घोर नाचाची गाणी - दिवाळीचा सण
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
दिवाळीचा सण
आला दिवाळीचा सण
लोकाच्या पोरी माहेरील
आपली सखू सासरील
तिचा बंधू नाही गेला...
बंधूनी घोडे शिणगारीला
बंधू गेला बहिणीचे गावाला
बहिणीचे दूरून पाहिला
रथ कोणाचा रे आला
रथ माझे रे बंधूचा
बंधूचे घोडे कोठं बांधू
बंधूचे घोडे जाईबुदी
दिला पाय धुवाय पाणी
बस भोजान करीते
ये रे बंधू जेवायला
बंधू येयीला खायीला
लागला बहिणीला आवगवाय
बस ग बहिणी घोड्यावरी
बहिण बसली घोड्यावरी
गेली एके खणालं
गेली बंधूचे गावालं
भावजयीईने दूरून पाहिला
रथ कोणावा रे आला
रथ माझे ग नंदेचा
लायलं दारलं दरवाजे
नणंद लागली बोलायालं
उघड दारंचं दरवाजे
आम्ही नाय आलो लुटायालं
आम्ही आलो भेटायालं
आला दिवाळीचा सण
आला दिवाळीचा सण
लोकांच्या पोरी माहेरी आल्यादेखील
आपली सखू मात्र सासरीच आहे.
तिला आणायला भाऊ गेलेला नाही
भावाने घोडे सजवले
भाऊ गेला बहिणीच्या गावाला
बहिणेचे दुरून पाहिले
रथ कोणाचा ग आला?
-रथ माझ्या ग भावाचा
भावाचे घोडे कोठे बांधू?
भावाचे घोडे जाईच्या खोडाला...
दिले पाय धुण्यास पाणी
बस रे भाऊ पलंगावरी
बहीण स्वयंपाक करते
ये रे भाऊ जेवायला
भावाचे जेवण झाले
दिले बहिणीला आमंत्रण
-बस ग बहिणी घोड्यावर.....
बहीण बसले घोड्यावर
गेली एका बाजूला
गेली भावाच्या गावाला.....
भावजयीने दुरून पाहिले
रथ कोणाचा ग आला
रथ माझ्या ग नणंदेचा
बंद केले दार-दरवाजे
नणंद म्हणाली-
उघड दार-दरवाजे
आम्ही नाही आलो लुटायला
आम्ही आलो तुम्हाला भेटायला!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP