मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|तीर्थावळी| अभंग १ ते १० तीर्थावळी अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६२ तीर्थावळी - अभंग १ ते १० तीर्थांचे वर्णन Tags : abhangbooknamdevअभंगतीर्थावळीनामदेवपुस्तक अभंग १ ते १० Translation - भाषांतर १नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें ॥१॥देऊनि आलिंगन प्रीती पडिभरें । पूजिलें आदरेम यथाविधी ॥२॥धन्य तो अवसरु संत समागमु । करीतसे संभ्रमु आवडीचा ॥३॥नामदेव म्हणे सुफळ माझें जिणें । स्वामीच्या दर्शनें धन्य जालों ॥४॥२पूर्व पुण्य माझें फळोन्मुख जालें । प्रत्यक्ष भेटले पांडुरंग ॥१॥संसारीं आसक्त मायामोहें रत । तापत्रयीं संतप्त जाले जीव ॥२॥ऐसिया पतिताचा करावया उद्धार । यालागीं अवतार तुमचा जगीं ॥३॥तरी मी एक मूढ मतिहीनु । चरनींचा रजरेणू संतांचिया ॥४॥म्हणोनि पंढरीनाथ पाळितसे मातेम । प्रेमजीवन भातें देवोनियां ॥५॥आजि स्वामीनीं पाहिलें कृपादृष्टिं । केली सुखवृष्टि अनिवार ॥६॥नामा म्हणे तुमच्या चरणाचा आधार । ठाकिन पैलपार भवनदीचा ॥७॥३ज्ञानदेव म्हणे तूं भक्तशिरोमणी । जोडिले जन्मोनि केशवचरण ॥१॥प्रेमसुख गोडी तुजची फावली । वासना मावळली सकळ तुझी ॥२॥धन्य तुझें जन्म धन्य तुझें कुळ । धन्य तुज राऊळ जवळीं असे ॥३॥भक्तिप्रेम धन्य साधिलें तुवां सार । केला पैं संसार देशधडी ॥४॥क्षणएक एकांती बैसोनी सहज । अंतरींचे गुज बोलों कांहीं ॥५॥जीवन्मुक्त ज्ञानी जरी जालें पावन । तरि देवतीर्थभजन न संडिती ॥६॥भक्तशिरोमणी धन्य तूं संसारीं । परि एक अवधारी वचन माझें ॥७॥भूतळींची तीर्थें पहावीं नयनीं । असे आर्त मनीं आहे मज ॥८॥तुझिये संगतीचें नित्य सुख घ्यावें । सार्थक करावें संसाराचें ॥९॥ऐसी उत्कंठा बहुत माझे पोटीं । भाग्यें जाली भेटी तुजसी आजी ॥१०॥ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ । करावा मुहूर्त प्रयाणासी ॥११॥४ऐसें ऐकोनी नामा विचारी मानसीं । काय द्यावेम यासी प्रतिवचन ॥१॥विठोबाचे पाय आठविले मनीं । बोले अमृतवचनीं तयाप्रति ॥२॥सर्व सुख मज आहे पांडुरंगी । जावेम कवणा लागीं कोण्या तीर्था ॥३॥आहिक्य परत्रीं मज चाड नाहीं सर्वथा । न लागती पुरुषार्था मुक्ति चारी ॥४॥रंक होऊनियां पंढरी चोहटा । राखेन दारवंटा महाद्वारीं ॥५॥या सुखाकारणें शरीर कर्वती फाडिलें । दुर्जय तोडिलें मायाजाळ ॥६॥त्रिभुवनींचे वैभव सांडोनियां दुरी । जालोंसे भिकारी पंढरीचा ॥७॥कल्पतुरची छाया कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आईतें सर्वकाम ॥८॥विठोबाचे पायीं मज काय उणें । परि वासनाचि मनें गिळिली माझी ॥९॥जन्मोनी पाळिलों पोशिलों जयाचा । विकिलों कायावाचामनें त्यासी ॥१०॥नामा म्हणे विठाबासी पुसा । आज्ञा देईल शिरसा धरीन त्याची ॥११॥५ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज । कळलें गौप्यगुज सर्व तुझें ॥१॥धीर आणि चतुर सर्वस्वेम उदार । साजे तुज अधिकार प्रेमभक्ति ॥२॥धन्य तूं संसारी भक्तभावशीळ । साधिलें तुवां केवळ प्रेमसुख ॥३॥देउनी आलिंगन नामा धरियेला करीं । वंदियेलें शिरीं चरणरज ॥४॥राउळा भीतरीं चला जाऊं वेगें । आज्ञा मागों दोघे तीर्थयात्रें ॥५॥सत्वर उठोनी आले स्वामी जवळी । मस्तकें ठेवियेलीं चरणावरीं ॥६॥जीवींचा निजभावो सांगे ज्ञानदेवो । ऐकोनी पंढरीरावो हासिन्नले ॥७॥म्हणे तूं ज्ञानशीळ चिद्रूप केवळ । सबाह्यनिर्मल स्फटिक हैसा ॥८॥सहज तीर्थरुप तूंचि निरंतर । असताम हा विचार काय करिसी ॥९॥येरु म्हणे स्वामी बोलिलेती बरवें । परि सार्थक करावेम देहाचेम या ॥१०॥प्रसंगें नामयाचेम संगति घ्यावें । म्हणोनी ज्ञानदेवें धरिले चरण ॥११॥६हांसोनी पंढरिनाथ पाहे नाम्याकडे । म्हणे नवल केवढें भाग्य तुझें ॥१॥प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ति ज्ञानेश्वर । करीतसे आदर संगतीचा ॥२॥ऐसें भाग्य जेणें सर्वस्वें साधावें । तरीच जन्मा यावें विष्णुदासा ॥३॥जावें स्वस्ति क्षेम यावें शीघ्रवत । करावें स्वहित कळेल तैसें ॥४॥सर्वभावें आमचा विसरु न पडावा । लोभ असों द्यावा मजवरी ॥५॥परियेसीं ज्ञानराजा बोले जगजीवनु । तूं तंव सर्वज्ञु सुखमूर्ति ॥६॥परि एक मागणें आहे तुजप्रती । आठवण चित्तीं असो द्यावी ॥७॥हें कृपेचेम पोसणें माझें आवडतें । क्षण जीवापरतें न करीं कदा ॥८॥परी तुवाम सांकडे घातलें सर्वथा । दाटलें अवस्था ह्रदय माझें ॥९॥आरुष साबडें नामें माझें वेडें । मार्गीं मागें पुढें सांभाळावेम ॥१०॥ताहान भूक तुवां जाणावी जीवींची । मज चिंता याची थोर वाटे ॥११॥मग नामयाचा हातु धरोनी श्रीपती । देतु अस हातीं ज्ञानदेवा ॥१२॥रानीं वनीं जनीं विसंबसी झणीं । धाडितों देखोनी आर्त तुझें ॥१३॥चरणीं ठेवुनी माथा निघते जाले दोघे । आले चंद्रभागे केलीं स्नानें ॥१४॥पुंडलिकाचे चरण वंदूनियां माथा । उतरले भीमा पैल तीरीं ॥१५॥७तीर्थयात्रेप्रति बोळविला नामा । आले निजधामा देवरावो ॥१॥चरण प्रक्षाळाया रुक्मादेवी आली । श्रीमुख न्हाहाळी भरोनी दृष्टी ॥२॥तैं निडारले नयन स्वेदें भिजलें वदन । ह्रदय जालें पूर्ण करुणारसेम ॥३॥बाप कृपेचा सागरु सुखाचा सुखतरु । आर्त लोभापरु दीनालागीं ॥४॥चरणीं ठेवुनी माथा पुसे जगन्माता । आजी कां अवस्था विपरीत देखों ॥५॥म्हणे वाटतें जडभारी नाम्याच्या वियोगें । दाटलें उद्धेगे चित्त माझें ॥६॥कवण्या सुखें स्थिर न राहे माझें मन । कैं डोळां देखेन प्राण माझा ॥७॥इष्टमित्र बंधु मायबाप सखा । हीं नामें मज देखा ठेविलीं तेणें ॥८॥तो कैसा मजवीण राखिल आपुला प्राण । हे चिंता दारुण वाटे मज ॥९॥तव ती महामाया म्हणे जी यादव राया । झणीं तुमच्या नामया दिठी लागे ॥१०॥शोक मोह दुःख क्षणामाजीं जाळी । तें जीवन त्याजवळीं नाम तुमचें ॥११॥८माझे भक्त मज अनुसरले चित्ते । त्याहुनि पढियंते मज आणिक नाहीम ॥१॥व्यक्ति येणें घडे त्याची या आवडी । युगायुगी प्रौढि हेचि मिरवी ॥२॥त्याचेनि कृतार्थ असेम मी पूर्णकाम । ते माझे परम प्राणसखे ॥३॥ते माझे आश्रम मी त्यांचा विश्राम । जीहीं रुपनाम केलें मज ॥४॥मी त्यांचा सोयरा ते माझे सांगाती । करी त्यांसी एकांति सुखगोष्टी ॥५॥जीहीं तनुमन प्राण लाविला मजकडे । मी तयां आवडे जीवाहुनि ॥६॥ते माझ्या भाग्याचे अधिकारी विभागी । वैकुंठ त्या लागीं वसतें केलें ॥७॥त्यांचे गुज गौप्य मीची एक जाणें । माझी प्रेमखूण कळकी तयां ॥८॥मनाची साउली कनोनियां माते । भोगिती आतां ते प्रेमसुख ॥९॥आपुलियाचीं किरणें विराजे गभस्ती । परी किरणें तीं नव्हती आन जेंवीं ॥१०॥तैसे माझे दास मजमाजीं उदास । असती समरस दुजेनविण ॥११॥मी तो भक्तरुप भक्त माझें स्वरुप । प्रभा आणि दीप जयापरी ॥१२॥हे खूण अनुभवी जाणती ते ज्ञानी । ज्या नाहीं आयणी कासयाची ॥१३॥त्यांचिये चरणींचे रजरेणु माझें नामें । जें सांडिलें रजतमें सत्वशीळ ॥१४॥त्यांचे भेटीलागीं हदय माझें कळवळे । कैं देखेन डोळे निवती माझे ॥१५॥९तंव ते आवडते भक्त अंतरंग आपुले । देवं बोलाविलें एकांतासी ॥१॥म्हणे ह्या नाम्यापरतें मज दुजें नावडे । सांगे तयापुढें केशीराजु ॥२॥त्या देखतांची दृष्टी मन माझें निवे । वाटे त्या घालावें हदयामाजीं ॥३॥त्याचेनि लोभें मन माझें मोहिलें । अखंड राहिलें त्याचेपाशीं ॥४॥मजपरतें दुर्जे नेणें तो नामा । नित्य माझा प्रेमा पढिये त्यासी ॥५॥मी भक्तकाजकैवारी म्हणवितां वाटे लाज । परि म्यां कांही काज केलें त्यांचे ॥६॥धर्म अर्थ काम त्या नाहीं दिधले । जन्मोनि बांधलें सेवाऋणें ॥७॥तेणें आपुलेनि पुरुषार्थे जिंकिला संसार । केला मदमत्सर देशधडी ॥८॥लोभ दंभ दुरल माया मोह वैरी । घातलें तोडरीं कामक्रोध ॥९॥तो न मनीं आणिका देवा न करी त्यांची सेवा । मजपरता विसांवा नाहीं त्यासी ॥१०॥तें मार्गीम शिणलें असेल कोमाईलें । सुखदुःख आपुलें सांगेल कवणा ॥११॥त्याचिया जीवींचे मीच जाणे सर्व । हा माझा अनुभव आहे त्यासी ॥१२॥तें माझें दास आवडतें अंतरंग । त्यजिला सर्वसंग मजसाठीं ॥१३॥देखोनी ते आवडी अभिन्नव वाटलें । सप्रेमें दाटले सकळ भक्त ॥१४॥परसा भागवत आनंदे नाचत । लोटांगणीं येत गरुडपारीं ॥१५॥१०ऐसे सुखरुप दोघे चालताती मार्गीं । परी चित्त पांडुरंगीं नामयाचें ॥१॥क्षणाक्षणा वास परतोनी पाहे । वियोग न साहे पंढरीचा ॥२॥म्हणे कां गा केशीराजा मोकलिलें मातें । न येसीच सांगातेम सांभाळीत ॥३॥चिंतातुर थोर पडिलों ये परजनीं । न दिसे माझे कोणी जिवलग ॥४॥फुटोनी हदय होती दोन्ही भाग । बहु मज उद्वेग वाटताती ॥५॥तूं माझी जननी तूं माझा जनिता । तूं बधु चुलता पंढरीराया ॥६॥इष्टामित्र तूंचि तूंचि गणगोत । तूंचि कुळदैवत आवडतें ॥७॥तूंचि माझें व्रत तूंचि माझें तीर्थ । तूंचि धर्म अर्थ काम देवा ॥८॥तूंचि ज्ञानजक्षु तूंचि माझा लक्षू । तूंचि माझा साक्षु स्वभावासी ॥९॥साच कीं लटिकें हें माझें बोलणें । तुजवांचुनि जाणें कवण दुजा ॥१०॥नामा म्हणे आपुलें अनाथ सांभाळीं । येऊनी ह्रदयकमळीं राहे माझ्या ॥११॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP