥९३॥तो तुझा करिल संहारू ॥ बंधुसहित सकळ वीरु ॥ हे आश्रीणी बोलोनी उत्तरु ॥ सवेची आद्दश्य जाहली ॥९४॥तो शब्दु आईकिला सकळा जनीं ॥ मग रावों खोचला आंतक्रनी ॥ ते व्हेळे कांपीनली धरणी ॥ दीसा कानवडलीयां ॥९५॥तटस्त राहिले सकळ वीर ॥ गर्वां जाला परिहार ॥ न पुसती उत्तर ॥ येकमेकासी ॥९६॥मग रावो म्हणें केसीया वीरा ॥ आणि प्रधाना आक्रुरा ॥ यासी कांहीं प्रतिकार करा ॥ चुकवा मरणा तें ॥९७॥तवं बोले मंत्रीया सिरोमणी ॥ देवकी वसुदेव आणावी धरूनी ॥ त्यांसी बंधन करुनि ॥ रक्षणें ठेविजे ॥९८॥येक म्हणती रायास आनो हित ॥ ते बाहिणीचे कायसे कवतीक ॥ मग पाठउनि दूत ॥ उभी वर्गें आनविली ॥९९॥मग दोघां जोडूनी सांखळा ॥ थोरी केली आवकळा ॥ बंधी घातली ते वेळा ॥ निबंध रक्षणाईते ठेविलें ॥१००॥येमळार्जुनु पीपळु जाला ॥ तो ते आंगणी उगवला ॥ त्यांवरी कागासुरु बैसला ॥ द्वारी राहिला गंधर्व ॥१०१॥पींपळें झडझडावें ॥ कागासुरें गर्जावें ॥ गंधर्वे भुंकावें ॥ ते आईकाबे माहांद्वारी ॥१०२॥तेथें ठेविली जेंगटें ॥ ते पीटुनि कीजे बोभस्टे ॥ कोण होतां यैकवटे ॥ इतुकाजनीं गर्जावें ॥१०३॥हे परिसोनु कंसासुरु ॥ त्यां बाळकांचा करी संव्हारू ॥ यैसा संप्रधारू ॥ केला तिये वेळे ॥१०४॥तंव रावो म्हणें वरें जाले ॥ आतां विघ्न टळले ॥ भाट बंधीजन सुखीया केलें ॥ धन वांटिलें ब्राह्मणासी ॥१०५॥सकळांसी आनंदु जाला ॥ म्हणती हा विचारू वरवा केला ॥१०५॥रावो मरणा चुकविला ॥ आतां भये नाहीं ॥१०६॥माग (स) भा विसर्जली ॥ सकळां पेठवणी जाली ॥ पुढां कथा कैसी वर्तली ॥ ते सांघैल कृष्णदासु ॥१०७॥॥ प्रसंग तिसरा ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP