मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा| अभंग ४४ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ४३ अभंग ४४ अभंग ४५ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६१ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ४४ श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले. Tags : abhangbookdnyaneshwarnamdevअभंगज्ञानेश्वरनामदेवपुस्तक अभंग ४४ Translation - भाषांतर नमो काळकौतुहळ । नमो चक्रचालक गोपाळ ।नमो विश्वप्रतिपाळ । प्रभंजन ॥१॥नमो शिव शिवेशा । नमो शिवादि विश्वेशा ।नमो रुपा अष्टदिशा । व्यापका नारायणा ॥२॥नमो सकळ गर्भोद्भवा । नमो चित्तचाळक भावा ।नमो विष्णुमूर्ती देवाधिदेवा । श्रीविठठला ॥३॥नमो भजनशीळ व्यापका । नमो ज्योतिर्लिंगदीपका ।नमो नमो तुज एका । आत्मव्यापका जगद्गुरु ॥४॥नमो श्रीये श्रीनिवासा । नमो आगमपरेशा ।नमो ज्ञानगम्याधीशा । प्रतिकुळा ॥५॥नमो स्वलीळा विनटा । नमोस्तु ते वैकुंठपीठा ।नमो रुपादिश्रेष्ठा । वैकुंठीचिया ॥६॥नमो दर्शनस्पर्शना । नमो उपरतिनिधाना ।नमो तितीक्षा दारुणा । कमळालया ॥७॥नमो त्रिगंटी आदटा । नमो त्रिगुणा तूं उद्भटा ।नमो सत्वरुप सदटा । ब्रह्मनामा ॥८॥नमो रजेश्वरा हरी । नमो विगळितसंहारी ।नमो वाचा वक्ता करी । वाचाळ वाक्पुष्पीं ॥९॥नमो तमहर्ताकर्ता । नमो सकळसंहर्ता ।नमो काळकौळु दाता । रक्षिता हरिभक्तां ॥१०॥नमो हरिहरेश्वरा । नमो न देखों दुसरा ।नमो वेदांत सागरा । सर्वेश्वरा तुज नमो ॥११॥श्रुती निरामय नमो । नमो ज्ञानरुप गमो ।नमो द्वैतनिरसनसमो । करीं तूं निजकरें ॥१२॥नमो व्यक्ताव्यक्त हरी । नमो मायासंहारकेसरी ।नमो सर्वांच्या माजघरीं । नांदसी तूं आत्मारामा ॥१३॥जीवशिव नमो तुज । ज्ञानविज्ञान तूं सहज ।नमो सर्व जीवां बीज । तूंचि श्रीविठ्ठला ॥१४॥लीलेस्तव नटारंभ । नमो जगदादि अखिलस्तंभ ।उभा राहोनी प्रतीभ । भीमातीरीं पंढरीये ॥१५॥नमो ऐशिया रुपेशा । नमो त्रैलोक्य विस्तारठसा ।नमो आदि परेशा । जगदाधीशा युगादी ॥१६॥नमो पुरुषोत्तम परेशा । नमो सकळही उदासा ।करुनि जीवरुपा ठसा । नांदसी तूं चराचरीं ॥१७॥मधुसूदना तुज नमो । मधुमाधवा ह्रदय रमो ।नमो मधुर गीत समो । माजघरीं आत्मयाचिये ॥१८॥त्रिविधतिमिर नाशा । परम परमानंदा उल्हासा ।नमो पुरविसी आशा । हरिभक्तांची श्रीहरी ॥१९॥नमो वासाना चक्रचाळी । नमो तुंडवितंड गेली ।नमो सर्वही हरली । प्रपचंरचना ॥२०॥नमो श्रीधर श्रीकर । नमो सर्व संगीम निर्विकार ।नमो विकृती विकार । हरिसी नामें एकें ॥२१॥नमो शांती दया क्षमा । नमो कृपाकर पुरुषोत्तमा ।नमो कांसवदृष्टीसमा । निष्कलंक नाथा ॥२२॥नमो द्विविध छेदका । नमो एकार्णव पावका ।नमो द्वादश अर्का । सुभाषका वेद वक्त्या ॥२३॥नमो चित्त चकोर हर्त्या । नमो सर्वकारण कार्यकर्त्या ।नमो तुजवांचोनि सत्या । विवेक प्रत्यया पैं न ये ॥२४॥नमो अद्वैत अनंता । नमो निर्द्वद्व भोक्ता ।नमो नित्यानित्य सरता । तुज नमो नमो ॥२५॥नमो दुर्गतिहरणा । नमो सर्व हरण भरणा ।नमो शिव शक्ति समलिंगा । नमा भक्षक काळवेगा ।रुद्रादित्या वसु पैं गा । सम सर्वांगा परम परेशा ॥२७॥नमो कृत्रिम दहना । नमो कृश करण हरणा ।नमो प्रतिपाळ करणा । नारायणा तुज नमो ॥२८॥नमो इंद्रिय नियंत्या । नमो प्रपंच अकृत्या ।नमो दीनादित्या । सकळ वृद्धि तूंचि ॥२९॥नमो अवधूत दत्ता । नमो अपरमित मिता ।नमो सर्वां वरिष्ठ सत्ता । तूं चाळिता ह्रषिकेशी ॥३०॥नमो दृष्ट दर्पादर्पा । नमो चमत्कार गंगा सर्पा ।नमो नमो हरण पापा । नमो स्वल्पा रामकृष्णा ॥३१॥नमो चतुर वेद दीप्ता । नमो हरण करण तूम तुप्ता ।जागृति स्वप्न गुप्ता । सत्य सुप्ता महाविष्णु ॥३२॥नमो देवेश्वरा सूक्ता । महा मोहा हर्ता ।मंद मंद नियंता । नमो नारायणा ॥३३॥क्षीर नीर निर्झरा । नमो विद्वद अनुकारा ।नमो विवेक सागरा । महानादा ॥३४॥नमो मुखदंतसदना । नमो भक्षक भुवना ।शुक्लांबरा शुक्लवर्णा । दयाघना गुणनिधी ॥३५॥मृतामृत नमो नमो । नमो श्रुतिशास्त्र समो ।नमो हा गर्व गमो । पद्मगर्भानंतानंता ॥३६॥नमो चिदाकाशव्याप्ता । चित्सत्ता चळण सत्ता ।चित्स्वरुपादिरुपा । भुवन दीपा महामूर्ती ॥३७॥नमो एक एकार्णव । नमो कल्पादि गुण वैभव ।नमो सकळ हे देव । हे भाव पैं तुझे ॥३८॥गो गोपाळ नमो नमो । गोविंद गुणविष्णु धर्मो ।नमो चित्त चिंतनी रमो । सर्वकाळ तुझ्या चरणीं ॥३९॥ध्वज वज्रांकुशा । ध्वजनीळ विकासा ।ध्वजांबरा अष्ट दिशा । नीळिमा भासती शामांकिता ॥४०॥सुषुप्तीचे जें सत्य । तें नमो तुज कृत्य ।असोस ज अमित्य । तें तें क्षमा करी स्वामी ॥४१॥नमो निर्धार नियंता । नमो सुखरुप दाता ।नमो आलिया पदार्था । क्षमा करी स्वामीं ॥४२॥नमो चित्त विभ्रमा । नमोधार्य धैर्य नेमा ।नमो पुराण पुरुषोत्तमा । पाहे कासव दृष्टी ॥४३॥पसाय दाना नमो । परम परेशा समो ।ध्यनांतर गमो । तुझ्या चरणीं केशवा ॥४४॥आग्रह नियंत्या नमो । सग्रह परी नमो ।अनंता नित्य धर्मो । वैकुंठ गुण ग्राम नमो नमस्ते ॥४५॥अनादृश दृश्यमाना । दृशादृश्य नित्यघना ।सुखरुप जगजीवना । तुज नमो स्वामी ॥४६॥दीप्तादीप्त अदृश्य । जीवन दिसती सादृश्य ।जीवमय हें भाष्य । तुज नमो स्वामी ॥४७॥परम पर ब्रह्मा । आदि ब्रह्मा तूं रामा ।भक्तांलागीं साउमा । तुज नमो ॥४८॥नमो नमो एक तत्वा । बाह्य मुद्रा शुद्ध सत्वा ।योगा रुढ परतत्वा । सबाह्य पावसी तुज नमो ॥४९॥वेदादि परम वक्ता । वेदादि तूंचि कर्ता ।तुजवांचोनि सर्व सत्ता । नमो भोक्ता न देखों ॥५०॥ज्योतिर्मय रुप तुझें । सर्व तत्वां तूंचि बीज ।नमो तुज सहज । पुढती पुढती नमो नमो ॥५१॥परब्रह्म परात्पर । परम तत्व परम सार ।परम गुह्य परम विचार । तुज नमो नारायणा ॥५२॥दिघड बिघड सुघडा । जाडा जाड अवघड ।द्वैता द्वैत जोडाजोड । कर्ता कार्यता तुज नमो ॥५३॥संख्या रहित जीवना । असंख्य जीव पाळणा ।नमो तुज संजीवना । पुंडलिकधना पांडुरंगा ॥५४॥निर्गुण सगुण रुपा । देवा देव तूं सोपा ।तुझी जाहलिया कृपा । नमन बापा तुझ्या चरणीं ॥५५॥नमो नमो तारका । तूं ब्रह्म नामा निशेखा ।नमो तुजवांचोनि सखा । योगीयासी पैं नाहीं ॥५६॥जुगादि जुगत्रय । जुग जोग योगमय ।हे तुज पासाव होय । ऐसिया तुज नमो ॥५७॥नमो नमो नम । नाहीं नाहीं तुजसी सम ।ऐसा परापश्यंती नेम । वदलिया चारी ॥५८॥चहूं मुक्ति परतत्वा । पंचभूजा शुद्ध सत्वा ।षड् मार्ग गुण सत्वा । ग्रास न करिसी तुज नमो ॥५९॥विद्वद चिद्विलासा । भानुबिंबा प्रति प्रकाशा ।नेमो तेज तेजसा । आदिसूर्या ॥६०॥ऐसा चहूं ग्रंथाचा क्लेशु । वाउगाचि वाहे सोसू ।त्रिमिर त्रिगुण असोसू । तो सत्वांशु तोडी माझा ॥६१॥साहीं नाडी नक्र भ्रमें । वाहातां इंद्रियांची ग्रामें ।ते अडखळोनि साउमे । नये ऐसें करीं नमो ॥६२॥बाध्य बाधा कर्माची । सर्व सत्ता या भ्रमाची ।नमनें करुनियां तुमचीं । तुम्हासी अर्पिलीं स्वामी ॥६३॥यम धर्माचिया सत्ता । कर्म धर्माचिया पंथा ।कर्मधर्म विधाता । ऐसिया नेमिता तुज अर्पिला ॥६४॥दश शम समान । इडा पिंगळा सुशुम्न ।साही चक्रें दरुषन । तुझीं तुज अर्पिलीं ॥६५॥मन पवन योग धारण । तूं यासी पैं कारण ।समतुकें अवघे गुण । तुझ्या चरणीं निक्षेपिलें ॥६६॥हें भूत भौतिक प्रचंड । जन्म उत्पत्तीचें अंड ।जन्म जुगादि ब्रह्मांड । खंड विखंड तूं जाणता ॥६७॥प्रचुर चर्या चित्ताची । धावन वळण अकोंचनाची ।सूचना जे चमत्काराची । ते हि अर्पण तुज सदां ॥६८॥निर्वासना वासना युक्त । गुंफले राहिले जेथें चित्त ।तेथें तूं धावोनि अनंत । सोडविसी वासनामय ॥६९॥सूक्ष्म अविचारा बोला । बोली नातुडे व्यर्थ गेला ।तो म्यां बुझावोनि संबोखिला । मग लाविला तुझ्या पंथीं ॥७०॥नित्य धर्माचिया वोळी । चळल्या चुकल्या कोण चाळी ।त्यासी वेद तुझा पाळी । त्या तूं सांभाळी परब्रह्म ॥७१॥श्रृति स्मृतिंची वचनें । याची अंगराग मार्गस्थानें ।कीर्तनीं गुण वर्णनें । हे हि नारायणें अंगीकारावीं ॥७२उदंड विदंड वितंड । देह द्व्याचे अभंड ।जे जे दिसे भ्रंश अंडांड । ते शुभ्र चंड सांभाळी ॥७३॥देह भरणाची ममता । देह पोखिती जे सत्ता ।त्याहि वरील सूक्ष्मता । ते कृपावंता सांभाळी ॥७४॥त्रिमिर त्रिगुण अवघे । जें जें आलें असेल वोघें ।तें तें मी नेघे । तें तूं सकळ वेगें सांभाळीं ॥७५॥योनीचिया कष्टा । वरी वासना होती भ्रष्टा ।त्या त्या करुनि प्रविष्टा । रत जालों तुझ्या चरणीं ॥७६॥विद्या वयसा कुळ । ब्रह्म कर्म आचारशीळ ।गेले आले विव्हळ । ते तूं दयाळ सांभाळी ॥७७॥नाना जन्म अवतार । नाना शाखांचे निर्धार ।नाना गोत्र उच्चार । तुझा विचार तूं जाणसी ॥७८॥पाठ वेदादि वचनें । शास्त्रदृष्टी अवलोकनें ।कीर्तनी गुण वर्णनें । हें हि नारायणें अंगीकारावी ॥७९॥सर्वमय सर्व सपाट । त्यावरी करुनि चालिलों वाट ।चंद्र सूर्य नक्षत्रें घनदाट । करुनि एकवट पायरी ॥८०॥सर्व अंडाचे ब्रह्मांड । मी न म्हणे अंडांड ।खंडें करुनियां विखंड । प्रचंड मी तुजसी बोलें ॥८१॥रोमरंध्रीं ब्रह्मांडें । सकळ विराटमय खंडें ।ऐसी महत्तू ब्रह्म प्रचंडें । तुझ्या अंगीं दातारा ॥८२॥तूं विश्वरुपाची घडी । तारक ब्रह्मचि उघडी ।मियां निज दृष्टीनें चोखडी । तुझी मूर्ति न्याहळिलो ॥८३॥तें न सुटे निजकळे । येर्हवी हें ना कळे ।तुझ्या कृपागुणें आकळे । तुझिया दासा निज भक्तां ॥८४॥अनंत या नामाचा संकेत । मन मुरालें जेथें निर्धूत ।तूंपणे परमाद्भुत । परमानंदा ॥८५॥गुणाग्र गोसावी राम । गुण समुद्र गुण ग्राम ।सकळ भूतांचा विश्राम । तुज नमो ॥८६॥नमन केलिया विभूतीं । चित्त रमलें जाली विश्रांती ।तुज देखिलिया श्रीपती । न राहे चित्तीं तळमळ ॥८७॥नमन हेंचि थोर दिसे । एर्हवीं तरंगाकार भासे ।देखिलें तुतुकें नासे । नैश्वर्य ऐसें श्रुति बोले ॥८८॥नमन हेंचि परम । नमन हेंचि सुवर्म ।नमन हेंचि आत्माराम । करुं निघाली ॥८९॥नमन हाचि अनुभव । नमन हाचि मुख्य भाव ।नमन हाचि पैं देव । देवाधिदेव तूं पावसी ॥९०॥नमन हेंचि श्रेष्ठ पीठा । नेतसे तुझिया वाटा ।तुज ऐसा श्रेष्ठा । मग वाटा काय कराव्या ॥९१॥नमन हेंचि तारक । नमन हाचि विवेक ।नमनेंविण त्रैलोक्य । आडमार्गीं रिघताती ॥९२॥नमन लटिकें नव्हे नव्हे । नमन भलतियासी न साहे ।जैं साह्य सखा होय । श्री निवृत्ती ॥९३॥नमन एवढा मंत्र । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र ।विचार लक्षण पात्र । तोचि जाणे येथींचे ॥९४॥नमन करी ब्रह्मा श्रेष्ठा । नाभीकमळीं धरी वैकुंठा ।नमन करी नीळकंठा । तीर्थें मस्तकीं वंदिती ॥९५॥इंद्र चंद्र महेंद्र थोर । नमनेंविण नैश्वर ।अंडामध्यें चराचरा । नमनेंविण न तरती ॥९६॥नमस्ते नमस्ते नमस्ते । पुढतीं पुढतीं नमस्ते ।समाधिसुख आस्ते । नमो नमन करितां ॥९८॥नमो नमो आदि पीठा । शिवादिक वरिष्ठा ।येथें येऊनि वैकुंठा । समाधि शेज घातली ॥९९॥महाविष्णू तूं योगरुपा । महारुपाचिया स्वरुपा ।महादित्या अमूपा । कोटी सूर्य तेजसा ॥१००॥शंखचक्रानें मंडित । करकमळ तुझे मिरवत ।पदक ह्रदयावरी शोभत । आणि श्रीवत्सलांछन ॥१०१॥अनंत बाहूंचा मेळ । तो तूं चतुर्भुज गोपाळ ।मुगुट विराजित तेजाळ । कोटी सूर्यहुनि प्रभा ॥१०२॥पितांबर माळ कंठीं । सर्वांगीं चंदनाची उटी ।हिरे माणिक कटीतटीं । अनेक कीळा फाकती ॥१०३॥क्षुद्र्घटिकाचिया वोळी । घणघणाट तया तळीं ।देहुडा पाऊलीं निश्चळीं । वेणु वाजविसी सुस्वरें ॥१०४॥रुणुझुणु रुणुझुणु । ऐसा वाजविसी वेणू ।सुंदर तूं श्यामतनु । अळंकापुरीं उभा अससी ॥१०५॥सभोंवते गोपाळ तुझे । ते अंतरंग पैं सखे माझे ।पुंडलिक तरि सहजे । प्राण सखा पैं माझा ॥१०६॥ऐसा ज्ञान उद्बोध बोले । ज्ञानांजन निरसलें ।विज्ञानहि हारविलें । दृश्य द्रष्टेंपणेसी ॥१०७॥बापरमुमादेवीवरु । समाधि देऊनियां स्थिरु ।वरी ठेवोनियां अभय करु । वर देऊनि राहिला ॥१०८॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP