-
पु. १ पुष्कळ वेळ वाट पहाण्याची , सहन करण्याची , चिकाटी धरण्याची ताकद ; दम ; सहनशीलता ; स्थिरपणा ; टिकाऊपणा ; ( क्रि० धरणे ; येणे ; सुटणे ; फुटणे ; फाटणे ; सोडणे ; टाकणे इ० ). तुम्ही दोन वर्षे रुपये नाही दिले तरी मला धीर आहे . धीर तो कारण । साह्य होतो नारायण । - तुगा २४३१ . भ्रमले श्रमले समरी पळहि धरी धीर हरि न रथ न करी । - मोशल्य ३ . ९५ . म्ह ० धीर असेल पोटी तर बरे होईल शेवटी . २ धर ; आवरशक्ति ; बंधन ; दाब . तोंडाला धीर = बोलण्याला , खाण्याला मर्यादा . जीभेला धीर = जीभ आवरणे . पायांला धीर = पायांत ताकद ( बराच वेळ थांबण्याची , उभे राहण्याची इ० ). शौचाला धीर नाही = अतिसाराचा विकार असणे . ३ ( बोलण्यांत , करण्यांत , चालण्यांत ) शाश्वती ; सातत्य ; स्थीरता . ४ टिकण्याचा गुण ; मजबुती ; धट्टपणा ( घोडा , घर , खांब , गादी , कापड , कागद यांत ). ५ धारिष्ट ; धैर्य . धरीरे मना धीर धाकासि सांडी । - राम २७ . ६ विश्वास ( संकट परिहाराबद्दल ). दुसर्याचे धिरावर कोणतेहि काम आरंभू नये . - वि . १ धैर्यवान राज्य श्री स्त्रीसुत हे क्लीबाला काय होय जो धीर । - मोशांति ३ . ६७ . २ गंभीर ; उदात्त . तेथुनि सरस्वतीची तीर्थे सेवीत जाय तो धीर । - मोसंभा ३ . १७ . ३ दमदार ; उतावळा नसणारा . म्ह ० धीर तो गंभीर उतावळा तो बावळा . ४ निश्चयी ; करारी . [ सं . धैर्य ; प्रा . धीर ]
-
पु. १ टेंका ; टेकू ; नेठ . २ ( ल ) आश्रय ; आधार धिरा पहा .
-
०करणे हिय्या करणे ; धाडसाचा प्रयत्न करणे .
-
०चेपणे धैर्य , विश्वास पुन्हां प्रस्थापित होणे . भीति जाणे ; भीड मोडणे .
Site Search
Input language: