मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री कृष्णदासांची कविता|कृष्णदासांची बाळक्रीडा| प्रसंग २ कृष्णदासांची बाळक्रीडा माहिती व विवेचन प्रसंग १ प्रसंग २ प्रसंग ३ प्रसंग ४ प्रसंग ५ प्रसंग ६ प्रसंग ७ प्रसंग ८ प्रसंग ९ प्रसंग १० प्रसंग ११ कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग २ श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत. Tags : krishnadaspoemकविताकृष्णदासमराठी प्रसंग २ Translation - भाषांतर तेथें यमुनेचा तीरीं ॥ माहा विस्तीर्ण मथुरा नगरी ॥ तेथें राणा राज्य करी ॥ दैत्य कंसासुरु ॥३८॥तो गहन प्रचंड ठावो ॥ तेथें कंस केसीया महाबाहो ॥ अक्रूर मंत्री या रावो ॥ आचारवंतु ॥३९॥त्या नगराची महंतता ॥ सांगता विस्तारी जाईल कथा ॥ पृथ्वीचे रायें समस्ता ॥ वोचकले देखोनीयां ॥४०॥हाटवटिया चौबारे ॥ तेथें नांदती वेव्हारे ॥ दुकानें आवधी मंदिरे ॥ काश्मीराची ॥४१॥येकवीसा खणावरी ॥ पाहाती राजकुमरी ॥ मृदंग काहाळा घरोघरी ॥ शिवपुजा करिताती ॥४२॥ते शिव भक्त दारुण ॥ नगरी कुळ देवताचीच आन ॥ सकळां इभुतीचर्चन ॥ कस्तुरीचें ॥४३॥कंठी रुद्राक्षाच्या माळा ॥ हरीजागरणें घरोघरीं सकळां ॥ आचार विध सकळां ॥ शिवभक्तीचा ॥४४॥यैसी ते शिवनगरी ॥ वेदध्वनें घरोघरीं ॥ राहाटपाट दारोदारीं ॥ श्रींधारवाडीयासी ॥४५॥हे बाहेरील नगर ॥ तेथें लोक नांदती अपार ॥ रायाचे दुर्ग प्रचंड थोर ॥ तयाचें नांव मालखंडा ॥४६॥तया मालखंडेयाचा विस्तारु ॥ बारा गावांचा भोंवता फेरू ॥ उंच जौजनें येरू गंभीरु ॥ आगड तीन भोंवताले ॥४७॥ते आगडी-संयेभ उदक ॥ भीतरी होडी नावा अन्येक ॥ लोक खेळती कवतीक ॥ यमुनेमाझारी ॥४८॥ते येमुनाची विस्तारली ॥ सौभोवती बांधली ॥ तीची पाहातां खोली ॥ मनें कल्पवेना ॥४९॥तया भीतरीले पौकळी ॥ झेंपावती आकाश पोकळी ॥ हुडेहुडां झळाली ॥ पताका परारें शौर्याची ॥५०॥दुसरी पोकळीचा विस्तारू ॥ तो लोहोबांध अपारू ॥ तीसरी मनोहरु ॥ रत्नेंजडीत ॥५१॥ते फटिकांची बांधनी ॥ सोमकांत खणोखणी ॥ हुडेंहुडा खेवनीं ॥ हिरेमानीकाची ॥५२॥तैस्या तीन पौंवळी तीन आगड ॥ तयांसी दारवठें सातसात माहा प्रचंड ॥ पानदरी उदंड ॥ लोकांस वावरावया ॥५३॥तया भीतरी राणीवंसा ॥ ते कंसाचे निज मंदिर परियसा ॥ कांचनीबंध भूमीका सायासा ॥ भीतरी भावी कास्मीरे बांधलीया ॥५४॥येकवीस खणांची दामोदरें ॥ रत्नेंखचितें मंदिरें ॥ खांबी पुतळीया मयोरें ॥ झळकुंबे मोतीयांचें ॥५५॥सोमकांताचीं बाळानी ॥ कळस सोनियाचे गगनी ॥ आंतुले मंदीर धुपौनि ॥ परिमळे दर्वताती ॥५६॥आंगणी नागचांपेंयांची झाडें ॥ मयोरें क्रीडा करिती चहुंकडे ॥ जाईजुईचे मांदाडे ॥ झेंपावती ॥५७॥दिवसु गेलीया अस्तमाना ॥ वीर करिताती साहना ॥ दुर्गाभोंवती प्रदक्षणा ॥ माहावीरांची ॥५८॥आतुर्बळीये नीसांचर ॥ हांकी गर्जवीती आंबर ॥ तेथें दुष्ट तस्कर ॥ बोलोंचि नये ॥५९॥खर्गे झळकती वीरांकरीं ॥ ढोळ दमामे संखभेरी ॥ रणसींगे काहाळा मोहोरी ॥ गीडीबीडीयां लेख नाही ॥६०॥य़ैसा हा मालखडा ॥ काळ जैसा ॥६१॥कवणें येके दिवसीं ॥ रावो बैसला सभेसी ॥ बंधु केसिया भुजेसी ॥ द्दष्टीसी प्रधान आक्रूरू ॥६२॥कंसाचे आंगल (ग) वीरु ॥ माल मुष्टीक चानोंरू ॥ कागवगु आघासुरू ॥ यमळा आर्जुणु ॥६३॥ताडमाडा सुरु ॥ धेनकु रीठासुरू ॥ गंधासुरू आसुरू ॥ रजकु बळीयाडा ॥६४॥हें आंगलग वीर दारून ॥ गर्वां चढीनले अती गहन ॥ त्या स्त्री पुरुष त्रुणासमान ॥ मेरू ठेंगणा ॥६५॥सर्वांगी चंदनाचिया उठी ॥ कस्तूरीचे टिले ललहाटी ॥ रुद्राक्षाच्या माळा कंठी ॥ हातीं काळगदा ॥६६॥येकांसी इभूतीचे उधळणें ॥ येकांसी वाप्यांवरे पेहेरणें ॥ येकीच जालीं रातांजनें ॥ येकासी कंगाल राधावळी ॥६७॥गुंजावर्न डोळे बाबर झाटी ॥ येकी बांधलीया वीरगुंठी ॥ येकी भाते बांधोनियां पाठिसी ॥ शीते टनत्कारिती ॥६८॥फरशीया तोमर भाले ॥ येक मुदगल घेतले ॥ चरणीं तोडर बांधले ॥ हातीं रत्नकांकणें ॥६९॥ते बैसले कंसासमोर ॥ त्यावेगळे वीर आपार ॥ ते बोलती बडिवार ॥ म्हणती मेरू उलथुं आतां ॥७०॥यैसे येकाहुनि येक आगळे ॥ सात लक्ष सेजीं बैसले ॥ येक उभे राहिलें ॥ त्यासी गणित नाहीं ॥७१॥येकांवरी छेत्रें येकवटें ॥ येकावरी ढळती कनक दंडें ॥ माथा मुगुट भयासुर तोंडें ॥ दाढा विक्राळा ॥७२॥येक मृडींवां मीसीयांचे ॥ येक गुंजावर्नीं डोळयांचे ॥ येक आटीवां भुजांचें ॥ आजानबाहो ॥७३॥जैसे लोहाचे पुतळें ॥ तैसे येकाडुनि येक आगळे ॥ ते संमुख उभे राहिले ॥ दोहीं विभागीं ॥७४॥राये येताती वोळगे ॥ भार दावीताती वेगें ॥ कुंजर भार दोही आंगें ॥ वाजंत्रा लेख नाही ॥७५॥यैसी सभा घन दाटली ॥ वरी छत्रांची पडे साइली ॥ बैसका ठाईं वाटिली ॥ तया सांगणें नलगे ॥७६॥ऐसें नव कोडी महावीरा ॥ चौरांसी लक्ष कुंजरा ॥ साटी कोडी रहिवारा ॥ वारू पंचवीस अर्बुजे ॥७७॥पांच शतें माळजेठी ॥ ते मुष्टीकां च नौराचे पाठीं ॥ धनुवाडें नव कोडी ॥ लक्ष साटी वोडन या ॥७८॥ते बैसले आपुलालीये स्थानीं ॥ तवं कळावंतें उटिली झडकरुनी ॥ मंजुळराग आळउनी ॥ गाती वाणी नाचत्याती ॥७९॥तयासी देउनि पेठवनी ॥ तवं आणीके उठिली ततक्षणीं ॥ तयासी देउनी बहु डावनी ॥ तंव आणीक वाट पाहताती ॥८०॥ऐसा समयो वर्तला ॥ तंव कंस केसीया असे बैसला ॥ ते समई देखता झाला ॥ आपुलीया परिवारातें ॥८१॥मग मनी विचारी ॥ म्हणें मीच येकु ये सृष्टीमाझारी ॥ मजसीं घे जुंझारा ॥ ऐसा वीरूची नाहीं ॥८२॥मज कोपलियां कंसासुरा ॥ आणीक बंधु केसीया दुसरा ॥ आणि प्रधाना अक्रुरा ॥ जोडाचि नाहीं ॥८३॥मजसी मेळवी हातफळी ॥ यैसा क्षेत्रीया नाहीं भूमंडळी ॥ येक वेगळा चंद्रमौळी ॥ येर सामान्ये भुपाळ ॥८४॥य मर्त्यलोकीचे भूपाळ ॥ ते मीं जाणत असे सकळ ॥ आणीक पाहतां पाताळ ॥ तेथें नागकुळावांचौनी नाहीं ॥८५॥तयासी कर ना चरण ॥ तयांचे जाणे मीं वर्म मरण ॥ आणि स्वर्ग भुवन ॥ तेथें इंद्रची वळियाडा ॥८६॥तरी तयांहुनी काईं मीं उना ॥ माझे मरण मज जाध्याना ॥ ते सस्त्र केले म्यां जतना ॥ आतां कवणा काय करवैल ॥८७॥जर्ही जाला हरी हरु ॥ तरि त्यासी केवी आतुडे शस्त्रु ॥ जर्हीं जाले वज्रु ॥ तरि मज काये करूं सकें ॥८८॥आणि बंधु माझा केसीया ॥ त्रिलोकु ठेंगना तया ॥ आणीका वीरां प्रतापियां ॥ लेख नाहीं ॥८९॥माझा चानोर मुष्टीकु ॥ तो आंगउं सके मृत्यूलोकु ॥ आतां कवण असे नायकु ॥ जो मज पडखळील ॥९०॥यैसे विचारूं लागला ॥ माहा गर्वा चढीनला ॥ पुढां वीर भारू देखिला ॥ जैसे का माहाकाळ ॥९१॥॥ प्रसंग दुसरा ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP