मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|जुलै मास| जुलै ३० जुलै मास जुलै १ जुलै २ जुलै ३ जुलै ४ जुलै ५ जुलै ६ जुलै ७ जुलै ८ जुलै ९ जुलै १० जुलै ११ जुलै १२ जुलै १३ जुलै १४ जुलै १५ जुलै १६ जुलै १७ जुलै १८ जुलै १९ जुलै २० जुलै २१ जुलै २२ जुलै २३ जुलै २४ जुलै २५ जुलै २६ जुलै २७ जुलै २८ जुलै २९ जुलै ३० जुलै ३१ सद्गुरू - जुलै ३० महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल . Tags : brahmachaitnya maharajgondavaleparamarthaगोंदवलेपरमार्थब्रह्मचैतन्य महाराज राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥ Translation - भाषांतर जेथें मीपणाचे ठाणें । तेथें दुःखाचें साम्राज्य असणें । हा आहे नियम । म्हणून मी सांगतों राखावा नेम ॥ सर्वस्वीं व्हावें भगवंताचें । ‘ मी , माझें ’ सोडून साचें ॥ बाह्य मीपणानें जरी सोडलें । पण अभिमानानें वृत्ति बळावली । तेथें घाताला सुरुवात झाली ॥ बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनावर । राम कर्ता हें जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥ साधनीं सावधान जाण । हेंच साधकाचें मुख्य लक्षण ॥ बाह्य वेषानें कसाहि नटला । जगाला भुलविता झाला । तरी जोंवरी नाहीं चित्त स्थिर । कसा पावेल रघुवीर ? ॥ आजवर केल्या गोष्टी फार । भल्या बुर्या असतील जाण । त्याचा न करावा विचार । पुढें असावें खबरदार ॥ मानावी परस्त्री मातेसमान । दुसर्याचें न पाहावें उणेंपण । परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टि वळवावी ॥ गुणांचें करावें संवर्धन । दोषांचें करावें उच्चाटन ॥ याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥ प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥ वृत्ति असावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥ असा करा कांहीं नेम । जेणें जवळ येईल राम ॥ प्रपंचाची धरितां कांस । दुःखचि पावे खास ॥ प्रपंच हाच आधार । प्रपंचाविण निराधार । ऐशी होई ज्याची वृत्ति । समाधान न ये त्याचे हातीं ॥ तुम्ही सुज्ञ भाविक जाण । एवढें ऐकावें माझें वचन ॥ दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति । भावें धरितां रघुपति । सर्व संकटें दूर जाती ॥ वृत्ति असावी खंबीर । ज्याचा आधार रघुवीर ॥ दुर्जनांचें जैसें मन । पाषाणास न फुटे द्रव जाण । तैसें प्रपंचीं इच्छी जो सुख । जें आजवर कोणास न मिळाले देख ॥ प्रपंचाचें दुःख जाण । तें मीपण असल्याची खूण जाण ॥ जगांत वर्तावें , घरांत असावें । व्यवहारांत व प्रपंचांत वागावें । परि न कोठें गुंतावें ॥ फार दिवसांचा वृक्ष झाला । घरांतील घडामोडी दिसती त्याला । जैसें तो न सोडी आपलें स्थान । तैसें वागावे आतां आपण ॥ ज्याचे घरीं रामाचा वास । तेणें न राहावें कधीं उदास ॥ सदा राखावें समाधान । मुखीं भगवंताचें नाम ॥ आतां प्रेम ठेवा नामीं । कृपा करील चक्रपाणी ॥ आतां कर चित्त स्थिर । ह्रदयीं धरा रघुवीर ॥ रामावांचून न आणावा विचार । हाच माझा आशीर्वाद ॥ N/A References : N/A Last Updated : August 31, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP